मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /पर्यटकांसाठी वाईट बातमी; हिमाचलमध्ये 15 वर्षांत झाला नाही असा हिवाळा

पर्यटकांसाठी वाईट बातमी; हिमाचलमध्ये 15 वर्षांत झाला नाही असा हिवाळा

कोरोा व्हायरसचा प्रभाव कमी झाला म्हणून थंड हवेच्या ठिकाणी कुठे ट्रिप प्लॅन करत असाल तर ही बातमी आधी वाचा.

कोरोा व्हायरसचा प्रभाव कमी झाला म्हणून थंड हवेच्या ठिकाणी कुठे ट्रिप प्लॅन करत असाल तर ही बातमी आधी वाचा.

कोरोा व्हायरसचा प्रभाव कमी झाला म्हणून थंड हवेच्या ठिकाणी कुठे ट्रिप प्लॅन करत असाल तर ही बातमी आधी वाचा.

    शिमला 26 जानेवारी : यंदा हिमाचल प्रदेशात जास्त हिमवर्षाव (snowfall) झालेला नाही. जानेवारी महिन्यात राज्याच्या इतर भागांमध्ये हिमवर्षाव झाला असला, तरी शिमल्यामध्ये हिमवर्षाव झालेला नाही. राजधानी शिमलामध्ये 15 वर्षांत पहिल्यांदाच जानेवारी महिना हिमवर्षावाविना गेला आहे.

    हवामान खात्याच्या माहितीनुसार, 1 फेब्रुवारीपर्यंत हिमाचलमध्ये (weather in himachal) हवामान कोरडे राहील. त्यामुळे, शिमल्यात जानेवारीत हिमवर्षाव न होण्याची शक्यता अधिक आहे.  शिमल्यात जानेवारी महिन्यात होणार हिमवर्षाव याठिकाणंच सौंदर्य खुलवत असतो. याशिवाय हिमाचल प्रदेशची हिच मनमोहक दृश्य पर्यटकांच्याही विशेष पसंतीस पडतात. थंडीच्या दिवसात तसेच इतर ऋतूमध्येही पर्यटक मोठ्या संख्येने याठिकाणी भेट देत असतात.

    हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, याआधी 2007मध्ये जानेवारी महिना विना हिमवर्षावाचा गेला होता. शिमला शहरात मागील वर्षी जानेवारीमध्ये 69.4 सेंटिमीटर हिमवर्षावाची नोंद झाली होती. गेल्या 19 वर्षांमध्ये फक्त 7 वर्ष जानेवारीत चांगली हिमवृष्टी झाली आहे. शिमलामध्ये 2005च्या नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात आणि 2006 च्या जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात हिमवर्षाव झाला नव्हता. तर, 2007 च्या जानेवारीतही हिमवर्षाव झाला नाही. त्यामुळे, हिमाचलचं हे सौंदर्य दिवसेंदिवस कमी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

    सध्या कसं आहे हिमाचलमधील वातावरण -

    हिमाचलमधील लाहौल स्पीतिसह इतर उंचीवर असलेल्या ठिकाणी 23 आणि 24 जानेवारीला म्हणजेच रविवारी आणि सोमवारी बर्फवृष्टी झाली आहे. आता मागच्या दोन दिवसांपासून वातावरण स्वच्छ आहे. सोमवारी केलांग येथे किमान तापमानाचा पारा -13.1 डिग्री इतका नोंदवला गेला आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीपर्यंत वातावरण स्वच्छ राहाणार असल्याचे हवामान  विभागाने सांगितल्याने, पर्यटक (best tourist place) शिमल्यातील जानेवारीच्या हिमवृष्टीचा आनंद घेण्यापासून मुकणार आहेत, हे मात्र नक्की.

    First published:
    top videos

      Tags: Winter