Home /News /lifestyle /

तुमच्या हातातच दडली आहे 'जादू'; रात्री झोप लागत नसेल तर जरूर ट्राय करा ही छोटीशी ट्रिक

तुमच्या हातातच दडली आहे 'जादू'; रात्री झोप लागत नसेल तर जरूर ट्राय करा ही छोटीशी ट्रिक

अनेकांना झोप न लागण्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं. या झोप न येण्याच्या समस्येमुळे आरोग्यावरही गंभीर परिणाम होतो.

    नवी दिल्ली, 23 जून : अनेक लोकांना बेडवर जाताच लगेच मस्त झोप लागती. मात्र काही लोकांना झोपेविषयी खूप खटाटोप केला तरी काही फायदा होत नाही. सुखाची झोप त्यांना भेटत नाही (Sleep problem). अनेकांना झोप न लागण्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं. या झोप न येण्याच्या समस्येमुळे आरोग्यावरही गंभीर परिणाम होतो. त्यामुळे झोप न लागणं ही समस्या आरोग्यासाठी (Health) अधिक गंभीर ठरु शकते. अशातच लगेच झोप लागण्यासाठी खालील गोष्ट ट्राय करा (Sleep tips). पाच मिनिटांत लगेच झोप लागेल. Tiktok वर एका यूजरने झोपेची नवीन ट्रिक सांगितली आहे. या वापरकर्त्याचे Tiktok वर youngeryoudoc नावाने खातं आहे. त्याच्या या ट्रिकला अनेकांनी वापरुन पाहिलं आहे. यावर खूप साऱ्या प्रतिक्रियाही उमटताना दिसत आहे. मनगटाच्या आतील बाजूच्या पल्स पॉईंटला 2 ते 3 मिनिटे वर्तुळाकार गतीने मसाज केल्यावर गाढ झोप येण्यास मदत होते, असं या टिकटाॅक वापरकर्त्यानं सांगितलं आहे. जेव्हा तुम्ही मनगटावर हलक्या हातांनी मसाज करता तेव्हा तुमचं डोकं शांत होऊन तुम्हाला झोप लागण्यास मदत होते. नाडी बिंदू हा मनगटाच्या आतील बाजूस एक एक्यूप्रेशर बिंदू आहे. ज्यामुळे डोकं आणि मन दोन्हीही शांत होतं. हे ही वाचा - मुलांसाठी हानिकारक आहे जंक फूड; जाणून घ्या मोठे दुष्परिणाम 2010 आणि 2015 मध्ये केलेल्या अभ्यासातूनही या ट्रिकविषयी सकारात्मक अहवाल समोर आला आहे. मनगटाच्या नाडीच्या बिंदूवर मालिश करण्यात आल्यावर त्याचा चांगला परिणाम पहायला मिळाला. या सर्व लोकांच्या झोपेचा दर्जा सुधारला आणि झोपेच्या विकाराची समस्याही बऱ्याच अंशी कमी झाल्याचे अभ्यासात आढळून आले. लोकांच्या झोपेची गुणवत्ताही चांगली झाल्याचं आढळून आलं. हे ही वाचा - ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवेल या झाडाची साल; खाण्याची पद्धतही समजून घ्या दरम्यान, झोप यावी यासाठी अनेक लोक गोळ्या खातात. मात्र या गोळ्या खाणं आपल्या आरोग्यासाठी अजिबात हितकारी नाहीत. या झोपेच्या गोळ्यांमुळे आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम पहायला मिळतो. अशा कुठल्याही गोळ्या खाण्याच्या पहिले डाॅक्टरांकडून सल्ला घ्यावा मगच गोळ्याचं सेवन करावं.
    Published by:Sayali Zarad
    First published:

    Tags: Health, Health Tips, Lifestyle, Sleep

    पुढील बातम्या