Home /News /lifestyle /

रात्री झोप येत नाही, आणि दिवसभर आळस राहतो? हा एक बदल ठरेल फायदेशीर

रात्री झोप येत नाही, आणि दिवसभर आळस राहतो? हा एक बदल ठरेल फायदेशीर

सर्दी झाल्यावर वाफ घेण्यासारख्या घरगुती उपायांद्वारेही श्वसनमार्ग मोकळा होण्यास मदत होते.

सर्दी झाल्यावर वाफ घेण्यासारख्या घरगुती उपायांद्वारेही श्वसनमार्ग मोकळा होण्यास मदत होते.

डीडब्ल्यूच्या रिपोर्टमधील माहितीनुसार, दोन जुळ्या बहिणींवर (twins) केलेल्या एका रिसर्चमधून अनेक खुलासे झाले आहेत.

    स्मार्टफोन (smart phone) आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालाय. आपण कुठेही गेलो तरी फोन आपल्यासोबत असतोच. फोन हातात नसेल तर अनेकांना अवघडल्यासारखं वाटतं. बऱ्याच जणांना रात्री झोपण्याआधी फोनवर चॅट (chatting) करण्याची, सर्च (search)करण्याची सवय असते. तसेच उठल्याबरोबरही पहिलं लक्ष फोनकडे जातं. मात्र आपलं जीवन सुकर करणाऱ्या या फोनचा जास्त वापर आरोग्यासाठी हानिकारक आहे. विशेषतः जे लोक रात्री झोपण्याआधी लाईट बंद करून फोन वापरतात त्यांच्या शरीरावर याचे दुष्परिणाम जास्त दिसून येतात. रात्री स्मार्टफोन वापरल्यास त्याचा आपल्या झोपेवर परिणाम होतो, असे एका रिपोर्टमधून समोर आले आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन आपल्या झोपेवर आणि आरोग्यावर कशा रितीने परिणाम करतो, तसेच याचे काय नुकसान आहेत, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. याबाबत टीव्ही 9 हिंदीने वृत्त दिलंय. डीडब्ल्यूच्या रिपोर्टमधील माहितीनुसार, दोन जुळ्या बहिणींवर (twins) केलेल्या एका रिसर्चमधून अनेक खुलासे झाले आहेत. या दोघींपैकी एक बहीण रोज रात्री पुस्तक (books) वाचून झोपायची, तर दुसरी फोन किंवा टॅबलेटचा वापर करून झोपायची. दोघींनीही झोपण्याआधी झोप ट्रॅक करण्यासाठी ट्रॅकरचा वापर केला. त्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दोघींपैकी जी बहीण फोन वापरायची तिची झोप कमी व्हायची. तर तुलनेने पुस्तक वाचणाऱ्या बहिणीची झोप जास्त होत होती. हे ही वाचा-कोरोनावर मात केली तरी तुमचं आरोग्य धोक्यात; या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका ज्या दोन बहिणींवर हा रिसर्च केला गेला त्या दोघींनी एक आठवडा सोबत काम केलं आणि एकच वातावरणात राहल्या. त्यानंतरही फोन वापरणाऱ्या बहिणीची झोप खूप कमी झाली होती. दोघींमधील झोपेचं अंतर 15 मिनिटांचं होतं. दोघींच्या झोपेवर किती परिणाम होत आहे, यासाठी दोघींची एक टेस्ट केली गेली. त्यातही झोपण्याआधी फोनची स्क्रीन बघितल्यामुळे झोपेवर जास्त परिणाम होत असल्याचं स्पष्ट झालंय. रिपोर्टमध्ये एक्सपर्ट्सनी सांगितलं की, फोनच्या प्रकाशाचे तरंग फार छोटे असतात. त्याला डोळ्यांनी बघितल्यानंतर त्याचा शरीराला आराम देणाऱ्या हार्मोन्सवर परिणाम होतो. त्यामुळे झोपणे आणि जागं होण्याच्या रुटीनवर परिणाम होऊन झोपेची वेळ कमी होते. झोप न आल्यास काय होतं? एक्सपर्ट्स म्हणतात, रात्री नीट झोप न झाल्यास दिवसा काम करताना लक्ष लागत नाही. त्यामुळे तुम्हाला रात्री झोपताना फोन वापरण्याची सवय असेल तर सेंटिंग बदलून, ब्राईटनेस(brightness)कमी करून पाहा किंवा नाईट मोड(night mode)ऑन करून फोन वापरा. यामुळे तुलनेने तुमच्या डोळ्यांवर आणि झोपेवर कमी दुष्परिणाम होतील.
    First published:

    Tags: Sleep, Sleep benefits

    पुढील बातम्या