• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • No Shave November अभियानाचा खरा उद्देश माहिती आहे का? तुम्हालाही सहभागी व्हावं वाटेल

No Shave November अभियानाचा खरा उद्देश माहिती आहे का? तुम्हालाही सहभागी व्हावं वाटेल

जगभरात नोव्हेंबर महिन्यात `नो शेव्ह नोव्हेंबर` (NO Shave November) हे अभियान राबवलं जातं. कदाचित तुम्हीही याला फोलो केलं असेल. मात्र, या पाठीमागची कथा तुम्हाला माहिती आहे का? याची सुरुवात कुठून झाली? चला जाणून घेऊया.

 • Share this:
  मुंबई, 24 नोव्हेंबर: दाढी वाढवणं, ट्रिम करणं ही एक फॅशन (Fashion) समजली जाते. अनेक युवक फॅशन म्हणून किंवा आकर्षक दिसावं यासाठी दाढी वाढवतात; मात्र नोव्हेंबर (November) हा असा महिना आहे, की या महिन्यात अनेकजण जाणीवपूर्वक दाढी (Beard) करत नाहीत. यामागं `नो शेव्ह नोव्हेंबर` हे अभियान असतं. सध्या नोव्हेंबर महिना सुरू असल्यानं अनेकांनी दाढी वाढवल्याचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर करणं सुरू केलं आहे. नो शेव्ह नोव्हेंबर म्हणजे नेमकं काय असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. नो शेव्ह नोव्हेंबर हे एक प्रकारचं अभियान (Campaign) आहे. या कालावधीत अनेक पुरुष दाढी, कटिंग, वॅक्सिंग, थ्रेडिंग आदी गोष्टी करत नाहीत. नो शेव्ह नोव्हेंबर हे अभियान खरं तर कर्करोगाविरोधात राबवलं जातं. प्रोस्टेट कॅन्सरविषयी (Prostate Cancer) जनजागृती करण्यासाठी हे अभियान राबवतात. या अभियानादरम्यान पुरुष दाढी, कटिंग करत नाहीत, असं एका अहवालात सांगितलं गेलं आहे; मात्र हे अभियान राबवण्यासाठी नोव्हेंबर महिन्याची निवड का करतात, असाही प्रश्न पडला असेल. यामागे एक विशेष कथा आहे. नोव्हेंबर 2007 मध्ये शिकागो येथील मॅथ्यू हिल या व्यक्तीचा कॅन्सरशी लढा देताना मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या पश्चात आठ मुलांनी आपल्या पित्याच्या सन्मानार्थ आणि त्यांच्याप्रमाणे कर्करोगाशी लढा देणाऱ्या व्यक्तींना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हे अभियान नोव्हेंबर महिन्यात राबवलं जातं. 2004 मध्ये सुरू झालेलं मोवेंबरही (Movember) एक जनजागृती अभियान आहे. मोवेंबर हा शब्द मुश्टैश (मिशी) म्हणजेच मिशा आणि नोव्हेंबर या शब्दांपासून तयार करण्यात आला आहे. हे अभियान केवळ कर्करोगाविषयी जनजागृतीकरिता नव्हे, तर पुरुषांमध्ये जीवनशैली आणि आरोग्याविषयी जागृती निर्माण करण्याकरितादेखील राबवलं जातं. त्यामुळे अनेक पुरुष मिशा वाढवून या अभियानात सहभागी होऊन त्याला पाठिंबा देतात. World beard day : ९ बॉलिवूड स्टार्सचा हटके बियर्ड लुक पाहिलात का? केवळ दाढी, कटिंग न करता एखाद्या अभियानाला कसा पाठिंबा देता येतो असा प्रश्न नक्कीच पडला असेल; मात्र कटिंग न करणं हाच केवळ या अभियानाचा उद्देश नसून त्यामागं अनेक कारणं आहेत. एक महिना केस न कापता त्यातून वाचलेले पैसे कॅन्सरपीडितांच्या मदतीसाठी दान करणं, असा या अभियानाचा उद्देश आहे. तुम्ही एका महिन्यात कटिंग, दाढीसाठी 500 रुपये खर्च करत असाल, तर तो खर्च न करता हे पैसे कॅन्सरपीडितांसाठी दान करावेत, असा याचा अर्थ. नो शेव्ह नोव्हेंबर (No Shave November) या अभियानाची सुरुवात 2009 साली अमेरिकेतल्या (America) मॅथ्यू हिल फाउंडेशननं केली. हे फाउंडेशन हा दान म्हणून मिळालेला पैसा कर्करोगावर इलाज करणाऱ्या, कर्करोग रोखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या, संशोधन करणाऱ्या आणि कर्करोगाविषयी शिक्षण देणाऱ्या संस्थांना देते.
  Published by:Rahul Punde
  First published: