मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Night Shift करणाऱ्यांना असतो या गंभीर आजाराचा धोका? काय सांगतं नवं संशोधन

Night Shift करणाऱ्यांना असतो या गंभीर आजाराचा धोका? काय सांगतं नवं संशोधन

Night Shift Disadvantages: रात्रपाळीत काम करणं अनेक कारणांनी वाईट मानलं जातं. आता त्याचा अजून एक संभाव्य धोका समोर आला आहे.

Night Shift Disadvantages: रात्रपाळीत काम करणं अनेक कारणांनी वाईट मानलं जातं. आता त्याचा अजून एक संभाव्य धोका समोर आला आहे.

Night Shift Disadvantages: रात्रपाळीत काम करणं अनेक कारणांनी वाईट मानलं जातं. आता त्याचा अजून एक संभाव्य धोका समोर आला आहे.

  • Published by:  News18 Desk

वॉशिंग्टन, 10 मार्च : नाईट शिफ्टमध्ये काम करण्याचे अनेक धोके सांगितले जातात. एक विशिष्ट प्रकारचा कॅन्सर होण्याचाही धोका यात सांगितला जातो आहे. एका नव्या संशोधनात हा खुलासा झाला आहे. (Night Shift Disorder)

वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीच्या हेल्थ सायन्सेसच्या नव्या संशोधनात ही गोष्ट समोर आली आहे. रिसर्चदरम्यान दिवस आणि रात्र अशा दोन शिफ्ट्समध्ये काम करणाऱ्या निरोगी लोकांना सहभागी करून घेत त्यांची तपासणी केली गेली. (Health Tips for Night Shift)

याच्या निष्कर्षात समोर आलं, की नाईट शिफ्ट 24 तासांच्या नैसर्गिक चक्राला नुकसान पोचवते. यात कॅन्सरशी संबंधित जीन्स सक्रिय होतात. संशोधकांचं म्हणणं आहे, की रात्रपाळीत काम करणाऱ्यांच्या डीएनएला धोका पोचण्याची शक्यता जास्त असते. डीएनएची दुरुस्ती करणारी व्यवस्था या नुकसानाला भरून काढण्यास सक्षम नसते. (Washington University Night Shift Research)

हेही वाचा No Smoking Day 2021: धूम्रपान सोडणं शक्य होत नाही? फॉलो करा या टिप्स

अर्थात, संशोधकांनी या संशोधनावर अजून जास्त काम करण्याची गरज असल्याचं सांगितलं. सोबतच हीसुद्धा आशा व्यक्त केली, की त्यांचं संशोधन रात्रपाळीत काम करणाऱ्या लोकांमधल्या कॅन्सरचा उपचार आणि पायबंद यासाठी मदतशील असू शकतो. (Night Shift Provokes Cancer Research)

संशोधकांचं हेसुद्धा म्हणणं आहे, की असे पुरावे समोर येत आहेत, ज्यांतून हे कळतं आहे, की रात्रपाळीत काम करणाऱ्यांमध्ये कॅन्सर जास्त आढळतो. अर्थात अजून याचं कारण समोर आलेलं नाही. (new cancer and night shift research)

हेही वाचा health tips हे हेल्दी फॅट्स असणारे 5 पदार्थ नक्की खा, अजिबात वाढणार नाही वजन

आपल्या शरीरात नैसर्गिक घड्याळ असतं. हे 24 तास दिवसा आणि रात्रीनुसार काम करण्यासाठीच बनलेलं असतं. म्हणजेच या घड्याळाची सक्रियता दिवसा आणि रात्री वेगळी असते. संशोधकांचं म्हणणं होतं, की ही लय बिघडली तर कॅन्सरचा धोका वाढतो.

या प्रयोगात संशोधकांनी वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये काम करणाऱ्या 14 लोकांवर एक प्रयोग केला. त्यातील 50 टक्के लोकांनी 3 दिवस नाईट शिफ्टचं शेड्युल पूर्ण केलं. बाकी 3 लोकांना दिवसाची शिफ्ट दिली गेली. शिफ्टनंतर सगळ्या लोकांना 24 तास जागं ठेवलं गेलं. हरेक 3 तासांनी रक्ताचं सॅम्पल घेण्यात आलं. या सॅम्पलमधील पेशींच्या परीक्षणानंतर कळालं, की कॅन्सरशी जोडलेल्या जीन्सची लय नाईट शिफ्टच्या व्यक्तींमध्ये दिवसा शिफ्ट करणाऱ्या व्यक्तींपेक्षा वेगळी होती.

First published:

Tags: Cancer, Research