मुंबई, 11 नोव्हेंबर : दिवसाच्या खोकल्यापेक्षा रात्रीचा खोकला जास्त त्रासदायक आणि वेदनादायक ठरू शकतो. रात्री झोपताना अनेकदा खोकला येतो, त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे आणि घट्टपणा जाणवतो. यामुळे व्यक्तीला रात्रभर नीट झोप लागत नाही आणि श्लेष्मा किंवा कफ घशात अडकल्यामुळे रात्रीचा खोकला वाढतो. सायनस, प्रदूषण, ऍलर्जी किंवा बॅक्टेरियाचा संसर्ग यांसारखी खोकल्याची अनेक कारणे असू शकतात. या व्यतिरिक्त, यामुळे कोणतीही मोठी समस्या देखील वाढू शकते, ज्याची लक्षणे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
पोस्ट नेसल ड्रिप -
पोस्ट नेसल ड्रिप ज्याला अपर एयरवे कफ सिंड्रोम म्हणून देखील ओळखले जाते. हा जुनाट खोकल्याच्या सर्वात सामान्य कारणांपैकी एक आहे. हा खोकला घशात अडकलेल्या श्लेष्माच्या थेंबामुळे होऊ शकतो. यामुळे घशात गुदगुल्या होतात आणि सतत खोकला लागू शकतो. डोळ्यांना खाज येणे, शिंका येणे आणि कन्जक्शन ही पोस्टनेसल ड्रिपची लक्षणे असू शकतात.
दमा -
दम्याचा त्रास असलेल्या लोकांच्या वायुमार्गामध्ये सूज येत असते. ज्यामुळे श्वास घेण्यात अडचण येण्यासोबत घरघर होणे आणि खोकला वाढू शकतो. दम्यामध्ये खोकला रात्री आणि सकाळी जास्त होतो. खोकल्या व्यतिरिक्त, श्वास लागणे आणि घट्टपणा जाणवू शकतो.
गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स डिजीज -
जेव्हा पोटातील ऍसिड तुमच्या अन्ननलिकेमध्ये परत येते तेव्हा GRD उद्भवते. जर खोकला फक्त रात्रीच होत असेल तर त्याला ऍसिड रिफ्लक्स जबाबदार असू शकते. जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा पोटातील ऍसिड रिपलॅक्स होते आणि घशातील नसांमध्ये खोकला येतो. या स्थितीत श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो आणि छातीत दुखू शकते.
न्यूमोनिया -
निमोनियामुळे काहीवेळा रात्री खोकला येऊ शकतो. निमोनियामुळे ताप, थंडी वाजून येणे, धाप लागणे आणि छातीत दुखण्याचा त्रास होऊ शकतो. निमोनिया हा एक जीवाणूजन्य संसर्ग आहे जो शरीरात हळूहळू वाढू शकतो.
रात्री खोकल्यासाठी उपचार
- मध आणि आल्याचा रस सेवन करा
- गरम पाणी प्या
- कफ सिरप घ्या
- मोकळ्या हवेत चालणे
- नेब्युलायझर वापरा
- वाफ घ्या
- लवंग खा
रात्री खोकला येणे सामान्य आहे, परंतु जास्त खोकला असल्यास त्यावर योग्य उपचार करणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी खोकला झाल्यास वरील घरगुती गोष्टींचे सेवनही करता येते.
हे वाचा - शरीरातील ऊर्जा कमी करतात ‘या’ 5 गोष्टी; लगेच रुटीनमध्ये करा बदल
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips