मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /आदित्य नारायणच्या बायकोने चावला नवऱ्याचा कान; हनिमून VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ

आदित्य नारायणच्या बायकोने चावला नवऱ्याचा कान; हनिमून VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ

सेलिब्रेटीज आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक प्रसंगाचे VIDEO सोशल मीडियावर शेअर करत असतात. आदित्यने चक्क आपल्या काही हनिमून मोमेंट्स शेअर केल्या आहेत.

सेलिब्रेटीज आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक प्रसंगाचे VIDEO सोशल मीडियावर शेअर करत असतात. आदित्यने चक्क आपल्या काही हनिमून मोमेंट्स शेअर केल्या आहेत.

सेलिब्रेटीज आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक प्रसंगाचे VIDEO सोशल मीडियावर शेअर करत असतात. आदित्यने चक्क आपल्या काही हनिमून मोमेंट्स शेअर केल्या आहेत.

मुंबई,19 फेब्रुवारी :  सेलिब्रेटीज आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक प्रसंगाचं, नव्या स्टाइल्सचं आणि रिलेशनशिपमधल्या गोडव्याचंही सोशल मीडिया (Social Media) वर जाहीर प्रदर्शन करत असतात. या पोस्टला त्यांच्या चाहत्यांकडून कमेंट्सच्या स्वरुपात भरघोस प्रतिसाद मिळतो. सध्या बॉलिवूडमधील संगीतक्षेत्रातील एक सेलिब्रिटी कपल (Celebrity Couple) आपल्या सोशल मिडीयावरील पोस्टमुळे असेच जोरदार चर्चेत आलं आहे.

बॉलिवूडमधील जेष्ठ गायक उदित नारायण यांचा मुलगा, गायक आदित्य नारायण (Aaditya Narayan) आणि त्याची पत्नी श्वेता अग्रवाल (Shweta Agarwal) हे हनिमूनसाठी काश्मीरला गेले होते. त्यावेळचा एक व्हीडिओ आदित्यने इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर तुफान धुमाकूळ घालताना दिसत आहे.

गायक आदित्य नारायण आणि अभिनेत्री श्वेता अग्रवाल नुकतेच विवाहबद्ध झाले.  आदित्य याने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून विवाह सोहळ्याचे फोटो व्हिडीओ शेअर केले, तसा हा हनिमून स्पेशल व्हिडीओसुद्धा शेअर केला आहे.

मागील वर्षी डिसेंबरमध्ये झाला होता विवाह

आदित्य आणि त्याची दिर्घकाळ असलेली गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री श्वेता अग्रवाल यांचा 1 डिसेंबरला विवाह झाला होता. हा विवाहसोहळा मोठ्या प्रमाणात चर्चिला गेला.

कोण आहेत पायल नाथ? जिच्यापासून ओमर अब्दुल्लांना हवाय लवकरात लवकर घटस्फोट

या विवाह सोहळ्याला कुटुंबातील व्यक्तींव्यतरिक्त इंडस्ट्रीमधील खास व्यक्ती देखील उपस्थित होत्या. लग्नानंतर आदित्य आणि श्वेताचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. लग्नानंतर हे दांपत्य हनीमूनसाठी काश्मिरला गेले होते.

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने शेअर केली होती रोमॅंटिक पोस्ट

आदित्य आणि श्वेताचा नवा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार चर्चेत असला तरी यापूर्वी आदित्यने लग्नानंतर व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine Day) निमित्ताने पत्नी श्वेता हिला अगदी वेगळ्या पध्दतीने शुभेच्छा दिल्या होत्या. सोशल मिडीयावरील या पोस्टमध्ये आदित्यने जगातील 78 लाख लोकांमध्ये आपल्या दोघांना एकमेकांची साथ मिळत आहे. माझ्या प्रिय पत्नीला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा, असा संदेश लिहिला होता.

श्वेताने चावला आदित्यचा कान

आदित्य नारायणने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हनीमूनचा सेल्फी व्हिडीओ शेअर केला आहे. श्वेता आदित्यच्या गालावर किस करताना आणि त्याच्या कानाचा चावा घेताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. श्वेता असं करताना आदित्य तिच्याकडे आश्चर्याने पाहत आहे. आणि श्वेता लाजताना दिसत आहे. त्यानंतर श्वेता आदित्यचा कान ओढताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

First published:
top videos

    Tags: Instagram post