नवी दिल्ली, 20 मे: दिवसाची चांगली सुरुवात करायची असेल तर, काहीतरी गोड खाण्याची सवय अनेकांना असेत. गोड पदार्थांमध्ये चॉकलेट (Chocolate) लहान मोठे सर्वांच्याच आवडीचं असतं. काही खास प्रकारचे चॉकलेट आरोग्यासाठी (Health) देखील फायदेशीर (Benefit) असल्याचं म्हटलं जातं. ज्यामुळे बऱ्याच गंभीर रोगांपासून आपल्याला दूर राहण्यास मदत होते.
दुसरीकडे चॉकलेट खाल्ल्याने मनावरचा ताणही (Stress) कमी होतो. खरंतर लोक आवड आणि टेस्टसाठी चॉकलेट खातात. ज्यांना रक्तदाबची समस्या आहे. अशांना डॉक्टर विशिष्ट प्रकारचे चॉकलेट खाण्याची शिफारस देखील करतात.
आता एक असं चॉकलेट (Chocolate) लाँच करण्यात आलं आहे. जे केवळ तणाव (Stress) कमी करण्यासाठीच नाही तर, रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, ऊर्जा (Energy) देण्यासाठी आणि निद्रानाशासारख्या समस्यांशी लढण्यासाठी प्रभावी असल्याचे म्हटलं जात आहे.
(हे वाचा- महिला क्रिकेटमधील 'महेंद्रसिंह धोनी'नं न्यूड फोटो शेअर करत उडवली होती खळबळ)
एप्रिलमध्ये लाँच झालेलं AWSUM नावाचं हे चॉकलेट आयुर्वेदानुसार बनवण्यात चॉकलेट असल्याचं सांगितलं जात आहे. Awsum chocolate चॉकलेट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रणव यांच्या मते,'आयुर्वेदात काही औषधी वनस्पती आहेत. ज्या वेगवेगळ्या शारीरिक समस्यांवर उपाय म्हणून सुचवल्या गेल्या आहेत. आयुर्वेदावर आधारीत चॉकलेटचे 4 व्हेरियंट बाजारात दाखल करण्यात आलेत.
(हे वाचा- अभिनेत्रीने पतीसोबत दिल्या अवघड योगा पोझ; फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क)
यामध्ये स्लीपिंग डिसऑर्डर, इम्युनिटी बूस्टर, स्ट्रेस कमी करणारं आणि एनर्जी वाढवण्यासाठी खास प्रकारचं चॉकलेट लाँच करण्यात आलं आहे. खास तरुण वर्गासाठी हे चॉकलेट बनवले आहेत. प्रतिकारशक्ती वाढविण्यात स्ट्रेस हे अनेक गंभीर रोगांचं मुख्य कारण मानलं जातं. तणाव टाळण्यासाठी या प्रकारचे चॉकलेट खास उपयोगी ठरू शकतात. त्यात स्ट्रेस कमी करण्यासाठी खास गुणधर्म आहेत. हे रोग प्रतिकारशक्ती वाढवणारं चॉकलेट मुलांना देखील दिलं जाऊ शकतं. यात अश्वगंधा,आवळा,हळद आणि आल्यासारखे औषधी पदार्थ वापरले गेले आहेत.
हे चॉकलेट फूड स्टॅन्डर्ड नुसार बनवलेले आहेत. फूड सेफ्टी एँड स्टॅन्डर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे FSSAI चा परवाना मिळालेलं हे चॉकलेट आहे. भविष्यात अशा चॉकलेटची डिमांड वाढेल असा कंपनीला विश्वास आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips