Home /News /lifestyle /

बाळ गर्भातच ओळखू लागतं आईचा स्पर्श आणि आवाज; अभ्यासात समोर आल्या आश्चर्यकारक गोष्टी

बाळ गर्भातच ओळखू लागतं आईचा स्पर्श आणि आवाज; अभ्यासात समोर आल्या आश्चर्यकारक गोष्टी

'नैसर्गिकरीत्या आई आणि मुलामध्ये एक बाँडिंग तयार झालेलं असतं. संशोधनातूनही ते सिद्ध झालं आहे. यामुळेच बाळाला आईच्या जवळ राहणं आवडतं,' असं शास्त्रज्ञांचे मत आहे

नवी दिल्ली 17 जानेवारी : जन्मानंतर बाळाला ( baby) पहिल्यांदा हातात घेतल्यावर होणारा आनंद हा त्याच्या आई-वडिलांपेक्षा (parents) जास्त कोणालाच समजू शकत नाही. आपल्याच हाडामांसाचा असलेला तो जीव म्हणून आईची 9 महिन्यांपासून त्या बाळाशी नाळ जोडलेली असते. ते बाळसुद्धा इवल्याशा डोळ्यांनी आईच्या नजरेला नजर देत असतं. तुम्हाला माहिती आहे का, नवजात बाळाला आईचा स्पर्श (mother's touch) कळतो. बाळ त्याच्या आईचा आवज (voice) ओळखतं. आता हे सर्व कसं शक्य आहे, हे समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक अभ्यास केला. 'टीव्ही 9 हिंदी'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. नवजात बाळाला आईचा स्पर्श कळतो. ते आईचा आवाज ओळखतं. एवढ्या कमी वयात एखादं मूल हे कसं करू शकतं, याचा कधी विचार केला आहे? हे समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक अभ्यास केला. या अभ्यासात अनेक आश्चर्याकारक बाबी समोर आल्या. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या (NIH) जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार ( research), 'हे गुण बाळामध्ये जेव्हा ते गर्भात असते तेव्हाच विकसित होऊ लागतात. गर्भात असतानाही त्याला आईचा आवाज ऐकू येतो. गर्भात असतानाच कालांतरानं ते आवाज स्पष्टपणे ओळखू लागतं.' अमेरिकन शास्त्रज्ञांच्या संशोधनात कोणत्या गोष्टी समोर आल्या, त्या जाणून घेऊया.

वाहनांमुळे होणारे प्रदूषण मुलांच्या जीवावर; दरवर्षी 20 लाख मुलांना दम्याचा धोका

'नैसर्गिकरीत्या आई आणि मुलामध्ये एक बाँडिंग तयार झालेलं असतं. संशोधनातूनही ते सिद्ध झालं आहे. यामुळेच बाळाला आईच्या जवळ राहणं आवडतं,' असं शास्त्रज्ञांचे मत आहे. नवजात मुलांमध्ये हे ओळखण्याची क्षमता असते, की त्यांची आई त्यांना स्तनपान करतेय की ती दुसरी कोणी महिला आहे. याबाबतचा तर्क शास्त्रज्ञांनी त्यांच्या संशोधनात दिला आहे. गर्भाशयात वाढताना बाळ एका थैलीत असतं. त्याभोवती द्रव भरलेला असतो. याला अॅम्नीओटिक द्रव म्हणतात. यातूनच पोषक द्रव्यं बाळाला मिळत असतात. अॅम्नीओटिक द्रव पदार्थाला एक वैशिष्ट्यपूर्ण वास असतो. हा वास स्तनपानाच्या वेळी आईला येतो. जेव्हा बाळ जन्माला आल्यानंतर लगेच रडतं आणि आई त्याला कुशीत घेते, स्तनपान करते, तेव्हा ते शांत होतं. कारण बाळाला स्तनपान करताना तो वास जाणवतो. त्यावरूनच बाळ आपल्याला आपल्याच आईने घेतलं आहे का नाही, हे ओळखतं.

स्तनाचा कॅन्सर होऊ नये म्हणून वेळीच व्हा सावध; निशुल्क ही गोष्ट त्यावर प्रभावी

स्कॉटलंडमधल्या डूंडी युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनात असं म्हटलं आहे, की 'गर्भधारणेच्या सहाव्या महिन्यापासून नवजात बालकांना आईचा स्पर्श समजू लागतो.' हे जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी प्रयोग केला. त्यासाठी गर्भवती महिलांची सोनोग्राफी करण्यात आली. गर्भवती महिलेने पोटावर हात ठेवला, तेव्हा बाळामध्ये हालचाल होते, तर दुसऱ्या व्यक्तीने पोटाला हात लावला, की बाळाची हालचाल कमी होते, असं यामध्ये दिसून आलं. जन्माला येण्याआधीच आई व बाळामध्ये एक अतूट नातं जोडलं जातं. या काळातला प्रवास आई व बाळ दोघांसाठी अविस्मरणीय असतो.
First published:

Tags: Mother, Small baby

पुढील बातम्या