स्पीकरने संसदेतच मुलाला पाजले दूध, PHOTO VIRAL

स्पीकरने संसदेतच मुलाला पाजले दूध, PHOTO VIRAL

सोशल मीडियावर काही गोष्टी अशा असतात ज्या मनात घर करून जातात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

सोशल मीडियावर काही गोष्टी अशा असतात ज्या मनात घर करून जातात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत न्यूझीलँडचे स्पीकर संसदेतच मुलाला दूध पाजताना दिसत आहेत. त्यांच्या या फोटोने कोट्यवधी लोकांच्या मनात घर केलं आहे. आता महिलांप्रमाणेच पुरुषही मुलांना उत्तमरित्या सांभाळू शकतात हेच या फोटोतून स्पष्ट होतं. Trevor Mallard असं स्पीकर यांचं नाव असून खासदार Tamati Coffey यांचा तो मुलगा आहे. मुलाच्या जन्मानंतर Tamati यांनी पॅटर्निटी लिव्ह घेतली होती. महिन्याभरानंतर ते एक महिन्याच्या मुलाला घेऊन संसदेत कामाला रुजू झाले.

मीडिया रिपोर्टनुसार संसदेत Tamati Coffey आपला मुद्दा मांडण्यासाठी उभे राहिले असता त्यांचा मुलगा रडू लागला. यावेळी स्पीकर ट्रेवर मलार्ड यांनी मुलाला सांभाळण्याची जबाबदारी घेतली आणि त्याला बाटलीतून दूध पाजू लागले.

मुलासोबतचे ट्रेवर यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. स्वतः ट्रेवर मलार्ड यांनी मुलासोबतचा फोटो ट्विटरवर शेअर करत म्हटलं की, 'सर्वसामान्यपणे स्पीकरच्या खुर्चीचा वापर हा संसदीय कामकाजासाठी केला जातो. पण आज एक व्हीआयपी माझ्यासोबत खुर्चीत बसला आहे. Tamati Coffey यांना त्यांच्या कुटुंबातील नव्या सदस्याच्या आगमनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.'

याआधी ऑस्ट्रेलियाच्या सिनेट सदस्य लारिसा वॉटर्स यांनी त्यांच्या दोन महिन्याच्या मुलीला संसदेत स्तनपान केलं होतं. त्यांनी ट्वीट करत लिहिलं होतं की, 'मला फार अभिमान आहे की माझी मुलगी आलिया संसदेत स्तनपान करणारी पहिली मुलगी आहे. आम्हाला संसदेत अजून महिला आणि आई- वडिलांची गरज आहे.'

याशिवाय लारिसा वॉटर्स यांनी एक पोस्ट शेअर करत म्हटलं होतं की, 2003 मध्ये विक्टोरियन खासदार क्रिस्टी मार्शल यांनी 11 दिवसांच्या मुलाला स्तनपान केलं होतं. यामुळे त्यांना संसदेतून बाहेर काढण्यात आलं होतं.

लोकांना रात्री ही 7 स्वप्न हमखास पडतात, हे आहेत त्यांचे अर्थ

घरातील प्रदुषण या 6 रोपांमुळे क्षणात जाईल, एकतरी घरी लावाच!

उत्तम सेक्स लाइफसाठी जेवणात या पदार्थांचा समावेश करा!

मुलाच्या अंगावरून गाडी गेली पण खरचटलंही नाही, श्वास रोखून धरायला लावणारा VIDEO समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Aug 22, 2019 02:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading