Home /News /lifestyle /

NEW YEAR 2020: नवीन वर्ष चांगलं जावसं वाटतंय? मग या 10 गोष्टी नक्की करून पाहा

NEW YEAR 2020: नवीन वर्ष चांगलं जावसं वाटतंय? मग या 10 गोष्टी नक्की करून पाहा

नवीन वर्षाचा तुम्ही काही संकल्प केला नसेल तर या 10 गोष्टी रोज जरूर करा. हे वर्ष तुमच्या मनासारखं नक्की जाईल.

    मुंबई, 01 जानेवारी: सरत्या वर्षाच कडू-गोड आठवणी मागे सोडून नव्या वर्षात नवी सुरुवात करण्याचा तुम्ही संकल्प केला असेल. नवीन वर्ष उत्साहात, आनंदात आणि चांगल जावं यासाठी आम्ही तुम्हाला काही खास सोप्या टीप्स सांगणार आहोत. सुरुवातीपासून तुम्ही याचा वापर केला तर हे वर्ष तुम्हाला सुख, समृद्धी आणि समाधानाचं जाऊ शकतं. त्यासाठी करून तुम्हाला या गोष्टी रोज नक्की करायला हव्यात 1.उत्साह काल घडलेल्या गोष्टीतून काय चूकलं याचा विचार करा आणि त्यावर कसा पर्याय शोधता येईल हे ठरवा. आदल्या दिवशी घडलेल्या प्रसंगांचं शल्य मनात ठेवून भूतकाळासाठी न जगता वर्तमान आणि भविष्याचा विचार करा. यासाठी तुम्ही कायम आशावादी रहायला हवं. 2.नकारात्मक ऊर्जांपासून दूर रहा रोज सकाळी मेडिटेशन किंवा ऊ कार केल्यानं आपल्या शरीरात चांगल्या लहरी निर्माण होतात. दिवसभरात तुमच्या भोवती अनेक प्रसंग घडतात त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. अशावेळी आपल्या विचारांवर त्याचा नकारात्मक प्रभाव पडणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. तुम्ही जेवढं सकारात्मक राहाल तेवढा दिवस उत्तम जाईल. 3.स्वत:ची मत ठरवा मत योग्य पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करा आपल्याला स्वत:चं मत किमान ठरवता आलं पाहिजे. आपलं मत साध्या सोप्या आणि कोणत्याही पद्धतीनं ते उद्धट वाटणार नाही अशा शब्दात मांडता आलं पाहिजे. त्याचा चांगला परिणाम तुमचं काम आणि पारिवारिक जीवनावर होऊ शकतो. 4.निर्णय क्षमता जगाचा सल्ला घ्या पण कोणताही निर्णय घेताना तो स्वत: विचार करून घ्या. कारण चांगलं काय किंवा वाईट काय दोन्ही गोष्टी घडल्या तरी आपला निर्णय असतो. इतरांपेक्षा थोडं वेगळा विचार करण्याचा प्रयत्न करा. 5.आनंदी रहा. सतत तणाव, दु:ख यामुळे आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होत असतो. स्वत:साठी आनंदी राहण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक दिवस आपल्याला चांगला वाटतो. आपले पाय खेचणारे आहेत त्यामुळे तुम्ही कायम आनंदी असाल तर त्याचा तुमच्या कामावर चांगला परिणाम होणार आहे. हेही वाचा-2020 राशीभविष्य : जाणून घ्या नव्या वर्षात कसं असेल तुमच्या राशीचं भविष्य 6.कायम स्वत:ला प्रोत्साहन द्या. आपल्याला इतर कोणीही प्रोत्साहन दिलं नाही तरीही आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो हे कायम लक्षात ठेवा. अशावेळी आरश्यामध्ये स्वत:सोबत बोलण्याचा प्रयत्न करा. स्वत:ला प्रोत्साहन देणं आवश्यक आहे. एपीजे अब्दुल कलामांनी एक खूप सुंदर वाक्य सांगितलं आहे. तुम्ही तुमचं भविष्य बदलू शकत नाही पण तुमच्या सवयी नक्की बदलू शकता. तुम्ही सवयी बदलल्या तर त्याचा परिणाम नक्कीच भविष्यावर होऊ शकतो. 7.करा आणि शिका अशी कोणतीही समस्या नाही ज्याचं उत्तर नाही प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे. पण तुम्हाला प्रश्न किंवा नेमकी समस्या काय आहे हेच कळलं नाही तर त्याचं उत्तर शोधता येणार नाही. त्यामुळे नेमकी समस्या शोधण्याचा प्रयत्न केला तर उत्तर मिळू शकतं. या जगात कोणीही परफेक्ट नाही. प्रत्येकजण अनुभव आणि प्रयोगातून शिकतो. 8.ताण घेऊ नका रोज सकाळी उठल्यावर व्यायाम नक्की करा. तणाव कमी करण्याचा हा एक अतिशय महत्त्वाचा उपाय आहे. रोज किमान ३० मिनिटे सकाळी कोवळ्या वातावरणात व्यायाम करावा.व्यायामासोबत रोज सकाळी चिंतन करा. याने शरीरातील सगळा थकवा निघून जाईल. त्याचबरोबर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सकाळी गाणी सुद्धा ऐकू शकता. याने तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होऊ शकते. 9. नियोजन करा. आयुष्यात नियोजनाला आणि वेळेला फार महत्त्व आहे. एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही आणि चुकलेलं नियोजन तुमचा सगळा दिवस, वेळ आणि वर्ष संकट ओढवू शकतो. प्रत्येक छोट्या गोष्टीचं नियोजन केल्यानं ती गोष्ट यशस्वी होण्यासाठी मदत होते. आहार आणि छंद 10. नव्या वर्षात उत्तम आहार आणि आपला छंद नियमित ठेवण्यावर भर द्या. दिवसभरातील काही मिनिटं तुमचा छंद जोपासला तर क्षीण दूर होतो आणि एक समाधानही मिळतं. यासोबत उत्तम आणि निरोगी आरोग्यासाठी आहार आणि झोप महत्त्वाची असते. त्याचं गणित चुकली मग आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो आणि पर्यायाने कामावरही. हेही वाचा-पार्टी करा, पण सांभाळून! प्यायलेल्या माणसाचा तोल जाण्यामागे हे आहे कारण
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Health lifestyle, Lifestyle, Lifestyle news

    पुढील बातम्या