मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

New Year 2022: नवीन वर्षाची सुरुवात 'शिवरात्री'नं, जाणून घ्या जानेवारी महिन्यातील सण आणि उत्सवांची List

New Year 2022: नवीन वर्षाची सुरुवात 'शिवरात्री'नं, जाणून घ्या जानेवारी महिन्यातील सण आणि उत्सवांची List

 येणाऱ्या वर्षातील संपूर्ण जानेवारी महिना धार्मिक लोकांसाठी (Religious people) मोठी पर्वणीच आहे. या महिन्यात विविध धार्मिक व्रतं (Fasting) आणि उत्सव आहेत.

येणाऱ्या वर्षातील संपूर्ण जानेवारी महिना धार्मिक लोकांसाठी (Religious people) मोठी पर्वणीच आहे. या महिन्यात विविध धार्मिक व्रतं (Fasting) आणि उत्सव आहेत.

येणाऱ्या वर्षातील संपूर्ण जानेवारी महिना धार्मिक लोकांसाठी (Religious people) मोठी पर्वणीच आहे. या महिन्यात विविध धार्मिक व्रतं (Fasting) आणि उत्सव आहेत.

नवी दिल्ली, 31 डिसेंबर: आज यावर्षाचा (2021) शेवटचा दिवस म्हणजे 31 डिसेंबर आहे. अवघ्या काही तासांनंतर नवीन वर्षाचं (2022) (New Year) आगमन होणार आहे. सध्या जगभरातील लोक सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं नवीन वर्षाचं स्वागत करतो. तरुण पिढी मित्रांसोबत पार्ट्या करण्याला प्राधान्य देते तर ज्येष्ठ नागरिक देवाचं (God) नामस्मरण करून नवीन वर्षाचं स्वागत करतात. येणाऱ्या वर्षातील संपूर्ण जानेवारी महिना धार्मिक लोकांसाठी (Religious people) मोठी पर्वणीच आहे. या महिन्यात विविध धार्मिक व्रतं (Fasting) आणि उत्सव आहेत.

विशेष म्हणजे नवीन वर्षाची सुरुवातच मासिक शिवरात्रीनं (Masik Shivratri) होत आहे. वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्यावर शंकराची (Lord Shiva) कृपा व्हावी, अशी इच्छा आस्तिक लोकांची नक्कीच असेल. याशिवाय संपूर्ण जानेवारी महिन्यात पौष अमावस्या, विनायकी चतुर्थी, गुरु गोविंदसिंग जयंती, स्वामी विवेकानंद जयंती, पुत्रदा एकादशी, मकर संक्रांती (Makar Sankranti), पोंगल, लोहरी, पौष पौर्णिमा, संकष्टी चतुर्थी, षट्तिला एकादशी सारखे महत्वाचे उपवास आणि उत्सव आहेत.

जानेवारी 2022 महिन्यातील उपवास आणि उत्सव

1 जानेवारी, शनिवार: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मासिक शिवरात्री आहे.

02 जानेवारी, रविवार: पौष अमावास्या

03 जानेवारी, सोमवार: चंद्र दर्शन, सोमवार उपवास

06 जानेवारी, गुरुवार: विनायक चतुर्थी, वरद चतुर्थी

08 जानेवारी, शनिवार: षष्ठी

09 जानेवारी, रविवार: गुरु गोविंदसिंग जयंती

10 जानेवारी, सोमवार: दुर्गाष्टमी उपवास

12 जानेवारी, बुधवार: स्वामी विवेकानंद जयंती, राष्ट्रीय युवा दिवस

13 जानेवारी, गुरुवार: पौष पुत्रदा एकादशी, वैकुंठ एकादशी

14 जानेवारी, शुक्रवार: मकर संक्रांती, पोंगल, उत्तरायण, लोहरी, खरमास समाप्ती, कूर्म द्वादशी उपवास

15 जानेवारी, शनिवार: शनी प्रदोष उपवास

17 जानेवारी, सोमवार: पौष पौर्णिमा, सत्य व्रत, माघ स्नान प्रारंभ

21 जानेवारी, शुक्रवार: लंबोदर संकष्टी चतुर्थी (सकट चौथ)

25 जानेवारी, मंगलवार: कालाष्टमी

26 जानेवारी, बुधवार: प्रजासत्ताक दिन

28 जानेवारी, शुक्रवार: षट्तिला एकादशी

30 जानेवारी, रविवार: प्रदोष उपवास, मासिक शिवरात्री

या यादीत दिलेले सर्व उपवार आणि सण महत्त्वाचे आहेत. असं असलं तरी पुत्रदा एकादशी, मकर संक्रांती, संकष्टी चतुर्थी आणि शनी प्रदोष व्रताला सर्वांत जास्त महत्व आहे. पुत्रदा एकादशी (Putrada Ekadashi) आणि शनी प्रदोष हे दोन उपवास पुत्रप्राप्तीसाठी ठेवले जातात. संकष्टीचा उपवास केल्यानं आपल्यावर श्रीगणेशाची (Lord Ganesha) कृपा होऊन आयुष्यातील संकटं दूर होतात. याशिवाय वर्षातील पहिला मोठा सण असलेल्या मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाच्या पाण्याने अंघोळ करून दान करणं शुभ मानलं जातं.

हेही वाचा-  New Year 2022: नव्या वर्षात ग्राहकांना बसणार आर्थिक झळ, 'या' गोष्टी होणार महाग

एकूणच जानेवारी महिन्यासह संपूर्ण वर्षभरात विविध सण आणि उत्सवांची रेलचेल असणार आहे. तुम्ही आपापल्या पद्धतीनं त्यासाठी तयारी करू शकता.

First published:

Tags: Makar Sankranti, New year