Elec-widget

न्यू इअर पार्टीसाठी ट्राय करा हे जॅकेट

न्यू इअर पार्टीसाठी ट्राय करा हे जॅकेट

फक्त स्टाइलच्या नावावर वाटेल तेवढा पैसा खर्च करुन कोणतीही गोष्ट घेऊ नये.

  • Share this:

न्यू इअर पार्टीसाठी प्रत्येकजण अनेक दिवसांपासून तयारी करत असतं. सेमी कॅज्युअल कपडे घालायचे की कॅज्युअल कपडे घालायचे याचा विचार जर तुम्ही करत असला तर आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय घेऊन आलो आहोत.

न्यू इअर पार्टीसाठी प्रत्येकजण अनेक दिवसांपासून तयारी करत असतं. सेमी कॅज्युअल कपडे घालायचे की कॅज्युअल कपडे घालायचे याचा विचार जर तुम्ही करत असला तर आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय घेऊन आलो आहोत.

जॅकेटचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक जॅकेटमुळे वेगळा लूक मिळतो. खास तरुणांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जॅकेटची क्रेज पाहायला मिळते. हे जॅकेट वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहज वापरता येतात. साधारणपणे जॅकेट हे टी-शर्ट वर घातले जातात. परंतु सध्या शर्टवर जॅकेट घालण्याचा ट्रेंड सुरू आहे.

नेमकी जॅकेट कोणत्या प्रकारचं आहे त्यावर ते कशावर घातलं जाईल हे अवलंबून असतं. लेदरची जॅकेट अधिक महागडी असतात. परंतु त्याला पर्याय असलेले अनेक फॅब्रिक सध्या बाजारात उपलब्ध आहेत. स्पायकर सारखा ब्रॅण्ड डेनिम जॅकेट डिझाइन करायला अधिक पसंती देतात. चला तर मग या न्यू इअरला तुम्ही कोणत्या प्रकारचं जॅकेट घालू शकता ते पाहू...

Loading...

फिट जॅकेट तरुणाईमध्ये फिट जॅकेटला अधिक पसंती दिली जाते. याला क्लासी लूक दिलेला असून, ते शरीराला अगदी घट्ट बसतं. जर जॅकेटला एकच लेअर असेल तर जॅकेटच्या आत तुम्ही टी- शर्ट वापरु शकता. हिवाळ्यात उबदारपणासाठी हे जॅकेट अत्यंत उपयोगी आहे.

फिट जॅकेट
तरुणाईमध्ये फिट जॅकेटला अधिक पसंती दिली जाते. याला क्लासी लूक दिलेला असून, ते शरीराला अगदी घट्ट बसतं. जर जॅकेटला एकच लेअर असेल तर जॅकेटच्या आत तुम्ही टी- शर्ट वापरु शकता. हिवाळ्यात उबदारपणासाठी हे जॅकेट अत्यंत उपयोगी आहे.

स्टाईल जॅकेट आधुनिक हवं की क्लासिक हा वाद कधीही न संपणारा आहे. आपल्या गरजा लक्षात घेऊन तुम्हाला नेमकी कशाप्रकारचं जॅकेट हवं आहे ते निवडू शकता. जर हे जॅकेट तुम्हाला घ्यायचे असेल, तर तुम्ही क्लासिक जॅकेटसाठी चांगली रक्कम मोजलीत तरी चालेल. हे जॅकेट वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये येते. स्पायकर जॅकेटसुद्धा अशा प्रकारचे जॅकेट डिझाइन करतं. परंतु हे जॅकेट महागडे असल्याने खरेदी करताना आपल्या बँक अकाउंटचा विचार केलेला बरा.

स्टाईल जॅकेट
आधुनिक हवं की क्लासिक हा वाद कधीही न संपणारा आहे. आपल्या गरजा लक्षात घेऊन तुम्हाला नेमकी कशाप्रकारचं जॅकेट हवं आहे ते निवडू शकता. जर हे जॅकेट तुम्हाला घ्यायचे असेल, तर तुम्ही क्लासिक जॅकेटसाठी चांगली रक्कम मोजलीत तरी चालेल. हे जॅकेट वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये येते. स्पायकर जॅकेटसुद्धा अशा प्रकारचे जॅकेट डिझाइन करतं. परंतु हे जॅकेट महागडे असल्याने खरेदी करताना आपल्या बँक अकाउंटचा विचार केलेला बरा.

जॅकेट वर्सटॅलिटी कोणतंही जॅकेट बनवायला त्याचं कापड सर्वोत्तम असणं फार आवश्यक आहे. कापड हे मजबूत, मऊ, उबदार तितकंच वॉटरप्रूफ असणं आवश्यक असतं. परंतु फक्त स्टाइलच्या नावावर वाटेल तेवढा पैसा खर्च करुन कोणतीही गोष्ट घेऊ नये. जॅकेट हे खर्च आणि वापर या दोन्हीसाठी परवडणारं असलं पाहिजे. जॅकेटच्या कपड्यांमध्ये अनेक प्रकार असतात. सर्व साधारणपणे लेदर, सुएड, सूती अशा प्रकारात जॅकेट मिळतात. पण आता तुमच्या गरजेनुसार लिनन, स्पायकर डेनिम अशा नवीन पर्यायांचाही तुम्ही विचार करू शकता.

जॅकेट वर्सटॅलिटी
कोणतंही जॅकेट बनवायला त्याचं कापड सर्वोत्तम असणं फार आवश्यक आहे. कापड हे मजबूत, मऊ, उबदार तितकंच वॉटरप्रूफ असणं आवश्यक असतं. परंतु फक्त स्टाइलच्या नावावर वाटेल तेवढा पैसा खर्च करुन कोणतीही गोष्ट घेऊ नये. जॅकेट हे खर्च आणि वापर या दोन्हीसाठी परवडणारं असलं पाहिजे. जॅकेटच्या कपड्यांमध्ये अनेक प्रकार असतात. सर्व साधारणपणे लेदर, सुएड, सूती अशा प्रकारात जॅकेट मिळतात. पण आता तुमच्या गरजेनुसार लिनन, स्पायकर डेनिम अशा नवीन पर्यायांचाही तुम्ही विचार करू शकता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 30, 2018 07:36 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...