मुंबई, 31 डिसेंबर: 2022 वर्ष मावळतीकडे झुकलंय. जुनं वर्ष संपून नवं वर्ष 2023 सुरु व्हायला आता काहीच काळ बाकी आहे. तुम्हीसुद्धा नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असाल. नवं वर्ष नवी स्वप्न, नव्या आशा घेऊन येतं. नव्या वर्षासाठी तुम्ही काही संकल्प केले असतील. हे संकल्प अंमलात कसे आणायचे याचं नियोजनही केलं असेल. संपणाऱ्या वर्षाचे आभार मानत नवीन वर्षात काहीतरी हटके करण्यावर तुमचा भर नक्की असेल. आपल्याकडे जे चांगलं आहे ते आणखी समृद्ध करण्याचा तुमचा प्रयत्न असेलच, शिवाय भूतकाळात तुम्ही ज्या काही चुका केल्या असतील त्या चुका टाळण्याचाही तुमचा प्रयत्न असेल. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तुमची सुरु झालेली पार्टी आता नवीन वर्षाच्या स्वागतासोबतच थांबेल. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी तुम्ही सज्ज असालच. पण तरीही तुम्ही एका गोष्टीचा विचार नक्की करत असाल, ती म्हणजे तुमच्या मित्रांना, नातेवाईंकाना, पाहुणेमंडळींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा कशा द्याव्यात. आता सर्वांना भेटून शुभेच्छा देणं तर शक्य नाही, मग आता पर्याय उरतो. तो व्हॉट्सअपचा. तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुंदर शुभेच्छापर संदेश पाठवून तुमच्या आप्तेष्टांना शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी तुम्ही त्यांना खालील मॅसेज पाठवू शकता.
1. गेलं ते वर्ष, गेला तो काळ,
आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2023 साल,
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा...
2. चला या नवीन वर्षाचं स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना, नव्याने फुलवुया...
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
हेही वाचा: नववर्षात या 3 राशीच्या लोकांचे लव्ह लाईफ झकास! यांना घ्यावी लागेल काळजी
3. सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.
नवीन संकल्प नवीन वर्ष...
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
4. सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा,
नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू,
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत
या प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
5. पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: New year 2023, Whatsapp, Year Ender