जाणून घ्या नव्या वर्षातले फूड ट्रेंड्स, 2021 मध्ये या 7 खाद्यपदार्थांची असेल क्रेझ

जाणून घ्या नव्या वर्षातले फूड ट्रेंड्स, 2021 मध्ये या 7 खाद्यपदार्थांची असेल क्रेझ

आरोग्यासाठी खायचं की चवासाठी? हा कायमच कळीचा प्रश्न असतो. या नव्या वर्षात मात्र लोक चवीहून आरोग्याचा जास्त विचार करतील असं चित्र आहे.

  • Share this:

मुंबई, 4 जानेवारी : निरोगी (healthy) आणि फिट (fit) राहण्यासाठी लोक निरनिराळ्या प्रकारचं डायट (diet) फॉलो करतात. त्यात एक आहे प्लांट बेस्ड डायट (plant based diet). अर्थात वनस्पती ज्या डाएटचा मुख्य भाग आहेत असं डायट.

यंदाच्या 2021 या वर्षात लोक प्लांट बेस्ड डायटवर जास्त विसंबून राहतील असं कळतं आहे. आहारतज्ञांसह पोषणतज्ञही या प्रकारच्या डायटला शरीरासाठी अतिशय फायदेशीर मानतात.

प्लांट बेस्ड डायटमध्ये काय खाल्लं जातं?

या प्रकारच्या डाएटमध्ये असं अन्न (food) खाल्लं जातं ज्याचा मुख्य स्रोत वनस्पती हा आहे. यात फळं, भाज्या, धान्य, डाळी आणि शेंगा, सुकेमेवे यांचा समावेश होतो. मांस, मासळी, अंडे, चिकन किंवा प्रोसेस्ड फूड यात समाविष्ट नसतं.

यावर्षी मुख्यतः हे प्लांट बेस्ड फूड यादीत लोकप्रिय असतील

फुलकोबी किंवा फ्लॉवर

फ्लॉवरचे फायदे पाहता 2021 मध्ये ही भाजी मोठ्या प्रमाणात खाल्ली जाईल. विविध पदार्थांमध्ये फ्लॉवर टाकून ते तयार केले जातील. अगदी फुलकोभीचं सँडविचही तुम्हाला खायला मिळू शकेल. आहारतज्ज्ञ सामंथा केसेट्टी यांच्या मते, लोक भाज्या गरज म्हणून कमीच खातात. मात्र त्यांना वेगळ्या आणि चविष्ट प्रकारे भाज्या बनवून दिल्या तर ते प्रमाण नक्कीच वाढतं.

प्लांट बेस्ड मीट

2021 मध्ये प्लांट बेस्ड मीटसुद्धा लोकप्रिय होईल. यात विविध वनस्पतींना अगदी मांसासारखं शिजवलं आणि सर्व्ह केलं जातं. अमेरिकेच्या बियॉंड मीट या कंपनीनं 2021 च्या सुरवातीला असा एक प्लांट बेस्ड बर्गर आणायची घोषणा केली. यात मांसाच्या तुलनेत 55% कमी फॅट असेल.

अल्कोहोल नसलेली पेयं

2021 मध्ये मद्याऐवजी हेल्दी ड्रिंक्सला लोकांचं प्राधान्य असेल. यात अल्कोहोल फ्री बीअरचाही समावेश आहे. यात अल्कोहोल नसतंच किंवा मग नगण्य असतं. मात्र बीअरच्या चवीत काहीच फरक नसतो. यातून शरीराला काही अपायही होत नाही.

खमंग स्नॅक्स

तुम्हाला खमंग स्नॅक्स आवडत असतील तर वनस्पतीजन्य आहारात स्नॅक्सचाही समावेश करता येईल. ब्लॅक बीन्स, लाल शिमला मिर्ची, ओट्स, बदाम आणि केळ्यांपासून बनलेले स्नॅक्स लोकांमध्ये हळूहळू लोकप्रिय होत आहेत.

प्लांट बेस्ट प्रोबायोटिक्स

2021 मध्ये डेअरी बेस्ड योगर्टच्या जागी वीगन योगर्ट आणि आलमन्ड योगर्ट बरंच लोकप्रिय होत आहे. स्मूदीपासून ते इतरही अनेक प्रकारची पेयं प्रोबायोटिक्सपासून बनवली जातील. आरोग्य विशेषज्ञ मानतात, की 2021 मध्ये प्रोबायोटिक्स पेयं जास्त लोकप्रिय असतील. यातून चवीसह प्रतिकारशक्तीही वाढेल.

हर्बल ड्रिंक

अल्कोहोलफ्री ड्रिंकव्यतिरिक्त 2021 मध्ये हर्बल ड्रिंकही ट्रेंडमध्ये असतील. या ड्रिंक्स थकवा दूर करत प्रतिकारशक्तीही वाढवतात. लो कॅलरी ड्रिंक्स डोकं शांत करतात आणि त्यातून झोपही चांगली येते. ऊर्जा वाढण्यासही यातून मदत होते.

Published by: News18 Desk
First published: January 3, 2021, 11:27 PM IST

ताज्या बातम्या