मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Horoscope 2021 Virgo: कन्या राशीला मिळू शकेल गुप्त स्त्रोतांमधून धन, पाहा नव्या वर्षाचं राशीभविष्य

Horoscope 2021 Virgo: कन्या राशीला मिळू शकेल गुप्त स्त्रोतांमधून धन, पाहा नव्या वर्षाचं राशीभविष्य

New Year 2021 Rashifal: कन्या राशीच्या व्यक्तींना वर्षाची सुरुवात व्यापारासाठी चांगली ठरेल. पाहा राशीभविष्य (Virgo) काय सांगत आहे

New Year 2021 Rashifal: कन्या राशीच्या व्यक्तींना वर्षाची सुरुवात व्यापारासाठी चांगली ठरेल. पाहा राशीभविष्य (Virgo) काय सांगत आहे

New Year 2021 Rashifal: कन्या राशीच्या व्यक्तींना वर्षाची सुरुवात व्यापारासाठी चांगली ठरेल. पाहा राशीभविष्य (Virgo) काय सांगत आहे

कन्या राशींच्या (Virgo) व्यक्तींसाठी हे नवं वर्ष (new year 2021 Rashifal) कसं जाईल पाहू या. करिअर (career) आणि व्यवसाय (business) यावर्षी करिअरच्या क्षेत्रात कन्या राशीसाठी गोष्टी संमिश्र असतील. जे लोक काम करण्यापेक्षा जास्त बोलण्याला, फुशारक्या मारण्याला प्राधान्य देतात त्यांच्यापासून  दूर रहा. अन्यथा तुमची प्रतिमा डागाळेल. या राशीतील काही लोक वर्षाच्या शेवटच्या महिन्यांत नोकरी बदलण्याचा विचार करू शकतात. मात्र तुम्ही हा निर्णय अगदी काळजीपूर्वक घ्या. या राशीच्या व्यापारी लोकांसाठी वर्षाची सुरवात चांगली असेल. वर्षाच्या मध्यभागी मात्र जरा सावधगिरी बाळगली पाहिजे. भागीदारीतला व्यवसाय करत असल्यास, या काळात कोणतीही मोठी गुंतवणूक करणे टाळा. आर्थिक आणि कौटुंबिक जीवन पैशाशी (money) संबंधित काही अडचणींमुळे यावर्षी या राशीतील लोक थोडे अस्थिर होऊ शकतात. परंतु परिस्थिती इतकी प्रतिकूल कधीच होणार नाही की तुमचं अगदी नियंत्रणच सुटेल. या राशीच्या काही व्यक्तींना यावर्षी गुप्त स्त्रोतांमधून धनलाभ होऊ शकेल. वर्षाच्या शेवटच्या महिन्यांत मात्र तुम्ही तुमचा खर्च नक्की तपासा. हे वर्ष कौटुंबिक जीवनासाठी खूप चांगलं असल्याचं खात्रीनं सांगितलं जाऊ शकत नाही. घरातील लोकांशी भांडणं  होऊ शकतात म्हणून त्यांच्याशी जरा समजूतदारपणे वागा. वर्षाची सुरुवात मात्र कौटुंबक जीवनासाठी चांगली असेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन प्रेमसंबंधात गुंतलेल्या लोकांसाठी हे वर्ष सामान्य राहील अशी अपेक्षा आहे. आपण वर्षाच्या मधल्या काळात आपल्या प्रियकर वा प्रेयसीसोबत चांगला वेळ घालवाल. मात्र वर्षाची सुरुवात आपल्यासाठी फार चांगली नसेल. यंदा आपल्या प्रिय व्यक्तीसोबत भांडण, वाद टाळण्याचा प्रयत्न करा. या राशीच्या विवाहित व्यक्तींसाठी हे वर्ष चांगले असेल. तुमच्या जोडीदाराला त्यांच्या क्षेत्रात प्रगती करता येईल. परिणामी घरातही वातावरण चांगले राहील. तुमचं अपत्य चांगलं काम करून समाजात तुमचा मान वाढवेल. शिक्षण आणि आरोग्य यावर्षी कन्या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात अडचणींना सामोरे जावे लागेल. मात्र परंतु शिक्षक आणि पालकांची मदत घेतल्यास तुम्हाला चांगली कामगिरी करता येईल. उच्च शिक्षण घेणाऱ्या या राशीच्या लोकांना त्यांच्या प्रयत्नांची शुभ फळं मिळू शकतात. या वर्षाच्या मध्यात या राशीचे काही लोक परदेशात जाऊन शिक्षण घेण्याच्या प्रयत्नात यशस्वी होतील. या राशीच्या व्यक्तींचं आरोग्य जीवन पाहता हे वर्ष त्यासंदर्भानं उत्तम राहील अशी अपेक्षा आहे. तरीही आपण पचनस्वास्थ्य व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्या आहाराकडे लक्ष देणं आवश्यक आहे.
First published:

Tags: Astrology and horoscope, New year

पुढील बातम्या