• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • कॅनडात आढळला दुर्मीळ विषाणूजन्य आजार; 12 वर्षांच्या मुलाची जीभ पिवळी पडली, इम्युन सिस्टीमच करतेय हल्ला!

कॅनडात आढळला दुर्मीळ विषाणूजन्य आजार; 12 वर्षांच्या मुलाची जीभ पिवळी पडली, इम्युन सिस्टीमच करतेय हल्ला!

कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्तीचं महत्त्व अधिकच अधोरेखित झालं आहे. परंतु, ही रोगप्रतिकारक शक्ती एका विषाणूच्या (Virus) संक्रमणाला कारणीभूत ठरल्याचं या नव्या आजारात दिसतंय.

  • Share this:
ओटावा, कॅनडा, 30 जुलै: सध्या जगातील अनेक देश कोरोनाचा (Coronavirus) सामना करत आहेत. एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे काही बुरशीजन्य आणि विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. कोणत्याही जीवाणू किंवा विषाणूपासून शरीराचे संरक्षण होण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) चांगली असणं आवश्यक असतं. कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्तीचं महत्त्व अधिकच अधोरेखित झालं आहे. परंतु, ही रोगप्रतिकारक शक्ती एका विषाणूच्या (Virus) संक्रमणाला कारणीभूत ठरल्याचं कॅनडामध्ये (new virus in Canada) दिसून आलं आहे. कॅनडातील 12 वर्षांच्या मुलाला एप्सटिन बार (Epstein Barr) या विषाणू संसर्गामुळे कोल्ड एग्लूटिनीन (Cold Agglutinin) हा दुर्मिळ आजार (Disease) झाला आहे. हा आजार नेमका काय असतो, त्याची लक्षणे, उपाय काय आहेत, याविषयी सविस्तर माहिती अशी... एप्सटिन-बार या विषाणूच्या संसर्गामुळे कोल्ड एग्लूटिनीन या दुर्मिळ ऑटोइम्युनाइन आजाराचा रुग्ण कॅनडात आढळून आला असून, त्याबाबतचे वृत्त दैनिक भास्करने दिले आहे. त्यानुसार, कोल्ड एग्लूटिनीन आजारामुळे या 12 वर्षाच्या मुलाची जीभ पूर्णतः पिवळीधमक (Yellow) झाली आहे. रोगापासून बचाव करणारी रोगप्रतिकारक शक्तीच जेव्हा शरीरावर हल्ला करु लागते, तेव्हा शरीरातील लाल रक्तपेशी संपुष्टात येतात. त्यातच या मुलाला एप्सटिन बार या विषाणूचा संसर्ग झाला आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. या मुलाला जेव्हा कॅनडातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा त्याच्या घशात खवखव होत होती. युरिनला (Urine) पिवळी होत होती, तसेच पोटदुखीचा त्रास होत होता आणि सर्व त्वचा पिवळी पडली होती. ही लक्षणं पाहता त्याला कावीळ झाली असावी, अशी शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केल्याचं द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन मध्ये प्रसिध्द झालेल्या अहवालात म्हणलं आहे. एप्सटिन बार या विषाणूचा प्रसार लाळेच्या (Saliva) माध्यमातून होतो आणि तो थेट रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतो. यामुळे बाधित रुग्णामध्ये थकवा, अचानक ताप येणं, भूक मंदावणं, वजन कमी होणं, घशाला सूज येणं, त्वचेवर चट्टे उठणं आदी लक्षणं दिसतात. मात्र यावर उपचार उपलब्ध असून, 2 ते 4 आठवड्यात रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो. पुन्हा मास्कसक्ती! निम्म्या देशाने लस घेऊनही अमेरिकेत 24 तासांत लाखभर रुग्ण कोल्ड एग्लूटिनीन हा आजार झाल्यावर रुग्णानं पुरेशी काळजी घेणं आवश्यक आहे. - एप्सटिन बार विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर होणाऱ्या कोल्ड एग्लूटिनीन या आजारात रुग्णानं पुरेशी विश्रांती (Rest) घ्यावी. शरीरातील पाणी कमी होऊ देऊ नये, डिहायड्रेशन झाल्यास ओआरएस (ORS) घ्यावे. - शरीरातील पाणी आणि पोषक घटक कमी होऊ नयेत यासाठी ताज्या फळांचे ज्यूस, नारळपाणी सेवन करावे. - घशाला सूज आल्यास कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या कराव्यात. - तीव्र अंगदुखी असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानं पेनकिलर (Painkiller) घ्यावी. एप्सटिन बार या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर कोल्ड एग्लूटिनीन नावाचा आजार होतो. यामुळे शरीरातील लाल रक्त पेशी नष्ट होऊ लागतात आणि बिलीरुबीन नावाचे रसायन तयार होऊ लागते. या रसायनामुळे त्वचा आणि जीभ पिवळी पडत असल्याचं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने सांगितले. शेळीच्या रक्तापासून कोरोनाच्या अँटिबॉडिज कॅनडातील ज्या 12 वर्षाच्या मुलाला कोल्ड एग्लूटिनीन हा आजार झाल्याचे स्पष्ट होताच. त्याची सखोल वैद्यकिय तपासणी करण्यात आली. यावेळी त्याला रक्तक्षय म्हणजेच ॲनिमिया देखील झाला होता. ब्लड ट्रान्सफ्युजन आणि स्टेरॉईडच्या मदतीने उपचार करत 7 आठवड्यानंतर रोगप्रतिकार शक्ती नियंत्रणात आणण्यात यश आले. आता या मुलाची प्रकृती उत्तम असून, त्वचा आणि जीभेचा रंगही सामान्य झाला आहे. विशेष म्हणजे हा आजार प्रामुख्याने लहान मुलांना होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
First published: