• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • वाढतं वय लपवण्याचा नवा ट्रेंड; कमी वयातच मुली करू लागलेत Botox ट्रीटमेंट

वाढतं वय लपवण्याचा नवा ट्रेंड; कमी वयातच मुली करू लागलेत Botox ट्रीटमेंट

Botox Trends In Young Girls : दोन मुलांची आई आणि सॅनिटायझर कंपनीच्या संस्थापक केट थॉम्पसन यांनी यासाठी 5 लाख रुपये खर्च केले आहेत, केट म्हणतात, 'यामुळं जो आत्मविश्वास येतो, त्याची काही किंमत करता येणार नाही.'

 • Share this:
  नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर : आजच्या युगात स्वतःला सुंदर आणि आकर्षक ठेवण्याची इच्छा कोणाला नसते, प्रत्येकाला आयुष्यभर तरुण आणि सुंदर दिसायचं असतं. पण वय कुठं लपतं का? वाढत्या वयाच्या रेषा चेहऱ्यावर काळानुसार उमटत राहतात. आजकाल या रेषा लपवण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे उपचारही उपलब्ध आहेत. डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, शेकडो मुली आता 25 ते 30 व्या वर्षीच चेहऱ्यावर म्हातारपण येऊ नये, यासाठी प्रयत्न करत आहेत. या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, लंडनमध्ये राहणाऱ्या 30 वर्षीय स्टिना सँडर्सला 4 महिन्यांपूर्वी लक्षात आलं की, तिच्या कपाळावर काही रेषा उमटल्या आहेत. सँडर्स हिच्याकडं वृद्धत्व स्वीकारायचं किंवा नाही हे दोन पर्याय होते. मात्र, तिनं या रेषा नाहीशा करून टाकण्याचा निश्चय केला. व्यवसायाने मानसोपचारतज्ज्ञ असलेली सँडर्स दर 3 ते 4 महिन्यांनी रिंकल्स रिलॅक्सिंग इंजेक्शन (Wrinkles Relaxing Injection) म्हणजेच बोटॉक्स (Botox Trends In Young Girls) घेते. डोळ्याच्या आसपासच्या त्वचेवरील उपचारासाठी एकावेळी सुमारे 15 हजार खर्च येतो. कुटुंबीय आणि डॉक्टरांच्या नकारानंतरही तिने हे उपचार सुरूच ठेवले. तज्ज्ञ काय म्हणतात ब्युटी एक्सपर्ट अना साकिन्यते म्हणतात की, लोकांचा असा विश्वास आहे की, त्यांना वयाच्या 50 व्या वर्षापर्यंत या उपचाराची गरज नाही, शिवाय या वयात काळजी घेऊनही अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. म्हणूनच हा छोटा डोस 'बेबी बोटॉक्स'चा ट्रेंड सुरू झालाय. जेव्हा तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी बोटॉक्स सुरू करता तेव्हा तुम्ही सुरकुत्या रोखू शकता. 25 ते 30 या वयात बोटॉक्स झालेल्या मुलींची संख्या आता झपाट्यानं वाढत आहे. 50-60 वर्षांच्या महिला पूर्वी या ट्रीटमेंट घ्यायच्या, पण आता त्या त्यांच्यासोबत 20-25 वर्षीय त्यांच्या मुलींनाही घेऊन येत आहेत. हे वाचा - Flipkart ची हेल्थकेअर सेक्टरमध्ये एन्ट्री; ऑनलाईन औषधेही मागवता येणार फायदा सांगणाऱ्यांचा हा तर्क दोन मुलांची आई आणि सॅनिटायझर कंपनीच्या संस्थापक केट थॉम्पसन यांनी यासाठी 5 लाख रुपये खर्च केले आहेत, केट म्हणतात, 'यामुळं जो आत्मविश्वास येतो, त्याची काही किंमत करता येणार नाही.' सोशल मीडियाचा प्रभाव 28 वर्षीय कॅरोलिना कोटलोस्काने नुकतेच उपचार सुरू केले आहेत. तिच्या या निर्णयात सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे, असे तिचे मत आहे. ती म्हणते, “सेल्फी संस्कृतीत स्वत:ला शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने सादर करणं महत्त्वाचं आहे. पूर्वी मी फोटो पोस्ट करण्यापूर्वी खूप मेकअप आणि विविध फिल्टर्स लावायचो, आता मला ते करण्याची गरज नाही. काही डॉक्टरांचे म्हणणे आहे की, याचा जास्त वापर केल्यानं त्वचा पातळ होणं, आकार बदलणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. हे वाचा - Farm Laws मागे घेतल्यानंतर मोदी सरकारबद्दल पाकिस्तानी माध्यमांनी काय म्हटलंय वाचा बोटॉक्समध्ये 70 टक्के वाढ बोटॉक्स चेहऱ्याच्या स्नायूंच्या वरवरच्या थरावर लागू केलं जातं. त्यामुळं स्नायूंना आराम मिळतो आणि त्यांचे आकुंचन थांबते. त्वचा तज्ज्ञ डॉ. जॉनक्विल चॅन्ट्रे यांच्या मते, आधीच अस्तित्वात असलेल्या आणि खोल सुरकुत्या घालवण्यासाठी बोटॉक्सचा उपयोग नाही. म्हणून ही शस्त्रक्रिया करायची असल्यास लवकर करण्याचा सल्ला दिला जातो. हा कालावधी अतिशीत काळ मानला जातो. लवकर उपचार करणे फायदेशीर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ब्रिटिश असोसिएशन ऑफ एस्थेटिक प्लास्टिक सर्जन्स (बीएएपीएस) म्हणजेच ब्रिटिश असोसिएशन ऑफ एस्थेटिक प्लास्टिक सर्जनच्या मते, बोटॉक्समध्ये गेल्या वर्षभरात 70 टक्के वाढ झाली आहे. त्यात मुलींची संख्या मोठी आहे.
  Published by:News18 Desk
  First published: