सर्दी, खोकला, तापाशिवाय कोरोनाची आणखी नवी लक्षणं, दुर्लक्ष करू नका

सर्दी, खोकला, तापाशिवाय कोरोनाची आणखी नवी लक्षणं, दुर्लक्ष करू नका

Coronavirus च्या काही रुग्णांमध्ये सामान्य लक्षणं न दिसता इतर लक्षणं दिसत आहेत.

  • Share this:

मुंबई, 06 एप्रिल : कोरोनाव्हायरसची (coronavirus) संख्या झपाट्याने वाढते आहे. सर्दी, खोकला, ताप ही व्हायरसची सामान्य लक्षणं आहेत. तर काही रुग्णांमध्ये ही लक्षणं न दिसता इतर लक्षणं दिसत आहेत. अशाच काही लक्षणांना ओळखण्याचा प्रयत्न डॉक्टर करत आहेत.

डायरिया: कोरोनाच्या रुग्णांमध्ये डायरिया असल्याचं दिसून आलं आहे. अमेरिकन न्यूज वेबसाईट बिझनेस इन्सायडरच्या रिपोर्टनुसार कोरोनाच्या 10 पैकी एका रुग्णाला पचनसंबंधी समस्या असते.

मळमळ: लँसेट जर्नलमधील रिपोर्टनुसार चीनमध्ये कोरोनाची लागण झालेल्या फक्त 3 टक्के लोकांना डायरियाची समस्या होती. तर 5 टक्के लोकांना मळमळ जाणवत होती.

अस्वस्थता: अमेरिकेच्या वॉशिंग्टन नर्सिंग होमच्या रिपोर्टनुसार, जवळपास एक तृतीयांश लोकांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली मात्र निम्म्या लोकांमध्ये याची लक्षणं दिसली नाहीत. तर काही रुग्णांमध्ये अस्वस्थता दिसून आली.

उठण्यात त्रास: सीडीसी (Centers for Disease Control and Prevention) च्या मते, उठता येत नसेल आणि अस्वस्थता वाटत असेल तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा.

थंडी आणि स्नायूंमध्ये वेदना: WHO च्या रिपोर्टनुसार 11 टक्के लोकांमध्ये थंडी आणि 14 टक्के लोकांमध्ये स्नायूंमध्ये वेदना अशी लक्षणं दिसून आलीत. कोरोनाची गंभीर लक्षणं दिसण्यापूर्वी हे संकेत मिळतात.

डोकेदुखी आणि चक्कर: लँसेटच्या अभ्यानुसार जवळपास 8 टक्के रुग्णांना डोकेदुखीची समस्या होती तर काही जणांना चक्करही येत होती. अमेरिकेच्या क्लिव्हलँड क्लिनिकनुसार, पुन्हा पुन्हा चक्कर येणं हे गंभीर लक्षणं असू शकतं.

ही लक्षणं म्हणजे कोरोनाव्हायरचीच असतील असं नाही. मात्र खबरदारी म्हणून डॉक्टरांकडे जाऊन तपासणी जरूर करा.

90 वर्षीय आई-बापाला मुलांनी सोडलं वाऱ्यावर, पोलीस अधिकारी झाला श्रावण बाळ

कोरोनासारख्या गंभीर संकटातही कुटुंबातील व्यक्तीला अखेरचा निरोप देताना घडली चूक

 

First published: April 7, 2020, 12:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading