Home /News /lifestyle /

या खास आहाराने तुमचा मधुमेह होऊ शकतो बरा; संशोधकांनी सांगितली ही नवी पद्धत

या खास आहाराने तुमचा मधुमेह होऊ शकतो बरा; संशोधकांनी सांगितली ही नवी पद्धत

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत मधुमेह हा एक सामान्य आजार बनला आहे, जो आपल्याला कोणत्याही वयात बळी बनवू शकतो. मधुमेहाच्या बाबतीत रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे फार महत्त्वाचे आहे.

    नवी दिल्ली, 24 सप्टेंबर : नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, टाइप-2 मधुमेह (Type 2 Diabetes) एका विशेष आहाराद्वारे बरा होऊ शकतो. आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत मधुमेह हा एक सामान्य आजार बनला आहे, जो आपल्याला कोणत्याही वयात बळी बनवू शकतो. मधुमेहाच्या बाबतीत रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे फार महत्वाचे आहे. जर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित केली नाही तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. टायप 2 मधुमेह (Type 2 Diabetes) बरा होऊ शकतो शास्त्रज्ञांनी एका नवीन संशोधनातून सांगितले आहे की, विशिष्ट आहार टाइप 2 मधुमेह बरा करू शकतो. हे संशोधन नेचर कम्युनिकेशनमध्ये प्रकाशित झाले आहे. हे संशोधन ब्रिटिश कोलंबिया आणि इंग्लंडमधील टीसाइड विद्यापीठाच्या संशोधकांनी केलं आहे. संशोधनात 200 रुग्णांचा समावेश या संशोधनात संशोधकांनी 30 ते 75 वर्षे वयोगटातील मधुमेह असलेल्या 200 रुग्णांचा समावेश केला. या सर्वांना 12 आठवड्यांसाठी विशेष आहार देण्यात आला. या आहारात दररोज 850 ते 1100 कॅलरीज पेक्षा कमी कॅलरीज, दररोज 50 ग्रॅमपेक्षा कमी कार्बोहायड्रेट्स आणि उच्च प्रथिनेयुक्त अन्नाचे प्रमाण प्रतिदिन 110 ते 120 ग्रॅम ठेवण्यात आले. यासह, त्यांना फार्मासिस्टच्या संपर्कात राहण्यास सांगितले गेले, जेणेकरून ते रक्तातील ग्लुकोजच्या पातळीनुसार औषधे कमी करू शकतील. रक्तदाब आणि वजन पूर्णपणे नियंत्रणात अभ्यासात, संशोधकांना आढळले की, एक तृतीयांशपेक्षा जास्त स्वयंसेवकांनी त्यांची मधुमेहाची औषधे तीन महिन्यामध्ये कमी केली. त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी लक्षणीय सुधारली. एवढेच नाही तर स्वयंसेवकांचे रक्तदाब आणि वजन देखील पूर्णपणे नियंत्रणात होते. हे वाचा - औरंगाबादमध्ये डॉक्टर तरुणीवर बलात्कार; अश्लील VIDEO शूट करत पीडितेच्या आई-वडिलांना पाठवले अन्… औषधांमध्ये बदल अभ्यास लेखक जोनाथन लिटल यांच्या मते, टाइप 2 मधुमेह असलेल्या रुग्णांवर उपचार केले जाऊ शकतात. कधीकधी हा रोग पूर्णपणेदेखील बरा होतो. मात्र, यासाठी औषधांमधील बदलांसह एक विशेष धोरण तयार करावे लागेल. हे वाचा - Explainer : डेंग्यू म्हणजे काय?, कसा होतो प्रसार, काय आहेत लक्षणे आणि उपचार? वाचा सविस्तर आहारातील बदल देखील आव्हानात्मक परंतु, अनेक आरोग्य तज्ज्ञ या अभ्यासाचे निष्कर्ष स्वीकारत नाहीत. तज्ञांच्या मते, आहारात असा बदल करणे खूप आव्हानात्मक असू शकते. कमी कॅलरी आणि कमी कार्बोहायड्रेटयुक्त अन्न जास्त काळ खाल्ल्याने तुम्हाला नुकसान होते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Diabetes, Health Tips, Tips for diabetes

    पुढील बातम्या