मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

दिवसातील या वेळात कोरोना लस घेणं आहे अधिक प्रभावी; नवीन संशोधनातील निष्कर्ष

दिवसातील या वेळात कोरोना लस घेणं आहे अधिक प्रभावी; नवीन संशोधनातील निष्कर्ष

New Study On Corona Vaccine:  एका नवीन संशोधनात लस घेण्याच्या वेळेबाबतही एक मोठी गोष्ट समोर आली आहे. लस कोणत्या वेळी घेतल्यावर तिचा परिणाम अधिक प्रभावी होऊ शकेल, यावर नवीन संशोधनात (New Study On Corona Vaccine) अभ्यास करण्यात आला आहे.

New Study On Corona Vaccine: एका नवीन संशोधनात लस घेण्याच्या वेळेबाबतही एक मोठी गोष्ट समोर आली आहे. लस कोणत्या वेळी घेतल्यावर तिचा परिणाम अधिक प्रभावी होऊ शकेल, यावर नवीन संशोधनात (New Study On Corona Vaccine) अभ्यास करण्यात आला आहे.

New Study On Corona Vaccine: एका नवीन संशोधनात लस घेण्याच्या वेळेबाबतही एक मोठी गोष्ट समोर आली आहे. लस कोणत्या वेळी घेतल्यावर तिचा परिणाम अधिक प्रभावी होऊ शकेल, यावर नवीन संशोधनात (New Study On Corona Vaccine) अभ्यास करण्यात आला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 10 डिसेंबर : गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीनं जगाला वेठीस धरलं आहे. जगभरातील शास्त्रज्ञ या विषाणूवर औषध शोधण्यात गुंतले आहेत. मात्र, आतापर्यंत लशीव्यतिरिक्त कोणतेही ठोस औषध सापडलेलं नाही. आत्तापर्यंत लसीकरणाचे वय, कोणती लस घ्यायची आणि दोन लसींमध्ये किती वेळ असावा, अशा प्रश्नांवर लस घेणाऱ्यांच्या मनात शंका होत्या. पण, आता एका नवीन संशोधनात लस घेण्याच्या वेळेबाबतही एक मोठी गोष्ट समोर आली आहे. लस कोणत्या वेळी घेतल्यावर तिचा परिणाम अधिक प्रभावी होऊ शकेल, यावर नवीन संशोधनात (New Study On Corona Vaccine) अभ्यास करण्यात आला आहे.

अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स जर्नल हॉस्पिटलच्या (Massachusetts General Hospital) डॉक्टरांनी केलेल्या या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, कोरोनाची लस सकाळ ऐवजी दुपारी दिली तर जास्त फायदेशीर ठरू शकते, कारण दुपारी अँटीबॉडीजची पातळी जास्त असते. बायोलॉजिकल रिदम (Biological Rhythm) या जर्नलमध्ये या अभ्यासाचे निष्कर्ष प्रसिद्ध झाले आहेत. 24 तासात मानवी शरीरात अनेक बदल होतात, ज्यात संसर्गजन्य रोग आणि लसीकरणाचा या गोष्टींचाही समावेश असल्याचे या संशोधनावरून दिसून येतं.

तज्ज्ञ काय म्हणतात

एमजीएच येथील मॅसॅच्युसेट्स जर्नल हॉस्पिटल (मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटल) येथील न्यूरोफिजियोलॉजी विभागाशी संलग्न आणि या अभ्यासाच्या वरिष्ठ लेखकांपैकी एक डॉ. एलिझाबेथ बी. क्लेरमन (Elizabeth B. Klerman) यांनी सांगितले की, 'आमच्या निरीक्षणात्मक अभ्यासातून ही गोष्ट दिसून आली आहे. कोविड-19 लस दिवसातील कोणत्यावेळी घेतली, याच्यावर त्याची परिणामकारता अवलंबून राहते, याचा आमच्याकडे पुरावा आहे. हे संशोधन लसीचा परिणाम ठरवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

हे वाचा - जंगलात फिरायला गेलेल्या कुटुंबाला अचानक हेलिकॉप्टर खाली येताना दिसलं; CDS बिपिन रावत यांच्या Chopper Crash चा VIDEO असा आला पुढे

दिवसाच्या वेळेनुसार बर्‍याच रोगांवर प्रतिक्रिया बदलते

या अभ्यासानुसार, अनेक रोगांची लक्षणे आणि औषधांना मिळणारा प्रतिसाद दिवसाच्या वेळेनुसार बदलतो. उदाहरणार्थ, फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना दिवसाच्या एका विशिष्ट वेळी जास्त त्रास होतो. इन्फ्लूएंझा लस घेतलेल्या वृद्ध पुरुषांच्या अभ्यासात असे दिसून आले की, जेव्हा त्यांना दुपारच्या तुलनेत सकाळी लसीकरण करण्यात आले तेव्हा त्यांच्यात प्रतिपिंडांचे प्रमाण कमी राहिले. अलीकडील अभ्यासात, ब्रिटनमधील 2,190 आरोग्य कर्मचाऱ्यांवर कोविड लसीकरणाची चाचणी घेण्यात आली. केमोथेरपी देखील दिवसाच्या विशिष्ट वेळी अधिक प्रभावी असल्याचे सिद्ध होते.

हे वाचा - Fenugreek leaves: मधुमेहावर मेथीची पाने आहेत रामबाण इलाज; हिवाळ्यातील आहारात असा करा समावेश

बूस्टर डोसबाबतही चर्चा जोमात

कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट Omicron आल्याने देशात आणि जगात कोरोना व्हायरस लसीच्या बूस्टर डोसबाबत चर्चा जोरात सुरू आहे. अमेरिका, ब्रिटनसह जगातील अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता बूस्टर डोस लागू करण्यावर विचारविनिमय सुरू आहे. मात्र, भारतात यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

First published:

Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus