अस्थिविकारांनी ग्रासलंय; जाणून घ्या वरदान ठरणाऱ्या नव्या उपचारांविषयी

अस्थिविकारांनी ग्रासलंय; जाणून घ्या वरदान ठरणाऱ्या नव्या उपचारांविषयी

  • Last Updated: Jul 14, 2020 10:02 PM IST
  • Share this:

दुखापत झाली तर सांध्यांचे दुखणे लवकर बरे होते, पण जर सांध्यांच्या आत परिणाम झाला तर मात्र बरे व्हायला अनेक महिने लागतातmyUpchar.com च्या अनुसार, अनेकदा सांध्यामधील आंतरिक भाग कधीच बरा होत नाही. त्यामुळे त्या भागाची हालचाल करायला त्रास होतो. आजकाल असेही तंत्रज्ञान विकसित झाले आहे ज्याने अशा गंभीर शारीरिक समस्या दूर होऊ शकतात. सांध्यांच्या दुखण्यावर उपचार करणारे नवे तंत्रज्ञान पण आता विकसित झाले आहे, ज्याला थ्री डी प्रिंटिंग तंत्रज्ञान पण म्हटले जाते. जाणून घेऊया काय आहे हे तंत्रज्ञान.

काय आहे हे 3डी प्रिंटिंग तंत्रज्ञान

थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञान अनेकांसाठी संजीवनी ठरणार आहे. यात रुग्णाच्या दुखापत झालेल्या भागाची त्रिमितीय प्रतिमा तयार केली जाते. त्यासाठी 3डी प्रिंटरचा उपयोग केला जातो. या प्रतिमेच्या मदतीने कृत्रिम अवयव बनवले जातात. या कृत्रिम अवयवाच्या मदतीने सांध्यांना पूर्वास्थेत आणता येते. 3डी प्रिंटर या तंत्राने काही तासांतच त्याच्या सारखे हुबेहूब अवयव बनवता येतात. त्यामुळे शस्त्रक्रियेला वेळ पण कमी लागतो आणि गंभीर समस्यांचे निराकरण करता येते. म्हणूनच हे तंत्रज्ञान संजीवनी ठरते आहे.

कृत्रिम अवयव असे तयार करतात

कृत्रिम अवयव तयार करण्यासाठी एक्सरे, एमआरआय आणि सीटी स्कॅनची मदत घेतली जाते आणि त्यातून त्रिमितीय प्रतिमा निर्माण केली जाते. थ्रीडी प्रिंटर या त्रिमितीय प्रतिमांची निर्मिती सहज करतो. त्यात कुठल्याही प्रकारची चूक होण्याचा संभव नसतो. रुग्णाच्या आवश्यकतेनुसार अवयवाची प्रतिमा तयार होते.

चूक होण्याची शक्यात अजिबात नसते

हे तंत्रज्ञान विकसित होण्याअगोदर डॉक्टरांना कृत्रिम अवयव बनवायला खूप मेहनत घ्यावी लागायची. त्यासाठी कृत्रिम अवयवाला रुग्णाच्या आवश्यकतेनुसार कापावे आणि घासावे लागायचे, त्यानंतर ते लावता यायचे. तरीही शाश्वती नसायची की ते योग्य प्रकारे काम करेल. पण 3डी प्रिंटरच्या या तंत्राने हे काम सोपे झाले आहे.

खर्चही जास्त होत नाही

3डी प्रिंटरने कृत्रिम अवयव बनवायला खूप कमी खर्च येतो, आणि साधनेही कमी लागतात. यात कापणे-घासणे हेही करायची गरज नाही, बनवायला वेळही कमी लागतो. म्हणूनच असे कृत्रिम अवयव बनवायला जास्त खर्च लागत नाही.

अधिक उत्पादन करणे सहज शक्य आहे

3 डी तंत्रज्ञानाने कृत्रिम अवयव बनवायला कमी वेळ, आणि कमी श्रम लागतात म्हणूनच त्याचे उत्पादन अधिक प्रमाणात करणे सहज शक्य आहे. गुंतागुंतीच्या सांध्याच्या विकारांसाठीही अगदी योग्य असे कृत्रिम अवयव तयार करता येतात. शस्त्रक्रियेनंतर हे अवयव खूप वर्ष टिकतात, त्यामुळे रुग्णाला त्रासालाही सामोरे जावे लागत नाही. सांध्यांचा त्रास असलीलेल्या व्यक्ती सामान्य आयुष्य जगू शकतात.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - हाड मोडणे (अस्थिभंग)

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: July 14, 2020, 10:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading