कॅन्सरवर उपचारात मदत करेल लाळ; नव्या ग्रंथींचा समूह सापडला

कॅन्सरवर उपचारात मदत करेल लाळ; नव्या ग्रंथींचा समूह सापडला

कॅन्सर रुग्णांवर उपचारात (cancer treatment) ही लाळ ग्रंथी (salivary glands) महत्त्वाची ठरेल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

  • Share this:

अॅम्स्टरडॅम, 22 ऑक्टोबर : नेदरलँडमधील (Netherland) शास्त्रज्ञांना मानवी शरीरात एक नवी लाळ ग्रंथी (salivary glands) सापडली आहे. हा ग्रंथींचा नवीन समूह नाकाच्या मागील बाजूस आणि घशाच्या थोड्या वरच्या भागामध्ये आढळतो जो सुमारे 1.5 इंचांचा आहे.  गेल्या तीन शतकांमधील मानवी शरीराच्या रचनेशी संबंधित हे सर्वात मोठं आणि महत्त्वपूर्ण संशोधन असल्याचं सांगितलं जातं आहे. महत्त्वाचं म्हणजे या लाळग्रंथींची मदत कॅन्सरसारख्या गंभीर आजाराच्या उपचारात (cancer treatment) होणार होईल, असा शास्त्रज्ञांना विश्वास आहे.

नेदरलँड कॅन्सर इन्स्टिट्युटचं (Netherlands Cancer Institute) हे संशोधन रेडिओथेरेपी आणि ऑन्कोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. मानवी शरीरात या सूक्ष्म लाळग्रंथींचं स्थान वैद्यकीय शास्त्रासाठी फार महत्त्वाचं आहे. संशोधकांनी या ग्रंथींचं नाव 'ट्युबेरियल ग्लँड्स' ठेवावं असा प्रस्ताव दिला आहे. कारण ही ग्रंथी टोरस ट्युबेरियस नावाच्या कार्टिलेजच्या भागावर आहेत. संशोधक प्रत्यक्षात प्रोस्टेट कर्करोगाचा अभ्यास करत असताना त्यांना या ग्रंथींविषयी माहिती मिळाली.

विशेषत: घसा आणि डोक्याचा कर्करोग असलेल्या ज्या रुग्णांना रेडिएशन थेरेपी घ्यावी लागते, अशा रुग्णांसाठी या संशोधनाची खूप मदत होणार आहे. कर्करोगाच्या उपचारात रेडिएशनचा दुष्परिणाम होतो. तोंडातील लाळग्रंथी खराब होतात ज्यामुळे तोंड कोरडं राहतं. ज्यामुळे रुग्णाला खाण्यास आणि बोलण्यास बराच वेळ लागतो. आत या नवीन ग्रंथीचा अशावेळी फायदा होईल.

हे वाचा - आश्चर्य! कोरोनानंतर चीनमध्ये अज्ञात आजार! फक्त अमेरिकन अधिकाऱ्यांना बनवतोय शिकार

नेदरलँड्स कर्करोग संस्थेच्या संशोधकांनी सांगितलं की, या शोधामुळे रेडिओथेरेपी तंत्र विकसित करण्यास आणि समजण्यास मदत होईल ज्यामुळे कर्करोगाच्या रुग्णांना लाळ आणि गिळण्याच्या समस्येवर मात करता येईल.

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या कॅन्सर युनिटनुसार, मान आणि मेंदूचा कर्करोग भारतात मोठ्या प्रमाणात आढळतो. तसंच, ओरल कॅव्हिटी कर्करोगाची प्रकरणंदेखील खूप आहेत. या शोधामुळे कर्करोगाच्या रुग्णांवर रेडिओथेरपी उपचारांत मोठ्या प्रमाणात मदत होईल, असा विश्वास भारतातील रेडिएशन ऑन्कोलॉजी तज्ज्ञांना आहे.

हे वाचा - मेड इन इंडिया कोरोना लशीबाबत गूड न्यूज! Covaxinचं आता शेवटच्या टप्प्यातील ट्रायल

हिंदुस्थान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, दिल्लीतील एम्समधील रेडिएशन ऑन्कोलॉजी तज्ज्ञ असलेल्या डॉ. पीके झुल्का यांनी सांगितलं, या ग्रंथी वरच्या भागात  आहेत, त्यामुळे रेडिएशनचा त्यांच्यावर परिणाम होणार नाही आणि  उत्तम उपचार शक्य होतील.

Published by: Priya Lad
First published: October 22, 2020, 9:10 PM IST

ताज्या बातम्या