मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /सततची वाहतूक आणि विमानाच्या घरघरमुळे गंभीर धोके, नव्या संशोधनात झालं स्पष्ट

सततची वाहतूक आणि विमानाच्या घरघरमुळे गंभीर धोके, नव्या संशोधनात झालं स्पष्ट

फोटो सौजन्य - Pixabay

फोटो सौजन्य - Pixabay

ध्वनी प्रदुषण कायमच आरोग्याला घातक असल्याचं सिद्ध झालं आहे. त्यात आता आणखीच भर पडली आहे.

नवी दिल्ली, 29 मार्च : ध्वनी प्रदूषण हा आजच्या धकाधकीच्या, घाईगोंधळाच्या जगण्याचा जणू अपरिहार्य भाग झाला आहे. खूप वेगानं वाढणारा गोंगाट आणि ध्वनिप्रदूषण हृदयाच्या समस्या वाढवत आहे. एका नव्या संशोधनात याबाबत आता एक माहिती समोर आली आहे. (new research about sound pollution)

दीर्घकाळ वाहतुकीच्या आवाजाचा सामना करत राहावा लागल्यास हृदय रोगाचा धोका वाढतो. युरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित झालेलं नवं संशोधन हे सांगतं आहे. (sound pollution and heart attack)

500 लोकांवर 5 वर्ष झाला अभ्यास

वाहतूक आणि विमानांच्या होणाऱ्या मोठ्या ध्वनिप्रदूषणामुळं रस्ता आणि विमानतळ यांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांवर काय परिणाम होतो याचा अभ्यास 5 वर्ष केला गेला. या संशोधनात 500 लोकांना सहभागी करून घेतलं गेलं. संशोधकांना समजलं, की सरासरी 24 तासात गोंगाटाचा आवाज 5 डेसिबल वाढल्यास हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका 35 टक्क्यांनी वाढतो. (European heart journal research about sound pollution)

असं का होतं आता समजून घ्या

संशोधनात सहभागी लोकांवर गोंगाटाचा नक्की काय परिणाम होतो आहे हे समजून घेण्यासाठी त्यांच्या मेंदूची स्कॅनिंग केली गेली. रिपोर्टमध्ये समोर आलं, की गोंगाट वाढल्यावर या लोकांच्या मेंदूमधील त्या भागावर वाईट परिणाम झाला जो ताण, अस्वस्थता आणि भीतीवर नियंत्रण ठेवतो. (sound pollution effects on metabolism)

हेही वाचा एवढीशी तोंडली आरोग्यासाठी मोठी फायदेशीर; कोरोना काळात तर आवर्जून खायलाच हवी

ताण आणि अस्वस्थता वाढते तेव्हा शरीर त्यांच्याशी लढण्यासाठी एड्रिनॅलीन आणि कॉर्टिसॉल यासारखे स्ट्रेस हार्मोन्स रिलीज करतं. तणाव आणि अस्वस्थतेत रक्तदाब वाढतो. पचनशक्ती कमी होते. शरीरात चरबी आणि साखरेचं सर्क्युलेशन वाढतं. याचा प्रभाव हृदयावर पडतो.

नवं संशोधन सांगतं, जास्त गोंधळ झाल्यावर धमन्यांमध्ये सूजही आल्याचं दिसलं. यातून हृदयावर दबाव वाढला. संशोधनानुसार ध्वनी प्रदूषण झोपेवरही वाईट परिणाम करतं. याशिवाय पचनावरही परिणाम होतो.

हेही वाचा मासिक पाळी ते केसांची वाढ; गाजराच्या बियांचं तेल महिलांच्या अनेक समस्येवर उपाय

ध्वनी डेसिबलमध्ये मोजला जातो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, 55 डेसिबलहून जास्त आवाजाची पातळी गोंगाटाला कारणीभूत ठरते. यातून आरोग्याचंही नुकसान होतं. कार आणि ट्रकमुळं 70 ते 90 डेसिबल गोंगाट होतो. सायरन आणि विमानामुळं 120 डेसिबल किंवा त्याहून अधिक ध्वनी प्रदूषण होतं.

First published:

Tags: Airport, Research