वॉशिंग्टन, 25 डिसेंबर : कॅन्सर (CANCER)... शब्द जरी ऐकला तरी पायाखालची जमीन सरकते. आता आपला मृत्यू अटळ आहे. आपण यातून कधीच बरे होणार नाही, ही भीती मनात घर करून बसते. अशाच कॅन्सर रुग्णांसाठी विशेषतः ब्लड कॅन्सर रुग्णांसाठी दिलासादायक अशी बातमी. ब्लड कॅन्सर लवकरात लवकर बरा होण्यासाठी शास्त्रज्ञांनी उपाय शोधून काढला आहे.
अमेरिकेतील क्लिव्हलँड क्लिनिकच्या शास्त्रज्ञांनी ब्लड कॅन्सर लवकरात लवकर बरा करण्यासाठी मार्ग शोधला आहे. या शास्त्रज्ञांमध्ये एका भारतीय शास्त्रज्ञाचाही समावेश आहे. क्लिव्हलँड क्लिनिक डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सलेशन हेमटोलॉजी अँड ऑन्कोलॉजी रिसर्चचे जारोसलॉ मॅकीजेवस्की आणि बबल कांत झा यांनी हे संशोधन केलं आहे.
दोन्ही शास्त्रज्ञांनी ल्युकेमिया कॅन्सर पेशींना लक्ष्य करण्याचा मार्ग शोधला आहे. ल्युकेमिया हा ब्लड कॅन्सर आहे. शरीरात पांढऱ्या रक्तपेशी वाढल्यानं हा कॅन्सर होतो. माइलोइड ल्युकेमियामध्ये बोनमॅरोमध्ये रक्त तयार करणाऱ्या पेशींपासून सुरू होतो. माइलोइड ल्युकेमियाचं मुख्य कारण टीईटी2 जीनमध्ये दिसून आलं आहे. यावरच या दोन्ही शास्त्र्ज्ञांनी अभ्यास केला.
हे वाचा - हे काय नवं? ज्या ब्रिटनच्या हवेत नवा Corona; तिथली कंपनी आता जगाला पुरवतेय शुद्ध
डॉ. मॅकीजेवस्ती यांनी सांगितलं, टीईटीआई76 हा एक कृत्रिम अणू घातक कॅन्सर पेशींना आजारांच्या सुरुवातीच्या टप्प्यातच लक्ष्य करून त्यांना नष्ट करण्यात सक्षम आहे.
तर झा यांनी सांगितलं, 2 एचजी (2-हाइड्रोक्सीग्लुटरेट) च्या नैसर्गिक जैविक क्षमतांचा अंदाज घेतला. अणूचा अभ्यास केला आणि एक छोटा अणू तयार केला. टीईटी 2 म्युटेशनसह पेशींची वाढ आणि प्रसारही रोखू शकतो. इतकंच नव्हे तर निरोगी पेशींनाही हानी पोहोचवत नाही. त्या पेशींना जिवंत ठेवण्यात मदत करतो. या अभ्यासातून आम्हाला खूप आशा आहे.
हे वाचा - Coronavirus बरोबर आता ब्लॅक फंगसचं सावट; मृत्यूदर वाढला
हा छोटा अणू कॅन्सरसंबंधी पुढील अभ्यासात खूपच महत्त्वपूर्ण ठरेल. कॅन्सरची लढण्याची क्षमता समजू शकेल, असा विश्वास क्लिव्हलँड क्लिनिकनं व्यक्त केला आहे.