मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /फोटो आणि सेल्फी काढण्यासंदर्भात गोवा प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय, मजा-मस्ती येईल अंगाशी

फोटो आणि सेल्फी काढण्यासंदर्भात गोवा प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय, मजा-मस्ती येईल अंगाशी

गोव्याला जाणार असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी गोवा प्रशासनाकडून नवी गाईडलाईन्स जारी करण्यात आली आहे.

गोव्याला जाणार असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी गोवा प्रशासनाकडून नवी गाईडलाईन्स जारी करण्यात आली आहे.

गोव्याला जाणार असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी गोवा प्रशासनाकडून नवी गाईडलाईन्स जारी करण्यात आली आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Panaji (Panjim, India

  पणजी : सध्या पर्यटनाचा हंगाम सुरू आहे. कुणी हिमाचल प्रदेशला जातंय, कुणी कोकणात जातंय, कुणी केरळ तर कुणी गोव्याला जात आहे. तुम्हीही गोव्याला जाणार असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तिथे गेल्यावर कोणत्याही पर्यटकाबरोबर तुम्हाला विनापरवानगी सेल्फी किंवा फोटो घेता येणार नाही. त्या पर्यटकाच्या प्रायव्हसीची काळजी घेऊन परवानगी घेणं आवश्यक आहे. याबाबत आता नवी गाईडलाईन्स सरकारकडून जारी करण्यात आली आहे.

  पर्यटन विभागाकडून सूचना 

  ही नवी गाईडलाईन्स गोवा पर्यटन विभागाने पर्यटकांसाठी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा भाग आहे. याचा उद्देश पर्यटकांच्या गोपनीयतेचं रक्षण करणं, त्यांची सुरक्षितता जपणं आणि अनैतिक घटना टाळणं, तसंच त्यांची फसवणूक होऊ नये हा आहे. कोणत्याही पर्यटकासोबत सेल्फी घेण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी आधी त्याची परवानगी घ्या, विशेषत: तुम्ही ज्या व्यक्तिसोबत सेल्फी किंवा फोटो घेणार असाल ती व्यक्ती जर समुद्रात पोहत असेल किंवा सनबाथ घेत असेल तर त्याच्या प्रायव्हसीचा आदर करा असं जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

  धोकादायक ठिकाणी सेल्फी टाळा 

  एवढच नव्हे तर  अपघात टाळण्यासाठी खडकाळ भाग आणि समुद्रातल्या धोकादायक ठिकाणी सेल्फी घेण्यासही पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे. गोव्याला भेट देणाऱ्या प्रवाशांनी भिंतीवर काहीही लिहून वारसास्थळांची नासधूस किंवा नुकसान न करू नये, असा सल्लाही देण्यात आला आहे. स्मारकं विद्रूप करण्याचा प्रयत्न करू नये, असंही म्हटलं आहे. "बेकायदा खासगी टॅक्सी भाड्याने घेऊ नका. जास्त भाडं आकारणं टाळण्यासाठी मीटरच्या भाड्यानेच प्रवास करा," असंही त्या अ‍ॅडव्हायजरीमध्ये म्हटलं आहे. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना सरकारने सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यास सांगितलं आहे.  एवढंच नाही तर  पर्यटकांनी नोंदणीकृत असलेली हॉटेलच राहण्यासाठी बुक करावीत तसेच उघड्यावर किंवा समुद्र किनारी मद्यपान करून नये. मद्यपान करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असंही नव्या गाईडलाईन्समध्ये म्हटल आहे.

  हेही वाचा : डेहराडूनची मुस्कान ‘खास’ मित्राला ठेवते सतत सोबत; पार्टनर ‘चूचू’ आहे तिच्या कुटुंबाचाच एक सदस्य

  नोंदणीकृत सेवांचा लाभ घ्या     

  गोव्यात दर वर्षी लाखो पर्यटक देशभरातून आणि विदेशातून पर्यटनासाठी येतात. त्यांनी परिवहन विभागाकडे नोंदणीकृत नसलेली आणि ज्यांच्याकडे वैध परवानगी नाही अशी खासगी वाहनं भाड्यानं घेणं, कॅब, दुचाकी भाड्याने घेणं टाळावं, असं सांगण्यात आलं आहे. पर्यटकांना समुद्रपर्यटन बुकिंगसाठी बेकायदा टाउट किंवा एजंट्सकडून बुकिंग न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पर्यटकांनी अशा सेवांचं बुकिंग करताना पर्यटन विभागाने जारी केलेल्या नोंदणी प्रमाणपत्राचा आग्रह धरला पाहिजे आणि अशा सेवा फक्त नोंदणीकृत ट्रॅव्हल एजंट किंवा नोंदणीकृत ऑनलाइन पोर्टलवरून बुक कराव्यात, असंही यात नमूद करण्यात आलं आहे.

  First published:

  Tags: Goa