Home /News /lifestyle /

हे काय नवं? ज्या ब्रिटनच्या हवेत नवा Corona; तिथली कंपनी आता जगाला पुरवतेय शुद्ध हवा

हे काय नवं? ज्या ब्रिटनच्या हवेत नवा Corona; तिथली कंपनी आता जगाला पुरवतेय शुद्ध हवा

यूकेमध्ये (UK) कोरोनाव्हायरसचा नवा स्ट्रेन (coronavirus new strain) आढळला आहे. त्यामुळे कित्येक देशांनी ब्रिटनहून (britain) येणाऱ्या आणि तिथं जाणाऱ्या हवाई वाहतुकीवर बंदी घातली आहे. जेणेकरून हा नवा कोरोना आपल्या देशात येऊ नये, पसरू नये.

पुढे वाचा ...
    ब्रिटन, डिसेंबर : यूकेमध्ये (UK) कोरोनाव्हायरसचा नवा स्ट्रेन (Coronavirus new strain) आढळला आहे. कोरोनाचं हे नवं रूप जास्त संसर्गजन्य आहे. यामुळे प्रकरणं अधिक वाढत आहे. त्यामुळे कित्येक देशांनी ब्रिटनहून (britain) येणाऱ्या आणि ब्रिटनला जाणाऱ्या हवाई वाहतुकीवर बंदी घातली आहे. जेणेकरून हा नवा कोरोना (new covid 19) आपल्या देशात येऊ नये, पसरू नये. पण यामुळे  कित्येक देशांचे ब्रिटनचे आणि ब्रिटनमध्ये इतर देशांचे नागरिक अडकले आहेत आणि आपल्या देशापासून दूर राहणाऱ्या अशाच लोकांसाठी ब्रिटनमधीलच एका कंपनीनं शुद्ध हवा (fresh air) उपलब्ध करून दिली आहे. यूकेतल्या एका कंपनीनं बाटली बंद हवेची (air in bottle) व्यवस्था केली आहे. आपल्या देशापासून दूर असलेल्या आणि इतर देशांमध्ये अडकलेल्या ब्रिटिशांसाठी कंपनीनं हे प्रोडक्ट तयार केलं आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असले तरी ब्रिटीश नागरिकांना आपल्या देशातील, आपल्या घरातील शुद्ध हवेत मोकळा श्वास घेता येणार आहे. आज तकच्या वृत्तानुसार माई बॅगेज कंपनीनं बाटली बंद हवेचं प्रोड्ट तयार केलं आहे. सध्या ही कंपनीनं इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि आयर्लंड इथली शुद्ध हवा बाटलीत बंद केली आहे आणि त्याची विक्री सुरू केली आहे. 500 मिलीच्या एका बाटलीची किंमत 25 पाउंड्स म्हणजे जवळपास 2500 रूपये आहे. या बाटलीला कॉर्क स्टॉपर आहे. जेव्हा गरज पडेल तेव्हा या हवेत श्वास घेता येईल आणि पुन्हा बाटलीत हवा बंद करता येऊ शकते. हे वाचा - कोरोनापासून बचाव करायचा असेल तर... संशोधनातून समोर आली ही मोठी गोष्ट कंपनीनं एक अभ्यास केला होता. ज्यामध्ये कोणताही सुगंध माणसाच्या इमोशनल मेमरीशी जुडलेला असतो. सुगंध आणि भावनांचं अनोखं नातं आहे. त्यामुळे आपल्या देशातील हवा घेतल्यानंतर लोकांना आपल्या घराची आठवण कमी येईल आणि त्यांना नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्यात मदत होईल, अशी आशा कंपनीला आहे. हे वाचा - मला CORONA VACCINE मिळणार की नाही? इथं वाचा तुमच्या प्रश्नाचं उत्तर यूकेतही या बाटलीबंद हवेला मागणी आहे. वेल्समध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीनं आमच्याकडे नॉर्थवेस्टर्न वेल्समधील डोंगराळा भागातील हवेचे नमुने मागितल्याचंही कंपनीनं सांगितलं. आपलं घर आणि कुटुंबापासून दूर असलेल्या लोकांकडून जास्तीत जास्त ऑर्डर्स येत आहेत. गिफ्ट म्हणूनही या बाटल्या पाठवल्या जात आहेत. वेल्समधील बाटलीबंद हवेचा स्टॉकही संपल्याचा दावा कंपनीनं केला आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona, Coronavirus

    पुढील बातम्या