टाटांचा मुलगा आणि किर्लोस्करांची लेक लग्नबंधनात; दोन दिग्गज उद्योग घराणी नव्या नात्यामुळे एकत्र

टाटांचा मुलगा आणि किर्लोस्करांची लेक लग्नबंधनात; दोन दिग्गज उद्योग घराणी नव्या नात्यामुळे एकत्र

टाटा हे भारतीय उद्योग क्षेत्रातलं आद्य घराणं, तर तेच स्थान महाराष्ट्रात किर्लोस्कर ब्रदर्सनी मिळवलेलं. ही दोन्ही उद्योग घराणी एका नव्या नात्यामुळे एकत्र आली आहेत.

  • Share this:

मुंबई, 19 जुलै : टाटा हे भारतीय उद्योग क्षेत्रातलं आद्य घराणं, तर तेच स्थान महाराष्ट्रात किर्लोस्कर ब्रदर्सनी मिळवलेलं. ही दोन्ही उद्योग घराणी एका नव्या नात्यामुळे एकत्र आली आहेत. नेविल टाटा आणि मानसी किर्लोस्कर यांनी गेल्या रविवारी अत्यंत साधेपणाने मुंबईत लग्न केलं. रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांचा नेविल हा मुलगा. विक्रम आणि गीतांजली किर्लोस्कर यांची मुलगी मानसी हिच्याबरोबर सहा महिन्यापूर्वीच नेविलची एंगेजमेंट झाली होती.

फार मोठा गोतावळा किंवा पाहुणे-रावळे त्यांच्या लग्नाला नव्हते. केवळ घरचे, जवळचे नातेवाईक आणि मोजकी मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत दक्षिण मुंबईत हे देशातल्या दोन नामांकित उद्योग समूहांच्या पुढच्या पिढीचं लग्न झालं. रतन टाटा यांचे धाकटे बंधू नोएल - म्हणजे नेविलचे वडील टाटा ट्रेंटचे आणि टाटा इंटरनॅशनलचे प्रमुख आहेत. नेविल याच्याकडे टाटा ट्रेंटच्या एका विभागाची जबाबदारी आहे. टाटा ट्रेंड यांच्याकडे वेस्टसाईड या ब्रँडची मालकी आहे.

पुण्याची ही धडाडीची पोलीस अधिकारी ठरली Mrs India, कहाणी ऐकून व्हाल थक्क

दुसरीकडे मानसीसुद्धा आपल्या वडिलोपार्जित उद्योगात कार्यरत आहे. विक्रम किर्लोस्कर म्हणजे मानसीचे वडील टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचे उपाध्यक्ष आहेत. त्याच कंपनीत सिस्टीम्स डिपार्टमेंट मानसी किर्लोस्कर यांच्याकडे आहे.

टीव्हीवरील या प्रसिद्ध बालकलाकाराचा मृत्यू, आईसमोरच गेला जीव

गेल्या वर्षी अंबानी आणि पिरामल या दोन घराण्यात सोयरिक जुळली होती. आता टाटा आणि किर्लोस्कर ही उद्योग घराणी मानसी आणि नेविलमुळे जवळ आली आहेत.

आदित्य ठाकरेंकडून राहुल गांधींची कॉपी, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2019 05:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading