चुकूनही शरीराच्या या भागांना हात लावू नका...

शरीराचे ते कोणते अवयव आहेत ज्यांना वरचेवर हात लावल्यावर आपण आजारी पडू शकतो याबद्दल जाणून घेऊ.

News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2019 05:45 PM IST

चुकूनही शरीराच्या या भागांना हात लावू नका...

बहुतांश लोकांना रिकाम्यावेळी डोळे चोळायची, कान तसेच नाक खाजवायची सवय असते. आपल्या अंगावर असे अनेक किटाणू असतात ज्यांना कळत- नकळत हात लावणं भारी पडू शकतं. एवढंच नाही तर यामुळए इन्फेक्शनही होऊ शकतं. शरीराचे ते कोणते अवयव आहेत ज्यांना वरचेवर हात लावल्यावर आपण आजारी पडू शकतो याबद्दल जाणून घेऊ.

डोळे- फावल्या वेळात अनेकांना डोळ्यांना हात लावायची किंवा डोळे चोळायची सवय असते. काही लोकांचा हात सतत डोळ्यांभोवतीच जात असतो. हे तर साऱ्यांनाच माहीत आहे की, डोळे हा शरीराचा नाजूक भाग आहे. डोळे चोळताना हात आणि नखातील किटाणू डोळ्यात जातात. यामुळे डोळ्याचे गंभीर आजार होऊ शकतात.

पार्श्वभाग- पार्श्वभागाच्या इथे सर्वात जास्त बॅक्टेरिया असतात. यामुळे शरीराच्या दुसऱ्या भागातही इन्फेक्शन होतं. त्यामुळे पार्श्वभागाला स्पर्श करणं म्हणजे रोगाला आमंत्रण देण्यासारखं आहे. हा अतीसंवेदनशील भाग आहे.

नाक- अनेकांना विनाकारण नाकात बोट घालायची सवय असते. पण त्यांना हे माहीत नसतं की, अशा पद्धतीने सतत नाकात बोट घातल्यामुळे ते अधिक अस्वच्छ होतं. बोटांनी नाक साफ करताना हातावरचे लाखो किटाणू नाकात जातात. यामुळे इन्फेक्शनही होऊ शकतं. जर तुम्हाला नाक स्वच्छ करायचं असेल तर सेनिटायझर टिश्यूचा वापर करावा.

तोंड- तुम्ही अनेकांना पाहिलं असेल ज्यांना तोंडात हात घालायची आणि नखं खायची वाईट सवय असते. तुम्हीही त्यांच्यातील एक असाल तर आताच सावध व्हा. भलेही तुम्ही हात स्वच्छ धुतले असतील पण हातावर अनेक किटाणू असतात, जे तुमच्या तोंडात जातात आणि तुम्हाला आजारी करतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2019 05:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...