मुंबई, 17 नोव्हेंबर : लक्ष्मी ही संपत्ती, सुख आणि समृद्धीची देवता मानली जाते. देवी लक्ष्मीला प्रसन्न (Laxmi Puja) करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. लक्ष्मी एखाद्यावर प्रसन्न झाली, तर ती रंकाला राजा बनवते आणि जर कोपली तर ती राजाला दरिद्रीही बनवू शकते, असं म्हटलं जातं. घरामध्ये आनंद आणि सुख-समृद्धी नांदावी यासाठी अनेक जण घरी विविध उपाय करतात. ऐश्वर्य आणि वैभवाची देवी लक्ष्मीची (Laxmi) कृपा कायम राहावी म्हणून अनेक जण उपवास, पूजा इत्यादी करून मातेला प्रसन्न करतात. त्यामुळे भक्तांवर मातेचा आशीर्वाद कायम राहतो, असं मानलं जातं.
यासोबतच शास्त्रानुसार, माता लक्ष्मी नेहमी स्वयंपाकघरात वास करते, असं म्हणतात. त्यामुळे आपल्या स्वयंपाकघरात वसलेली लक्ष्मी रुसू नये, यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. घरातली लक्ष्मी कायम टिकून राहावी म्हणून कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, हे जाणून घेऊ या. 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबद्दलची माहिती प्रसिद्ध केली आहे.
कॅप्टन्सी सोडली, टीम इंडियातलं स्थानही गेलं, द्रविडच्या शिष्याचं धमाक्यात कमबॅक!
तांदूळ : स्वयंपाकघरात तांदूळ (Rice) हा खूप महत्त्वाचा घटक आहे. तांदळाचा वापर सर्वच ठिकाणी केला जातो. पूजेतही तांदळाचा वापर केला जातो. तांदूळ हा शुक्राचा पदार्थ मानला जातो. त्यामुळे स्वयंपाकघरात तांदळाचा अभाव निर्माण झाला, तर शुक्र ग्रहावर परिणाम होतो. यामुळे आर्थिक समस्या होऊ शकतात. त्यामुळे नेहमी स्वयंपाकघरातले तांदूळ कधीही संपणार नाहीत, या बेताने नियोजन करावं.
पीठ : प्रत्येक स्वयंपाकघर पिठाशिवाय अपूर्ण असतं. शास्त्रानुसार, (shastra) स्वयंपाकघरातलं पीठ संपणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे पिठाचा डबा कधीही पूर्णपणे रिकामा होऊ देऊ नका. नाही तर घरातलं अन्न-धान्य कमी होऊ लागतं, प्रतिमेला ठेच पोहोचू शकते, असं म्हणतात.
मीठ : मीठ (Salt) हा असा घटक आहे, की जो अगदी थोड्या प्रमाणात लागत असला, तरी त्याच्याशिवाय काम होत नाही. मिठाशिवाय अन्न बेचव लागतं. घरातला मिठाचा डबा कधीही पूर्णपणे रिकामा होऊ देऊ नये. तसंच घरातलं मीठ संपल्यास दुसऱ्यांकडे कधीही मीठ मागू नये. घरात मिठाचा डबा रिकामा झाल्यास आर्थिक संकटाला सामोरं जावं लागू शकतं. यामुळे घरातलं मीठ संपण्याच्या पूर्वीच घरात मीठ आणून ठेवावं.
हळद : हळद अत्यंत गुणकारी समजली जाते. हळदीचा (Turmeric) उपयोग शुभ कार्यात आणि देवपूजेतही केला जातो. हळदीच्या डब्यात खडखडाट असू नये, असं म्हटलं जातं. हळदीचा संबंध गुरू ग्रहाशी असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे घरातली हळद संपली तर गुरूदोष निर्माण होऊ शकतो. हळद पूर्णपणे संपली तर सुख-समृद्धी कमी होऊन शुभकार्यात व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे घरातली हळद पूर्णपणे संपणार नाही याची काळजी घ्यावी, असं शास्त्र सांगतं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.