Home /News /lifestyle /

कितीही कडक उन्हाळा असला तरी 'हे' फळ फ्रीजमध्ये नका ठेवू , जाणून घ्या कारण

कितीही कडक उन्हाळा असला तरी 'हे' फळ फ्रीजमध्ये नका ठेवू , जाणून घ्या कारण

watermelon

watermelon

सध्या बहुतेकांना आपलं बॉडी टेंपरेचर (Body Temperature) मेंटेन ठेवण्यासाठी आहारामध्ये (Summer Diet) थंड खाद्यपदार्थांचा (Anti-inflammatory Foods) समावेश करावासा वाटत आहे. अशा परिस्थितीमध्ये टरबूज अर्थात कलिंगड (Watermelons) हा सर्वांत स्वस्त आणि मस्त पर्याय ठरतो. साधारणपणे बाजारातून खरेदी केलेलं टरबूज खाण्यापूर्वी आपण ते काही काळ पाण्यात किंवा फ्रीजमध्ये ठेवतो. पण, तुम्हाला माहिती आहे का? टरबूज अशा प्रकारे रेफ्रिजरेट (Refrigerate) केल्यानं त्यातले पोषक घटक (Nutrients) नाहीसे होतात.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 3 मे: सध्या संपूर्ण देशभरात उष्णतेची लाट सुरू आहे. त्यामुळे तापमानात प्रचंड वाढ झाली असून तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत आहे. अचानक वाढलेली उष्णता अनेकांच्या शरीरासाठी घातक ठरत आहे. उष्णतेमुळे सनस्ट्रोक (Sunstroke), डिहायड्रेशन (Dehydration), घामोळे (Miliaria) यांसारख्या अनेक समस्या जाणवतात. सध्या बहुतेकांना आपलं बॉडी टेंपरेचर (Body Temperature) मेंटेन ठेवण्यासाठी आहारामध्ये (Summer Diet) थंड खाद्यपदार्थांचा (Anti-inflammatory Foods) समावेश करावासा वाटत आहे. अशा परिस्थितीमध्ये टरबूज अर्थात कलिंगड (Watermelons) हा सर्वांत स्वस्त आणि मस्त पर्याय ठरतो. साधारणपणे बाजारातून खरेदी केलेलं टरबूज खाण्यापूर्वी आपण ते काही काळ पाण्यात किंवा फ्रीजमध्ये ठेवतो. पण, तुम्हाला माहिती आहे का? टरबूज अशा प्रकारे रेफ्रिजरेट (Refrigerate) केल्यानं त्यातले पोषक घटक (Nutrients) नाहीसे होतात. उन्हाळ्याच्या दिवसात बहुतेक घरांतल्या रेफ्रिजरेटरमध्ये टरबूज ठेवलं जातं. कडाक्याच्या उष्णतेमध्ये थंडगार टरबूज खायला मिळण्यासारखं दुसरं सुख नाही. पण टरबूज फ्रिजमध्ये ठेवणं ही मोठी चूक आहे. असं केल्यानं त्यातल्या पोषक घटकांचं प्रमाण कमी होऊ शकते. यूएसडीएने (United States Department of Agriculture) केलेल्या अभ्यासात ही गोष्ट समोर आली आहे. याशिवाय, जर्नल ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल अँड फूड केमिस्ट्रीमध्ये (Journal of Agricultural and Food Chemistry) प्रकाशित झालेल्या एका रिसर्चनुसार, नुकत्याच काढलेल्या किंवा रेफ्रिजरेट केलेल्या टरबुजांपेक्षा रूम टेंपरेचरमध्ये (Room Temperature) ठेवलेलं टरबूज जास्त पोषक द्रव्यं देतं. Watermelon Seed's Benefits: कलिंगड खाताना बिया काढण्याची नाही गरज; त्याचाही आरोग्याला असा होतो फायदा
    ओक्लाहोमा (Oklahoma) इथल्या लेनमध्ये असलेल्या यूएसडीएच्या साउथ सेंट्रल अ‍ॅग्रिकल्चरल लॅबोरेटरीमधल्या संशोधकांनी टरबुजाच्या अनेक लोकप्रिय जातींची 14 दिवस चाचणी केली. त्यांनी 70, 55 आणि 41 डिग्री फॅरेनहाइट तापमानात कलिंगडं साठवली. या चाचणीमध्ये त्यांना असं आढळलं की, 70 डिग्री फॅरेनहाइट तापमानामध्ये साठवलेल्या टरबुजांमध्ये नुकत्याच शेतातून तोडून आणलेल्या किंवा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेल्या टरबुजांपेक्षा जास्त पोषक घटक असतात. विविध पोषक तत्त्वं असलेलं टरबूज हे सुपर हायड्रेटिंग फळ आहे. अगदी कमी वेळात शरीराला थंडावा देण्याची क्षमता त्यामध्ये आहे. डीके पब्लिशिंग हाउसच्या 'हीलिंग फूड्स' या पुस्तकातल्या माहितीनुसार, कलिंगडाच्या गरामध्ये आढळणारी अमिनो अ‍ॅसिड्स आणि सिट्रुलीनमुळे नायट्रिक ऑक्साइडच्या (Nitric oxide) उत्पादनाला चालना मिळते. परिणामी आपलं रक्ताभिसरण सुरळीत होऊन ब्लड प्रेशर (BP) नियंत्रणात राहतं. टरबुजामुळे आपलं शरीर डिटॉक्स होतं व जळजळदेखील कमी होते. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे टरबुजामध्ये अतिशय कमी कॅलरीज असतात. त्यामुळं गोड खाण्याची आवड असलेल्या व्यक्ती टरबुजाच्या मदतीनं आपली ही आवड अगदी सहज पूर्ण करू शकतात. रिसर्चर्सनी दिलेल्या माहितीनुसार, कलिंगडं शेतातून काढल्यानंतरही त्यामध्ये काही पोषक तत्त्वांची निर्मिती होते. कलिंगडं फ्रीजमध्ये ठेवली, तर ही संपूर्ण प्रक्रिया मंदावते किंवा थांबते. याशिवाय रेफ्रिजरेटेड तापमानात ते एका आठवड्यात खराब (Decaying) होण्यास सुरुवात होऊ शकते. (टरबूज साधारण 14 ते 21 दिवस टिकू शकतं.) त्यामुळं कलिंगड कायम रूम टेंपरेचरमध्ये ठेवलं पाहिजे. त्यामुळे त्यांतल्या पोषक घटकांचा आपल्याला पुरेपूर फायदा मिळेल. टरबूज एकदम थंडगार पाहिजे असेल तर त्यापासून तुम्ही पॉपसिकल्ससारखे (Popsicles) पदार्थही बनवू शकता.
    First published:

    Tags: Food, Summer season

    पुढील बातम्या