दूध पिण्याआधी आणि नंतर चुकूनही करू नका या चूका, होतील घातक परिणाम

दूध पिण्याआधी आणि नंतर चुकूनही करू नका या चूका, होतील घातक परिणाम

नियमित दूध प्यायल्याने स्नायू बळकट होतात. म्हणूनच तज्ज्ञ व्यायामासोबत दुधाचा आहार घेण्याचा सल्ला देतात.

  • Share this:

दुधात व्हिटामिन, खनिज, प्रोटीन आणि अँटी-ऑक्सिडन्टचे गूण असतात. याशिवाय दुधात आवश्यक ते अमीनो अॅसिडही असतं. नियमित दूध प्यायल्याने स्नायू बळकट होतात. म्हणूनच तज्ज्ञ व्यायामासोबत दुधाचा आहार घेण्याचा सल्ला देतात. दुधात मौजूद कॅल्शियम, व्हिटामिन डी, फॉस्फोरस आणि मॅग्नीशियमचे गूण असतात. यामुळेच दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करणं अत्यंत आवश्यक आहे. यामुळे ऑस्टियोपोरोसिस आजार होण्यापासून वाचता येऊ शकते शिवाय फ्रॅक्चरची जोखिमही कमी होते. जर तुम्ही दररोज दूध पित असाल तर त्याचा फायदा तुम्हाला नक्की मिळेल. पण दूध पिण्याच्या आधी आणि नंतर काही गोष्टी लक्षात ठेवणं फार आवश्यक आहे.

आंबट फळांवर कधीही दूध पिऊ नका- दूध पिण्याआधी आणि प्यायल्या नंतर आंबट फळं खाऊ नका. जर असं केलं तर तुम्हाला उलटी होऊ शकते. यासोबतच पोटाच्या संबंधी अनेक आजार होऊ शकतात.

दूध पिण्याआधी कारलं किंवा भेंडी खाऊ नका- दूध पिण्याआधी कधीही कारलं किंवा भेंडीची भाजी खाऊ नये. या भाज्या खाल्यानंतर जर तुम्ही दूध प्यायल्यात तर चेहऱ्यावर काळे डाग येतात. याशिवाय चेहरा काळाही पडू शकतो. चेहऱ्यावर अॅलर्जी होऊ शकते.

उडदाची डाळ खाल्ल्यानंतर दूध पिऊ नये- उडदाची डाळ खाल्ल्यानंतर दूध प्यायल्यास अपचनाचा त्रास होतो. दोन्ही गोष्टी एकाचवेळी घेणं हे शरीरासाठी धोकादायक आहे. ही डाळ खाल्ल्यानंतर दूध प्यायल्यास पोट दुखी, उल्टी आणि शरीर जड वाटणं यांसारखे त्रास होतात.

मुळा किंवा जांभूळ खाऊ नये- जर तुम्ही मुळा किंवा जांभूळ खात असाल तर त्यानंतर लगेच दूध पिऊ नये. असं केल्यास तुम्हाला त्वचेशी निगडीत अनेक आजार होऊ शकतात. चेहऱ्यावर खाज येण्यापासून चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ शकतात.

मासे खाल्यानंतर दूध पिऊ नका- मासे खाणं हे शरीरासाठी फार फायदेशीर आहे हे तर साऱ्यांनाच माहीत आहे. त्वचा आणि केसांसाठी फार फायदेशीर आहे. मात्र मासे खाल्ल्यानंतर लगेच दूध पीणं शरीरासाठी धोकादायक आहे. असं केल्यास अपचनाचा त्रास होऊ शकतो यासोबतच पोटाचे अनेक विकार होऊ शकतात. एवढंच नाही तर काही वेळा फूड पॉयझनिंगही होऊ शकतं. पोटदुखी, शरीरावर पांढरे चट्टेही उमटू शकतात.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

आयोडिनच्या मदतीने थायरॉइड राहील नियंत्रणात, जाणून घ्या फायदे

या सोप्या टिप्सने तुम्ही ब्रेस्ट कॅन्सर होण्यापासून स्वतःला वाचवू शकता

आयुष्यात मोठा बदल घडवायचा असेल तर बुद्धाचे हे विचार एकदा वाचाच!

VIDEO: मंत्र्यांची भेट न झाल्यानं शिक्षकांनी उचललं टोकाचं पाऊल, मंत्रालयावरून मारली उडी

First published: September 19, 2019, 11:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading