तुमची आवडती मॅगी आता होणार अळणी !

तुमची आवडती मॅगी आता होणार अळणी !

  • Share this:

31 मे : 2 मिनिट्स मॅगी नूडल्स पुन्हा एकदा चर्चेत आलीये. मॅगी हा पदार्थ अनेकांच्या आवडीचा आहे तर काहींच्या सोईचा. सोईचा यासाठी कारण मॅगी बनवायला फार काही कष्ट घ्यावे लागत नाहीत, ना वेळ लागत. पण झटकीपट तयार होणारी हीच मॅगी आता थोडीशी अळणी होणार आहे. कारण मॅगीतील मीठाचं प्रमाण कमी करण्याचा निर्णय नेस्ले इंडियाकडून घेतला आहे.

सध्या बाजारात पंतजलीच्या हेल्दी आणि केमिकल फ्री प्रोडक्ट्सचा बोलबाला आहे. त्यातच 2015मध्ये मॅगी नूडल्समध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट(अजिनोमोटो) आणि शिशाचं प्रमाण अधिक असल्याचे विविध चाचण्यांतून समोरं आल्यानंतर देशात मॅगीवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे नेस्ले कंपनीला मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागलं.

त्यामुळेच मॅगीला अधिक हेल्दी बनवण्यासाठी त्यातलं मीठाचं प्रमाण कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार 2020 पर्यंत नूडल्स, सुप, सॉस आणि सिसनिंग या मॅगीच्या प्राॅडक्ट्समधील मीठाचं प्रमाण 10 टक्कांनी कमी करण्यात येईल.

सध्या खाद्यपदार्थाच्या चवीप्रमाणेच तो पदार्थ आरोग्याला किती पोषक आहे, हेही पाहण्याची लोकांमधील जागरुकता वाढली आहे. म्हणूनच मार्केटमधील हेल्दी पदार्थांची मागणी वाढलीय. 'आम्ही एक नवीन, अधिक चांगला आणि आरोग्यास पोषक असा मॅगी ब्रँड तयार करण्याचा प्रयत्न करतोय,' असं नेस्ले इंडियाचे चेअरमन असलेल्या सुरेश नारायण यांनी म्हटलंय. त्यामुळेच नेस्ले इंडियाने मॅगीमध्ये हा बदल केला आहे.

First published: May 31, 2017, 1:00 PM IST
Tags:

ताज्या बातम्या