मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

हँड सॅनिटायझरचा सुलभ वापर नक्कीच ठरणार लाभदायक!

हँड सॅनिटायझरचा सुलभ वापर नक्कीच ठरणार लाभदायक!

 तुम्ही तुमच्या घरी व आजूबाजूला हा विषाणू पसरला जाऊ नये यासाठी काय उपाययोजना कराल?

तुम्ही तुमच्या घरी व आजूबाजूला हा विषाणू पसरला जाऊ नये यासाठी काय उपाययोजना कराल?

तुम्ही तुमच्या घरी व आजूबाजूला हा विषाणू पसरला जाऊ नये यासाठी काय उपाययोजना कराल?

    आपले जीवन हे खूपच धावपळीचे झाले आहे, क्षणाक्षणाला घडामोडी घडत असतात आणि विविध ठिकाणी आपला थेट संपर्क येत असतो. अशाच काही अनपेक्षित ठिकाणी लपून राहिलेले किंवा टपून बसलेले हानिकारक जंतू आणि जीवाणू आपल्यावर हमला करू शकतात. नेहमी साबण व पाण्याने हात धुणे शक्य होत नाही, त्यामुळे अशा प्रसंगातून वाचण्यासाठी चांगला अल्कोहोल बेस्ड हँड सॅनिटायझर वापरणे गरजेचे आहे. घरी असताना: तुमच्या घरी तुम्हाला भेटायला आलेला पाहुणा किंवा तुमच्या घरी काम करणारी कामवाली बाई, हे कशावरून जंतू आणि विषाणूचे ‘संभाव्य वाहक’ नसतील? तुम्ही तुमच्या घरी व आजूबाजूला हा विषाणू पसरला जाऊ नये यासाठी काय उपाययोजना कराल? अगदी सोपे आहे, तुम्हाला तुमच्या दाराजवळ फक्त हँड सॅनिटायझर ठेवायचा आहे, जेणेकरून तुमच्या घरी येणारी कोणतीही व्यक्ती तिचे हात स्वच्छ व निर्जंतुक करून घरात प्रवेश करेल व तुमचे घर जंतूमुक्त ठेवण्यास मदत होईल. ऑफिसमध्ये असताना: आपल्या कामाच्या ठिकाणी एकाधिक लोकांचा वावर असणार्‍या जागा म्हणजे कॉन्फरन्स रुम, बाथरुम, कॅफेटॅरिया आणि लिफ्ट व त्यातील बटने. या सर्व जागा जंतूंचा ‘संभाव्य वाहक’ आहेत. त्यामुळे, तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही इतरांपासून सुरक्षित अंतर राखून सर्वतोपरी काळजी घेत असतानाच, तुम्हाला व्हाईटबोर्डवर लिहिताना हातात धरावयाचा मार्कर असो किंवा तुमच्या सहकार्‍याकडून घेतलेले पैसे असोत, अतिशय सावधगिरीने या गोष्टी हाताळता आल्या पाहिजेत. अनेक जणांचा अशा गोष्टींशी थेट संपर्क येत असतो आणि त्यामुळे पृष्ठभागावर असलेले विषाणू अगदी सहजपणे तुमच्या हातावर येऊ शकतात. म्हणूनच थोडे स्मार्ट बना आणि प्रभावी हँड सॅनिटायझरचा वापर करा, ज्यामुळे जंतूंची होणारी वाढ व प्रसार त्वरित खुंटला जाईल. प्रवासात असताना: विचार करा, ज्या कॅबच्या दरवाज्याला तुम्ही हात लावला आहे, त्याला हजारो लोकांनी स्पर्श केला असणारच व त्यावर असलेले जंतू तुमच्या हातावर येऊन कदाचित तुमचा चेहरा किंवा डोळ्यांपर्यंत येऊन पोहोचतील. हँडलचा स्पर्श टाळणे कदाचित शक्य नसेल मात्र हँड सॅनिटायझर बाळगणे ही चांगली सवय आहे, ज्यामुळे तुमचे हात निर्जंतुक होण्यास मदत होईल. जंतूंचा ‘संभाव्य वाहक’ कोण याची जर यादी करायची ठरवली तर सर्वात पहिला नंबर असेल कॅशचा (रोख रक्कम). ही कॅश अनेकांच्या हातातून, विविध पृष्ठभागावरून, कसल्याही वातावरणातून प्रवास करीत असते. त्यामुळे संक्रमित नोटा (रोख) हाताळण्यापेक्षा त्वरित ऑनलाईन पेमेंटचा पर्याय निवडा व विषाणू संक्रमणाच्या धोक्यापासून तुमचे व तुमच्या ड्रायव्हरचे रक्षण करा. हा पर्याय तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढा हँड सॅनिटायझर बाळगण्याचा, जो प्रवासात असतानाही तुमच्या हातावरील जंतूंचा त्वरित नायनाट करतो. रेस्टॉरंट/कॅफेमध्ये असताना: ‘अनलॉक’च्या प्रक्रियेत आता हळूहळू व्यवसाय, उद्योगधंदे, रेस्टॉरंट सुरू व्हायला लागले आहेत. मात्र, हा खरा कसोटीचा काळ आहे कारण ज्या दरवाजाच्या हँडलला, खुर्च्यांना किंवा मेन्यूला तुम्ही हात लावणार आहात त्याला तुमच्याआधी हजारो लोकांनी स्पर्श केला आहे व ज्यावर जंतूंचा वावर नक्कीच असणार. त्यामुळे अधिक काळ प्रभावी ठरणारे उच्च दर्जाचे हँड सॅनिटायझर वापरा, जेणेकरून तुमचा धोका टळेल व तुम्ही नेहमी संरक्षित राहाल. हे असे काही प्रसंग आहेत जिथे आपण काहीही असेच सोडू शकत नाही आणि आपण स्वतः व आपल्या सभोवताली असलेले सर्व नेहमी स्वच्छ संरक्षित ठेवण्याची सावधगिरी बाळगायला पाहिजे. अतिशय चांगल्या प्रकारे बनवलेला हँड सॅनिटायझर जंतूंचा प्रसार रोखण्यास आणि कोणत्याही आजारापासून रक्षण करण्यास मदत करतो. तर मग मंडळी, इतरत्र काय शोधताय, तुमच्यासाठी सादर आहे Nerolac हँड सॅनिटायझर,  WHO (जागतिक आरोग्य संघटना) शिफारशीत फॉर्म्युला असलेला, जीवाणू, विषाणू आणि बुरशी असलेले 99.99% जंतू मारण्याचा समर्पक व खात्रीशीर पर्याय आहे. यामध्ये आहे ग्लिसेरॉल जे तुमच्या त्वचेला मुलायम व मॉईश्चराईज्ड ठेवते. सुमारे 75% अल्कोहोल कंटेंट असलेले हे ट्रॅव्हल फ्रेंडली हँड सॅनिटायझर वापरण्यास अतिशय सोपे आहे. तुम्हाला केवळ तळहातावर 5ml घ्यायचे आहे व तुमचे हात व बोटांवर योग्यरित्या चोळायचे आहे. सार्वजनिक वाहतुकीत व्यतित होणारा प्रचंड वेळ ते शेअर होणारे वॉशरुम वापरणे किंवा रुग्णालयात एखाद्या नातेवाईकास भेटायला जाणे, अशा अनेक स्थितींमध्ये आपले हात थेटपणे दररोज लाखो जंतूंशी संपर्कात येत असतात. त्यामुळेच, या सर्वांवर प्रभावी उपाय म्हणजे Nerolac हँड सॅनिटायझर, ज्यामुळे तुमचा जंतूंशी थेट संपर्क फार कमी प्रमाणात होईल व तुमची आजारी होण्याची शक्यताही फार कमी होईल. आत्ताच खरेदी करण्यासाठी क्लिक करा: amazon.in/nerolac
    First published:

    पुढील बातम्या