High BP चा त्रास असेल तर ही 3 फळं तुमच्यासाठी आहेत उत्तम; कंट्रोलमध्ये राहतं Blood Pressure
कडुलिंब अनेक स्किनकेअर (Neem Leaves Skin Benefits) उत्पादनांमध्ये वापरले जाते. त्याचे अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म त्वचेवरील मुरुम आणि अतिरिक्त तेल कमी करण्यास मदत करतात. हे पिगमेंटेशन आणि सूर्यकिरणांमुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेला वाचवते. कडुलिंबाच्या पानांची पेस्ट तयार करून ती चेहऱ्यावर लावावी. याने तुम्हाला नक्कीच फायदा होतील. त्वचेप्रमाणेच कडुलिंब केसांसाठीदेखील (Neem Leaves Hair Benefits) फायदेशीर आहे. हे अँटी-डँड्रफ शॅम्पूमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. कडुलिंबामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहे. जे कोंडा आणि खाज कमी करते. स्किन आणि केसांसाठी तिळाचा असा करा वापर; नॅचरली मिळतील अनेक पोषक घटक कडुलिंबाची पाने ही सर्वात सामान्य, स्वस्त आणि सहजपणे उपलब्ध होणारे कीटकनाशक (Neem Leaves Are Insect Repellent) आहे. हे पिसू आणि डासांवर प्रभावी आहे. डासांना दूर ठेवण्यासाठी एका भांड्यात कडुलिंबाची काही कोरडी पाने जाळून टाका. कपड्यांमध्येही कडुलिंबाची पाने ठेवल्यास त्यामध्ये कीटकं लागण्याची शक्यता कमी होते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Diabetes, Health, Health Tips, Lifestyle, Skin care