Home /News /lifestyle /

कडुलिंबाचा काढा वजन कमी करण्यासाठी आहे प्रभावी; जाणून कसा बनवायचा आणि कधी प्यायचा

कडुलिंबाचा काढा वजन कमी करण्यासाठी आहे प्रभावी; जाणून कसा बनवायचा आणि कधी प्यायचा

Neem Kadha For Weight Loss : कडुलिंबाचा काढा प्यायल्याने चयापचय वाढते आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. त्यामुळे वजनही हळूहळू कमी होऊ लागते.

    नवी दिल्ली, 29 डिसेंबर : आयुर्वेदात कडुनिंबाचा (Neem) उपयोग अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो. त्वचेवर मुरुम, खाज सुटणे किंवा कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास कडुनिंबाच्या पानांचा (Neem leaves) रस तयार करून प्यावा, त्याचे काही दिवसातच चांगले परिणाम दिसू लागतात. यासोबत कडुलिंब हे वजन कमी करण्यातही मदत करतं (Neem Kadha For Weight Loss). कडुलिंबात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. कडुलिंबाच्या पानांपासून बनवलेला काढा (Neem Kadha) मूत्रपिंड आणि यकृताशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. कडुलिंबाचा काढा प्यायल्याने चयापचय वाढते आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. त्यामुळे वजनही हळूहळू कमी होऊ लागते. कडुलिंबाची पाने खाऊनही तुम्ही वजन कमी करू शकता. हे वाचा - कोरोना काळात लहान मुलांना अनेक आजारांपासून कसे ठेवाल दूर? जाणून घ्या, काही टिप्स असा बनवा कडुलिंबाचा काढा कडुलिंबाचा काढा बनवण्यासाठी तुम्हाला कडुलिंबाची पाने, आले, मध, लिंबाचा रस, काळी मिरी आणि पाणी लागेल. सर्व प्रथम, काही ताजी कडुलिंबाची पाने गोळा करा आणि ती पूर्णपणे स्वच्छ करा. आता दोन ते तीन ग्लास पाणी घेऊन गॅसवर उकळायला ठेवा. पाण्याला उकळी आल्यावर त्यात कडुलिंबाची पाने टाका. कडुलिंबाची पाने चांगली उकळू द्या. यामध्ये तुमच्या चवीनुसार आले आणि काळी मिरी घाला. पाणी कमी झाल्यावर गॅस बंद करून पाणी एका ग्लासमध्ये गाळून घ्या आणि त्यात चवीनुसार लिंबाचा रस आणि मध घाला. कडुलिंबाचा काढा तयार आहे. हे वाचा - Bathroom Stroke: हिवाळ्यात अंघोळ करताना होणारी ही चूक ठरू शकते जीवघेणी; बाथरूम स्ट्रोकबद्दल माहीत आहे का? कडुलिंबाचा काढा पिण्याची योग्य वेळ दररोज सकाळी रिकाम्या पोटी या काढ्याचे सेवन करा. हा काढा प्यायल्यानंतर तासभर काहीही खाऊ नका किंवा पिऊ नका. रोजच्या रोज ताजा काढा बनवून प्यायल्याने चांगले परिणाम दिसतात. 15 दिवसांच्या सेवनानंतर तुमचे वजन कमी होण्यास सुरुवात होईल. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Lifestyle, Weight, Weight loss tips

    पुढील बातम्या