मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

SEX साठी E-pass हवाय; तरुणाची विचित्र मागणी पाहून पोलीसही चक्रावले आणि...

SEX साठी E-pass हवाय; तरुणाची विचित्र मागणी पाहून पोलीसही चक्रावले आणि...

अर्जंट कारण असं सांगत लोक कुठल्या कारणासाठी E Pass चा अर्ज करतील याचा नेम नाही..  या माणसाचं पुढे काय झालं तुम्हीच वाचा...

अर्जंट कारण असं सांगत लोक कुठल्या कारणासाठी E Pass चा अर्ज करतील याचा नेम नाही.. या माणसाचं पुढे काय झालं तुम्हीच वाचा...

अर्जंट कारण असं सांगत लोक कुठल्या कारणासाठी E Pass चा अर्ज करतील याचा नेम नाही.. या माणसाचं पुढे काय झालं तुम्हीच वाचा...

  • Published by:  Priya Lad

थिरुवनंतपुरम, 13 मे : देशात अनेक ठिकाणी कोरोनाव्हायरसचा (Coronavirus Crisis in India)धोका वाढल्यामुळे लॉकडाउनचा (Coronavirus Lockdown restrictions) उपाय अनेक राज्यांनी अंगिकारला आहे. शेवटचा पर्याय म्हणून लॉकडाउन करणार असं सांगितलं जात असलं, तरी कोरोनाचा मृत्युदर वाढतो आहे आणि संक्रमणाचं प्रमाण तर धोकादायक पातळीवर पोहोचलं होतं. फक्त अत्यावश्यक कारणासाठीच या लॉकडाउनमध्ये प्रवासाला परवानगी दिली जात आहे.

महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी त्यामुळे आंतरराज्य तसंच आंतरजिल्हा प्रवासावरही निर्बंध घातले आहेत. त्यासाठी E pass काढणं आवश्यक आहे. इ-पासच्या प्रक्रियेसाठी योग्य कारण दाखवून पुरावा देणं आवश्यक आहे, तरच प्रवासाला परवानगी मिळते. पोलिसांना आणि जिल्हा प्रशासनाला अनेक ठिकाणी शेकड्याने e pass साठी विनंती अर्ज येत आहेत. त्यातले बरेच अर्ज खऱ्या कारणांसाठी आहेत, तर काही मात्र अत्यंत क्षुल्लक आणि हास्यास्पद कारणासाठी मागितले जात आहेत. अर्थातच ते निकालात काढले जातात. असाच एक अर्ज केरळ पोलिसांकडे आला आणि ते चक्रावून गेले.

केरळ पोलिसांकडे E Pass ची मागणी करण्याचं कारण एका व्यक्तीने चक्क sex करण्यासाठी बाहेर पडायचं आहे, असं लिहिलं होतं. या पद्धतीचा अर्ज आल्यावर पोलीस सतर्क झाले. त्यांनी ती व्यक्ती कोण ते शोधून काढलं. त्याला पोलीस स्टेशनला पाचारण करण्यात आलं. तेव्हा त्याने पोलिसांची माफी मागितली.

महाराष्ट्रातील फक्त एक जिल्हा; राज्यासह केंद्रालाही देतोय कोरोनाचा 'ताप'

आपण चुकून अर्जावर सेक्स असं लिहिलं खरं तर ते सिक्स ओ क्लॉक असं लिहायचं होतं, असं म्हणत त्याने माफी मागितल्याने त्याला सोडून देण्यात आलं.

आणखीही काही ठिकाणी अशा फालतू कारणांसाठी प्रवासाची परवानगी मागण्यात आली. एका महिलेने पिंपल्सच्या ट्रीटमेंटसाठी अर्जंट इ पास मागितला. तोही नाकारण्यात आला. ही ट्रीटमेंट थांबू शकते, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

First published:

Tags: Coronavirus, Kerala, Lockdown, Police, Sex