मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

व्हायरसला घराबाहेर ठेवण्यासाठी हवा-सूर्यप्रकाश घरात येऊ द्या

व्हायरसला घराबाहेर ठेवण्यासाठी हवा-सूर्यप्रकाश घरात येऊ द्या

ज्या घरांमध्ये नैसर्गिक प्रकाश आणि हवा खेळती आहे, त्या घरांमध्ये व्हायरसचं (virus) इन्फेक्शन होण्याची शक्यता कमी आहे.

ज्या घरांमध्ये नैसर्गिक प्रकाश आणि हवा खेळती आहे, त्या घरांमध्ये व्हायरसचं (virus) इन्फेक्शन होण्याची शक्यता कमी आहे.

ज्या घरांमध्ये नैसर्गिक प्रकाश आणि हवा खेळती आहे, त्या घरांमध्ये व्हायरसचं (virus) इन्फेक्शन होण्याची शक्यता कमी आहे.

  • Published by:  Priya Lad

नवी दिल्ली, 21 एप्रिल : कोरोनाव्हायरसचा (coronavirus) प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे, ज्यामुळे प्रत्येक जण घरात बंदिस्त आहे. मात्र जर घराची दारं-खिडक्या बंद असतील तर घरातही व्हायरसचा धोका बळावू शकतो. त्यामुळे व्हायरसला घराबाहेर ठेवण्यासाठी घरात पुरेसा प्रकाश आणि नैसर्गिक हवा येऊ द्या, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

हिंदुस्तान ई-पेपरने भारतीय विज्ञान आणि पर्यावरण केंद्राचा हवाला देत एक वृत्त दिलं आहे. ज्या घरांमध्ये नैसर्गिक प्रकाश आणि हवा खेळती आहे, त्या घरांमध्ये व्हायरसचं इन्फेक्शन होण्याची शक्यता कमी आहे.

हे वाचा - पाण्यामार्फतही पसरू शकतो coronavirus; काय सांगतात तज्ज्ञ?

रिपोर्ट बियाँड द फॉर वॉल्स ऑफ पीएमएवायनुसार, "वातानुकूलित घरात बंदिस्त असलेल्या हवेमुळे संसर्गजन्य आजार वाढू शकतात. तर दाटीवाटीच्या ठिकाणी असलेल्या घरात जिथं व्हेंटिलेशन नसतं, अशा ठिकाणीही अशा आजारांचा धोका अधिक आहे."

तुम्ही तुमचं घर कसं हवेशीर ठेवाल?

खिडकी आणि दरवाजे पूर्णपणे खुले होतील, याची काळजी घ्या.

त्यामुळे खिडकी, दरवाजे उघडण्यात एखाद्या फर्निचरमुळे अडचण येत असेल, तर त्या फर्निचरची जागा बदला.

अनेकांना खिडकी-दरवाजे नेहमी बंद ठेवण्याची सवय असते, तुमची ही सवय बदला. जेणेकरून खिडकी, दरवाजातून हवा आणि ऊन आत येईल आणि नैसर्गिक सॅनिटायझरप्रमाणे काम करेल.

घरात वेंटिलेशन असणं खूप गरजेचं आहे. यासाठी घरात एग्जॉस्ट फॅन सुरू ठेवावा जेणेकरून बाहेरील हवा आत येईल आणि पुन्हा आतील हवा बाहेर जाईल. अशी हवा खेळती राहिल.

कपडे घरात कधीही सुकवू नका. यामुळे घरातील हवेत आर्द्रता निर्माण होते.

घरात छोटी छोटी झाडंही असावीत, जेणेकरून प्रसन्न वाटेल.

संकलन, संपादन - प्रिया लाड

हे वाचा - किम जोंग उन यांना नेमकं झालं काय? Grave Danger चा काय आहे अर्थ?

First published:

Tags: Coronavirus, Virus