Home /News /lifestyle /

Sleeping : तुम्हीही रोज 7.30 तासांपेक्षा कमी झोपता का? तज्ज्ञांनी दिलाय हा इशारा

Sleeping : तुम्हीही रोज 7.30 तासांपेक्षा कमी झोपता का? तज्ज्ञांनी दिलाय हा इशारा

संशोधक आणि न्यूरोलॉजिस्ट डॉ. ब्रेंडन लुसी सांगतात की, अपूर्ण झोप किंवा नीट झोप न लागल्यामुळे त्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो. मेंदूवरील हा परिणाम तुमच्या विचार आणि समजण्याच्या क्षमतेवर आणि स्मरणशक्तीवर (Sleeping proper time) दिसून येतो.

पुढे वाचा ...
    वॉशिंग्टन, 04 नोव्हेंबर : निरोगी राहण्यासाठी झोप खूप (Sleeping) महत्त्वाची आहे. गरजेपेक्षा कमी झोपणे किंवा जास्त झोप घेणं हे देखील शरीरासाठी हानिकारक आहे. जे लोक साडेसात तासांपेक्षा कमी झोपतात, त्यांची स्मरणशक्ती कमी होऊ शकते. वॉशिंग्टन विद्यापीठाच्या संशोधकांनी त्यांच्या संशोधनात हा दावा केला आहे. संशोधक आणि न्यूरोलॉजिस्ट डॉ. ब्रेंडन लुसी सांगतात की, अपूर्ण झोप किंवा नीट झोप न लागल्यामुळे त्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो. मेंदूवरील हा परिणाम तुमच्या विचार आणि समजण्याच्या क्षमतेवर आणि स्मरणशक्तीवर (Sleeping proper time) दिसून येतो. संशोधक म्हणतात, 'जर तुम्हाला 8 तासांची झोप मिळत असेल. जर तुम्ही 30 मिनिटे आधी अलार्म लावला तर साडेसात तासांच्या झोपेचा मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो. अल्झायमर रोगाचा धोका कमी होतो म्हणजेच गोष्टी विसरणार नाहीत. मेंदूमध्ये अल्झायमर कसा वाढतो, शास्त्रज्ञांनी अशा प्रकारे स्पष्ट केले खरं तर, झोपताना आपल्या शरीरात काही सकारात्मक बदल होतात. यामध्ये आपली वाढ, सुधारणा, पेशींची विश्रांती आणि मानसिक विकास यांचा समावेश होतो. जर आपण पुरेशी झोप घेतली नाही तर आपल्याला हे फायदे मिळत नाहीत. पुरेशी झोप न मिळणे हे मानसिक क्षमता आणि स्मरणशक्तीसाठी खूप धोकादायक आहे. तुमची स्मरणशक्ती कमी होऊ शकते, स्मृतिभ्रंश देखील होऊ शकतो. ज्यांना पुरेशी झोप मिळत नाही ते अनेकदा तणाव आणि मानसिक समस्यांना बळी पडतात. पुरेशी झोप न मिळाल्याने मेंदूला योग्य प्रमाणात विश्रांती मिळत नाही. सरासरी 75 वर्षे वय असलेल्या 100 वृद्धांवर केलेल्या संशोधनातही याची खात्री झाली आहे. संशोधनासाठी या ज्येष्ठांच्या कपाळावर एक छोटा मॉनिटर बांधण्यात आला होता. झोपेच्या वेळी मेंदूमध्ये कोणत्या प्रकारची क्रिया घडते, हे मॉनिटरद्वारे तपासले गेले. सरासरी साडेचार वर्षे चाललेल्या संशोधनात याचा मेंदूच्या क्रियाकलापांवर परिणाम होत असल्याचे समोर आले. हे वाचा - पतीला Porn Video बघायचं लागलं होतं व्यसन, पत्नीनं अडवताच सुरुवात केली छळवणूक करण्यास शास्त्रज्ञांच्या मते, रुग्णांमध्ये अल्झायमर रोगासाठी एक विशेष प्रकारची प्रथिने जबाबदार असतात. संशोधनात सहभागी असलेल्या वृद्धांच्या मेंदूच्या सेरेब्रोस्पाइनल फ्लुइडमध्ये त्या प्रोटीनची पातळी काय आहे. दररोज रात्री सुमारे 7.5 तास झोपलेल्या रुग्णांचे संज्ञानात्मक गुण चांगले होते. जे लोक दिवसातून 5 किंवा साडेपाच तास झोपतात त्यांच्यात हे गुण कमी आढळले. हे वाचा - आत्मघाती हल्ल्यात मारला गेला Talibanचा कमांडर मुखलिस, घनींच्या खुर्चीवर बसलेला Photo झाला होता व्हायरल झोपेच्या कमतरतेचा परिणाम तुमच्या पचनसंस्थेवरही होतो. पुरेशी झोप न मिळाल्याने पचनशक्ती कमकुवत होते, त्यामुळे तुम्हाला पोटदुखी किंवा बद्धकोष्ठतेची समस्या देखील होऊ शकते. झोपेच्या कमतरतेमुळे शरीर आणि मनाला पूर्ण विश्रांती मिळत नाही, त्यामुळे शारीरिक दुखणे, जडपणा, डोके जड होणे, चिडचिड होणे अशा समस्या उद्भवतात. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Sleep, Sleep benefits

    पुढील बातम्या