मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

नवरात्रीसाठी खरेदी करताय? पाहा मुंबईच्या बाजारात काय आहे नवीन ट्रेंड, VIDEO

नवरात्रीसाठी खरेदी करताय? पाहा मुंबईच्या बाजारात काय आहे नवीन ट्रेंड, VIDEO

नवरात्रीचा उत्सव काही दिवसांवर आलाय. या उत्सवासाठी मुंबईतील बाजरपेठा सज्ज झाल्या आहेत. मुंबईतील बाजरपेठामध्ये नवरात्रीनिमित्त काय ट्रेंड आहे पाहूया...

मुंबई 23 सप्टेंबर :  नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांव आलाय.  त्यानिमित्तानं शहरातील बाजारपेठा नवंरंगानी सजल्या आहेत. नवरात्र काळात लागणारे विविध साहित्य बाजारपेठेत विक्रीसाठी आले असून दांडिया खेळताना परिधान करण्यात येणारा पोशाख ते पायात घातली जाणारी कच्छी जुती वेगवेगळ्या फॅशन ट्रेंड नुसार बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर यंदा बाजारात ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि वेगवेगळे ट्रेंड्स कस्टमाईज करून ग्राहक नेत असल्याची माहिती भुलेश्वर मार्केट मधील विक्रेत्यांनी दिली आहे. काय आहे नवीन ट्रेंड ? दरवर्षी बाजारपेठेत चनियाचोली, केडीया, दागिने यांचे नवनवीन प्रकार दाखल होतात. प्रत्येक जण आपण कुठला ड्रेस परिधान केल्यावर सुंदर दिसू या दृष्टिकोनातून खरेदी करत असतो. यावर्षी बाजारपेठेत फ्युजन ट्रेंड पाहायला मिळतोय. महिलांची धोती पँट व घेरदार सदऱ्याची मागणी वाढली आहे. तसेच दागिन्यांमध्ये आरसा, लाख, जुट, मनी, धागा यापासून तयार करण्यात आलेल्या ऑक्सीडाईज दागिन्यांचा खप वाढला आहे. तसेच अल्युमिनियम पासून बनवण्यात आलेल्या हलक्या दांडियांना मागणी आहे. हेही वाचा : Aurangabad : इथे मिळेल गरबा आणि दांडियाचं मोफत प्रशिक्षण; औरंगाबादकरांनो लगेच घ्या प्रवेश किती रुपयात तुमची खरेदी होऊ शकते? 1000 ते 2000 रुपयांपर्यंत सुंदर पोशाख खरेदी करू शकतात. तसेच 500 ते 1500 रुपयांपर्यंत चांगले दागिने तुम्ही घेऊ शकता. 50 ते 200 रुपयांपर्यंत दांडिया बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहेत तर 150 पासून 300 रुपयांपर्यंत कच्छी जुती बाजारपेठेमध्ये तुम्हाला मिळेल. 2500 ते 3000 रुपयांपर्यंत तुमची नवरात्री खरेदी स्वस्तात मस्त होऊ शकेल. खरेदीसाठी कुठले मार्केट परवडणारे? आणि तेथे जाण्यासाठी कुठले रेल्वे स्थानक जवळचे? भुलेश्वर मार्केट - मस्जिद स्थानक, मरीन लाइन्स स्थानक, क्रॉफर्ड मार्केट - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, मस्जिद स्थानक, दादर मार्केट - दादर स्थानक,  मुलुंड मार्केट - मुलुंड स्थानक हे मार्केट खरेदी साठी परवडणारे आहेत.
First published:

Tags: Lifestyle, Mumbai, Navratri

पुढील बातम्या