मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Navratri Colours 2022 : तुम्हाला माहिती आहेत का नवरात्रीच्या नऊ दिवसांचे रंग आणि त्यांचे अर्थ? जाणून घ्या

Navratri Colours 2022 : तुम्हाला माहिती आहेत का नवरात्रीच्या नऊ दिवसांचे रंग आणि त्यांचे अर्थ? जाणून घ्या

नऊ रात्री रंग

नऊ रात्री रंग

नवरात्र सुरू झाली आहे. नऊ दिवसांचे नऊ रंग जाणून घ्या.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

मुंबई, 26 सप्टेंबर:   आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. पुढचे नऊ दिवस नवरात्रीची धूम असणार आहे. नवरात्रीच्या नऊ रात्री दुर्गा देवीच्या नऊ वेगवेगळ्या अवतारांना समर्पित आहेत. भगवान शिवाची पत्नी दुर्गा हिने वेगवेगळे अवतार धारण केले होते. सणाचा पहिला दिवस शैलपुत्री अवतारापासून सुरू होतो. त्यानंतर ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या अवतारांची पूजा अनुक्रमे नऊ दिवस केली जाते.

यंदा 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरदरम्यान नवरात्रोत्सव आहे. नवरात्रीचे नऊ दिवस भाविक देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी उपवास करतात आणि नवीन कपडे खरेदी करून घालतात. विशेष म्हणजे नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला एका विशिष्ट रंगाचं महत्त्व असतं आणि लोक सहसा त्याच रंगाचे कपडे त्या दिवशी घालतात. इतकंच नाही, तर नवरात्रीची थीमही प्रत्येक दिवशीच्या रंगाप्रमाणे वेगवेगळ्या रंगांमध्ये केली जाते. सर्व सजावट आणि रोषणाई संबंधित दिवसाचा जो रंग असेल, त्याप्रमाणे केली जाते. पिवळा, मोरपंखी, राखाडी, नारंगी, पांढरा, लाल, निळा, गुलाबी आणि जांभळा हे प्रमुख नऊ रंग आहेत. हे रंग कधीच बदलत नाहीत, ते वर्षानुवर्षे सारखेच राहतात. फक्त दरवर्षी नवरात्रीला या रंगांचा क्रम बदलतो.

हेही वाचा - Navratri 2022 : नवरात्रीच्या गरब्यात चमकायचंय? त्वचेच्या उजळपणासाठी वापरा 'हे' 5 घरगुती फेसपॅक!

हिंदू पंचांगनुसार, 2022च्या नवरात्रीसाठी रंगांचा क्रम खालीलप्रमाणे आहे

 1. दिवस 1 - 26 सप्टेंबर - पांढरा
 2. दिवस 2 - 27 सप्टेंबर - लाल
 3. दिवस 3 - 28 सप्टेंबर - निळा
 4. दिवस 4 - 29 सप्टेंबर - पिवळा
 5. दिवस 5 - 30 सप्टेंबर - हिरवा
 6. दिवस 6 - 1 ऑक्टोबर - राखाडी
 7. दिवस 7 - 2 ऑक्टोबर - नारंगी
 8. दिवस 8 - 3 ऑक्टोबर - मोरपंखी
 9. दिवस 9 - 4 ऑक्टोबर – गुलाबी

रंगांचे अर्थ

पांढरा रंग शुद्धता आणि भोळपेणा दर्शवतो, तर लाल रंग आवड आणि प्रेमाचं प्रतीक आहे. निळा रंग शांतता दर्शवतो आणि पिवळा रंग सणाचा उत्साह आणि आनंद दर्शवतो. मोरपंखी रंग वाढ आणि सुपिकतेचं प्रतीक आहे. राखाडी रंग भावनांचं संतुलन दर्शवतो. नारंगी रंग उब व सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे. मोरपंखी रंग विशेषता आणि व्यक्तिमत्त्व दर्शवतो. सर्वांत शेवटी गुलाबी रंग प्रेम, आपुलकी आणि सुसंवादाचं प्रतीक मानला जातो.

नवरात्रीच्या काळात त्या दिवशीच्या रंगानुसार तुमच्या आवडीचे कपडे घालणं, शुभ मानलं जातं, असं पंचांग सांगतं.

First published:

Tags: Navratri