मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Navratri : दांडिया खेळण्यासाठी घरीच करा मेकअप, पाहा सोप्या टिप्स, Video

Navratri : दांडिया खेळण्यासाठी घरीच करा मेकअप, पाहा सोप्या टिप्स, Video

दांडिया खेळण्यासाठी घरच्या घरी सुंदर मेकअप कसा करावा याच्या काही सोप्या टिप्स जाणून घ्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 28 सप्टेंबर : यंदा कोरोनाचे निर्बंध हटल्यामुळे गणेशोत्सवानंतर आता नवरात्री उत्सव देखील मोठया प्रमाणात साजरा केला जात आहे. या वर्षी नवरात्रीत दांडिया उत्सवाची धम्माल पाहायला मिळत आहे. दांडिया खेळायला जायचं म्हणजे परफेक्ट रेडी होणे आलच. त्यामुळे काही महिला ब्युटी पार्लरमध्ये जाऊन खास मेकअप आपण इतरांपेक्षा कसे वेगळे दिसू शकतो यासाठी करून येतात. पण काही महिलांना ब्युटी पार्लरमध्ये जाऊन मेकअप करणे शक्य नसते. अशाच महिलांसाठी मेकअप आर्टिस्ट चंद्रकांत रणखांबे यांनी घरच्या घरी सुंदर मेकअप कसा करता येऊ शकतो याच्या काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत.

कसा करणार चेहऱ्याचा मेकअप?

सुरुवातीला चेहरा स्वच्छ करून मेकअप साठी तयार ठेवावा. त्यानंतर चेहऱ्याच्या स्किन टोन नुसार कलर करेक्टरने चेहऱ्यावरील डाग, डोळ्यांखालील वर्तुळ सारख्या रंगाची करावी. त्यावर कंसीलर लावावे आणि फाउंडेशन लावून घ्यावे व सेटिंग पावडर लावून चेहरा पुढच्या प्रक्रिये साठी तयार ठेवावा. चेहऱ्यावरील गालाचा चीकबोन वर ब्लश लावून घ्यावं. त्यानंतर चेहऱ्याचा काही भाग हायलाईट करावा.

हेही वाचा : नवरात्रीत झटपट तयार होणारे 'हे' खास पदार्थ; प्रवासातही नेता येतील सहज अन् आरोग्यालाही पोषक

कसा करणार डोळे व ओठांचा मेकअप?

डोळ्यांवर फाउंडेशन लावून घ्यावे. त्यानंतर जेल लाइनरचा वापर करून ते ब्लेंडरने ब्लेंड करावे. आयशॅडोज वापरून सुद्धा तुम्ही डोळ्यांचा साधा मेकअप करू शकता. ओठांवर लिपलायनर लावून घ्यावे जेणेकरून लिपस्टिक ओठांच्या बाहेर जाणार नाही. लिपस्टिक लावून घ्यावी. जर लिपस्टिक डार्क झाली असेल तर त्यावर फेंट शेड लावून ती लाईट करून घ्यावी.

कसा करणार दांडिया स्पेशन टिकली लुक?

काळे गंध किंवा लाईनरचा वापर करून टिकल्या ठेवाव्या. उभ्या - आडव्या रेघा, थेंब, स्वस्तिक, पान, फुल, चंद्र, चांदनी, सूर्य या डिझाईन तुम्ही बनवू शकता. डोळ्यांच्या बाजूला, कपाळावर, हनुवटीवर, गळ्यावर, हातावर या डिझाईन तुम्ही बनवू शकतात.

हेही वाचा : Navaratri 2022 : नवरात्रोत्सवात गरबा खेळताना `या` पादत्राणांचा करा वापर

केशभूषा कशी करणार?

आधी केस विंचरून गुंतलेले केस मोकळे करावे. त्यानंतर मोकळे केस ठेवायचे असतील तर त्यांना कर्ल देऊ शकता किंवा तुम्हाला बांधून ठेवायचे असतील तर बन सुद्धा बनवू शकता. अश्या साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी अर्ध्या तासात तयार होऊन दांडियाची धम्माल करू शकता.

First published:

Tags: Mumbai, Navratri