मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Navaratri 2022 : नवरात्रोत्सवात गरबा खेळताना `या` पादत्राणांचा करा वापर

Navaratri 2022 : नवरात्रोत्सवात गरबा खेळताना `या` पादत्राणांचा करा वापर

shoes for garaba

shoes for garaba

नवरात्रीत, तुमच्या पायाला साजेशा जोडीदार निवडा आणि तुमच्या पायांसाठी सर्वोत्तम अशा चपला किंवा सॅंडलची खरेदी करा.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 27 सप्टेंबर : पादत्राणं ही अशी वस्तू आहे, जी लोक सणासुदीच्या काळात अगदी अखेरच्या टप्प्यात खरेदी करतात. तथापि, सर्वोत्तम ते शेवटी ठेवा कारण पादत्राणं तुमचा लूक घडवू अथवा बिघडवू शकतात, या म्हणीला अनुसरून साधारणपणे लोक चपला किंवा बूट सर्वांत शेवटी विकत घेतात. खरंतर, सणासुदीच्या लूकसाठी योग्य पादत्राणं निवडणं काही वेळा आव्हानात्मक ठरू शकतं. विशेषतः जेव्हा तुम्हाला नवरात्रोत्सवादरम्यान रात्रीच्यावेळी गरब्यामध्ये नृत्य करायचं असतं. या साठी या नवरात्रीत, तुमच्या पायाला साजेशा जोडीदार निवडा आणि तुमच्या पायांसाठी सर्वोत्तम अशा चपला किंवा सॅंडलची खरेदी करा.

जेव्हा तुम्ही तुमच्या आवडत्या घागरा चोलीला सूट होईल अशा नव्या चपला किंवा सॅंडल खरेदी करायचा विचार करता, तेव्हा तुमच्या मनात पायाला आरामदायी कोणती पादत्राणं ठरतील, असा विचार सर्वप्रथम येतो. या सणासुदीच्या काळात ट्रेंडी आणि समकालीन पादत्रणांच्या सीरिजसह तुम्ही खास दांडिया राससाठी हे पाच प्रकारचे फूटवेअर निवडू शकता.

हेही वाचा - नवरात्रीचा उपवास केलाय? या गोष्टींचा आहारात करा समावेश, नाही वाटणार अशक्तपणा

स्नीकर्स - नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही अगदी गांभीर्यानं गरबा खेळणार असाल तर कोणत्याही प्रकारचे स्नीकर्स हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत. खास भारतीय लेहेंगा आणि स्कर्टखाली स्नीकर्स घालण्याचा ट्रेंड अजूनही जोरात आहे. अनेक फॅशन फूटवेअर ब्रॅंड्समध्ये विविध शैलींचा प्रयोग केला जात आहे. 3D अलंकृत एम्ब्रॉयडरी पॅचवर्कमुळे स्नीकर्स अगदी देसी आणि विविधरंगी दिसतात. हे शूज आरामदायी आहेत. तसंच कोणत्याही पारंपरिक वेशभूषेवर ते शोभून दिसतात.

म्यूल्स - म्यूल्समध्ये पारंपरिक आणि आधुनिक शैली एकत्रित पाहायला मिळतात. यामुळे तुमचा उत्सवाचा लूक अधिक सुंदर दिसू शकतो. हे अल्ट्रा स्टायलिश शूज विविध रंग, फॅब्रिक्स आणि टेक्सचरच्या सीरिजमध्ये येतात. अशा प्रकारच्या पादत्राणांना पाठीमागच्या बाजूस किंवा फास्टनिंग येत नसल्यामुळे पायातून म्यूल्स घसरू नयेत म्हणून हाफ फूट थोडे जाड मोजे घालणं योग्य आहे.

हेही वाचा - Navratri 2022: नवरात्रीत न थकता गरबा खेळायचाय? निरोगी शरीर अन् सौंदर्यासाठी फॉलो करा खास टिप्स

ग्लॅडिएटर्स - पाइप स्ट्रॅप्स किंवा फ्लॅट स्ट्रॅप्स असलेले ग्लॅडिएटर सॅंडल सणासुदीच्या पेहरावावर अगदी शोभून दिसतात. जर तुम्ही तुमच्या कॉर्सेट किंवा हॉल्टर टॉप डेनिम शॉर्टसह घालण्याचा विचार करत असाल तर त्यासोबत ग्लॅडिएटर नक्की परिधान करा आणि तुमच्या आवडत्या संगीताचा आनंद तुमच्या शैलीत घ्या. ग्लॅडिएटर सॅंडलचे वेगवेगळे प्रकार आहेत. यापैकी तुम्ही तुमच्या आवडीचे सॅंडल्स निवडू शकता. गरब्यासाठी शक्यतो कुशनचे सोल, झिप फास्टनिंग आणि कमी उंचीचे हिल्स असलेले ग्लॅडिअर निवडा.

डीओर्से - हे आरामदायी, स्टायलिश परंतु खूप नाजूक असे शूज आहेत. डीओर्से हा पादत्राणाचा खास प्रकार आहे. यात बुटाचा घोट्याजवळ भाग कापलेला असतो. यामुळे तुमचा पाय कमनीय वाटतो. भारतात या शैलीला मोजडी किंवा जुटीस असंही संबोधलं जातं. सिल्हूट हे सणासुदीच्या काळात वापरले जाणारे फूटवेअर काळानुरुप विकसित झाले आहेत. एम्ब्रॉयडरी तसंच मण्यांच्या सजावटीच्या वेगवेगळ्या पॅटर्नमुळे सणासुदीच्या काळात ग्राहक याकडे विशेष आकर्षित होतात. या शूजवर एखादा डाग पडला तरी तो लिंट फ्री क्लॉथ, टुथब्रश आणि सौम्य फेस वॉशच्या मदतीनं स्वच्छ करू शकता. त्यामुळे याची निगा राखणंही सोपं आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही.

फ्लॅट्स - जेव्हा संगीत बंद होईल तेव्हा तुमचे पाय नक्कीच तुमचे आभार मानतील. गरब्यामुळे पाय दुखत असताना घरी परतणं तुम्हाला नक्कीच थकवा आणणारं ठरतं. त्यामुळे कोणत्याही प्रकारची पादत्राणं खरेदी करण्यापूर्वी त्यापासून तुमच्या पायांना आराम मिळणार आहे की नाही याचा विचार करा. कोल्हापुरी चप्पल, स्लाईड्स आणि बॅलेरिनासारखे स्लिप अँड गो सॅंडल सणासुदीसाठी योग्य आहेत. ही आरामदायी पादत्राणं आकर्षक रंग, डिझाईन्समध्ये उपलब्ध असतात. त्यामुळे सणासुदीनिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये तुम्ही त्यांचा वापर नक्कीच करू शकता.

First published:

Tags: Fashion, Navratri