Navratri 2019 : घटस्थापनेकरता योग्य मुहूर्त कोणता? पंचाकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली माहिती

नवरात्रामध्ये देवीची पूजा करण्य़ासाठी मुहूर्त कोणता? पूजेचं काय आहे महत्त्व जाणून घ्या पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांच्याकडून.

News18 Lokmat | Updated On: Sep 28, 2019 09:32 PM IST

Navratri 2019 : घटस्थापनेकरता योग्य मुहूर्त कोणता? पंचाकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली माहिती

मुंबई, 28 सप्टेंबर: नवरात्र म्हणजे देवीचा जागर. देवीच्या 9 रुपांची शक्तीची पूजा आणि आराधना जी वर्षातून दोनवेळा केली जाते. वासंतिक नवरात्र चैत्र महिन्यात केली जाते आणि शारदायी नवरात्र जी अश्विन महिन्यात केली जाते. अश्विन शुद्ध 1 ते अश्विन शु्द्ध 9 असे 9 दिवस देवीची मनोभावे 9 वेगवेगळ्या वस्त्रांनी आणि नैवेद्यानं पूजा केली जाते. परतीच्या पावसाला सुरुवात झालेली असते आणि पीक तयार झालेलं असतं त्यामुळे शेतकरी वर्गातही आनंदाचं वातावरण असतं.

रविवार 29 सप्टेंबर रोजी नवरात्रारंभ घटस्थापना आहे. यादिवशी घट स्थापन करण्यासाठी विशिष्ट मुहूर्त नाही. प्रात:कालपासून मध्यान्हापर्यंत कधीही घटस्थापना करता येते. त्यातही सकाळी 8.00 ते दुपारी 12. 30 वाजेपर्यंत शुभ चौघडी आहे. नवरात्रातील पूजा ही आदिशक्ती म्हणजे निर्मिती शक्तीची पूजा असते. या सुमारास शेतातील धान्य घरात येत असतं. असे पंचांगकर्ते , खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. याविषयी अधिक माहिती देताना श्री. सोमण म्हणाले की निर्मिती आणि नऊ या संख्येचे अतूट नाते आहे. बी जमिनीत पेरले की नऊ दिवसांनी छान अंकुरते गर्भधारणा झाल्यापासून 9 महिने , 9 दिवसांनी मूल जन्माला येते. 9 ही संख्या सर्वात मोठी संख्या आहे. 9 या संख्येला ब्रह्मसंख्या म्हणतात. निर्मितीशक्ती हीच आदिशक्ती आहे. म्हणून 9 दिवसात पूजा करून दररोज एक याप्रमाणे 9 माळा बांधतात. घटामध्ये मातीत धान्य पेरतात. अखंड दीप देवीपुढे लावून ठेवतात. यावर्षी या 9 दिवसात एकाही तिथीची क्षय-वृद्धी न झाल्यामुळे नवरात्र सलग नऊ दिवसांचे आले आहे. नवरात्रातील नवरंगांसदर्भात कोणत्याही धार्मिक ग्रंथात उल्लेख नाही. तसेच भविष्य, पाप-पुण्य, देवीची कृपा-अवकृपा आणि या रंगांचा काहीही संबंध नाही. या नऊ दिवसात एकाच रंगाची वस्त्रे नेसल्याने महिलांना समता, एकता आणि सुरक्षितता वाटते. तसेच आनंदाची प्राप्ती होते. म्हणून ही नवरंगांची प्रथा पडली असावी. नवरात्रातील हे रंग वारावरून समजले जातात. असं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं आहे. या दिवशी काही स्त्रिया पूजा करून व्रतवैकल्य आणि उपवास धरतात.

नवरात्रीचे 9 दिवस ब्रह्मांडात वाईट शक्तींना प्रेक्षेपित केलेल्या त्रासदायक लहरी, वाईट शक्तींसोबत लढते आणि नवचैतन्य निर्माण करते. याचे प्रतिक म्हणून घट आणि नंदादीप यांची प्रतिकात्मक पूजा केली जाते. घटात दिव्याच्या उष्णतेमुळे निर्माण झालेलं वातावरण तेजाचं प्रतीक समजलं जातं. त्यामुळे हे चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा आपल्याला नवरात्रीत मिळत असते. असंही एक महात्म सांगितलं जातं. तर याकाळात आपल्या शरीरातील वाईट शक्ती, वाईट ऊर्जा आणि वाईट गुणांना सुधारुन चांगली ऊर्जा आणि उत्साह आपल्य़ा आयुष्यात आणावा अशी भावना असते.

VIDEO: साक्षात लतादीदींनी नेहा राजपालला दिला आशीर्वाद, कारण...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2019 09:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...