Navratri 2019: नवरात्रामध्ये चुकूनही करू नका या 10 गोष्टी नाहीतर होतील हे परिणाम...

Navratri 2019: नवरात्रामध्ये चुकूनही करू नका या 10 गोष्टी नाहीतर होतील हे परिणाम...

नवरात्रामध्ये देवीची पूजा केल्यानं मन प्रसन्न राहातं. या पूजेला विशेष महत्त्व आहे. ही पूजा आणि व्रत करताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

  • Share this:

मुंबई, 29 सप्टेंबर: नवरात्र म्हणजे देवीचा जागर, शक्तीची पूजा. या पूजेसाठी संयम, जिद्द आणि मनःशांती आवश्यक असते. देवीची पूजा करताना काही नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. त्यासोबत व्रत आणि संयमही असायला हवा.

शारदीय नवरात्र आजपासून म्हणजेच 29 सप्टेंबरपासून 9 दिवस असणार आहे. या उत्सवात दुर्गा देवीची पूजा केली जाते. त्यामुळे दुर्गा पूजा म्हणून नवरात्राची वेगळी ओळख आहे. पूजा केल्यानं मन प्रसन्न आणि शांत राहतं. त्याचसोबत सकरात्मक ऊर्जा या दिवसांमध्ये मिळते. सुख-समृद्धी धन आणि मनाची शांती प्राप्त करण्यासाठी मंदिरात अथवा घरामध्ये दुर्गा देवीची पूजा करून तिला प्रसन्न केलं जातं. घटस्थापने दिवशी घरी कलश आणि नारळ ठेवून त्याची मनोभावे पूजा केली जाते. या दिवशी उपवासही केला जातो. घरात देवीसमोर अखंड दिवा तेवत ठेवला जातो. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि प्रसन्न वातावरण राहातं. एवढंच नाही तर काहीजण नऊ दिवस पायामध्ये चप्पलही घालत नाहीत.

दरम्यान, दुर्गा देवीचा उपवास करत असताना काही नियम पाळणं आवश्यक आहे. दुर्गेची पूजा करताना कोणत्या गोष्टींचं पालन करायला हवं हे जाणून घेऊ.

1. नवरात्रात मांसाहार करू नये. याशिवाय लसूण आणि कांदा खाऊ नये. लसूण आणि कांद्याचा वापर नैवेद्यातील जेवणात करू नये. मद्य सेवेन टाळावं.

2. नवरात्रामध्ये व्रत करणाऱ्या व्यक्तीने चामड्याच्या चपला किंवा वस्तू वापरू नयेत. बेल्ट, पर्स, बॅग, चप्पल-शूज यासरख्या इतर गोष्टी वापरणं शक्यतो टाळावं.

3. नवरात्रात व्रत करणाऱ्या व्यक्तींनी अन्न आणि मीठा खाऊ नये. काही ठिकाणी सेंधव-काळ्या मिळाचा वापर केला जातो. फळ खावीत.

4. दूर्गा देवीच्या पूजेनंतर आरती न विसरता करावी. पूजेमध्ये काही त्रुटी राहिल्य़ा असतील तर त्या आरतीतून पूर्ण होतात असा समज असल्यानं आरती केली जाते.

5. आरती करतान धूप लावावा. त्यामुळे वातावरण प्रसन्न राहातं. घरातील किडे, डास पळून जातात. अगरबत्ती केमिकलपासून तयार केली जात असल्यानं शरीरासाठी हानिकारक असते.

6. नवरात्रामध्ये दूर्गा देवीची जुनी मूर्ती असेल किंवा मूर्तीला तडा गेला असेल तर ती वापरू नये. नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी.

7. जे लोक नवरात्रात उपवास किंवा व्रत पाळतात त्यांनी दिवसा झोपू नये. त्यामुळे घरामध्ये आळसाचं वातावरण निर्माण होतं.

8. व्रत करताना पूजा आणि आरती एकाचवेळी पूर्ण करा. खंड पडू देऊ नका किंवा टप्प्या टप्प्याने करू नका. त्य़ामुळे तुम्ही केलेल्या पूजेचा परिणाम होणार नाही.

9. 9 दिवसांमध्ये नखं कापणं, केस कापणे किंवा दाढी करू नये. असाही एक समज आहे.

10. व्रत करणाऱ्यांनी स्वच्छ धुतलेले कपडे रोज परिधान करून पूजा करावी. रोज स्नान करावे आणि घर-परिसारत स्वच्छता ठेवावी. यामुळे लक्ष्मी प्रसन्न रहाते.

या सगळ्या गोष्टी पूर्वापारंपार चालत आल्या आहेत.त्या पाळाव्या किंवा नाही किंवा त्याबाबत अनेक मतमतांतरही आहेत. जो मनोभावे पूजा करतो तो आपल्या परीनं हे व्रत पाळण्याचा प्रयत्न करतो. मात्र देवीची मनोभावे पूजा करणं हेही एक व्रत आहेच.

(हे सदर माहिती म्हणून देण्यात आलं आहे. न्यूज 18 लोकमत यातील कोणत्याही गोष्टीची पुष्ठी करत नाही.)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: navratri
First Published: Sep 29, 2019 08:23 AM IST

ताज्या बातम्या