Navratri 2019 : नवरात्रीचे नऊ रंग नेमके ठरतात कसे? घ्या जाणून

Navratri 2019 : नवरात्रीचे नऊ रंग नेमके ठरतात कसे? घ्या जाणून

Navratri colours of 2019 : नवरात्रीचे नऊ रंग नेमके ठरतात कसे? 9 देवीची रूप आणि रंग त्याचं महत्त्व काय जाणून घ्या.

  • Share this:

मुंबई, 28 सप्टेंबर: नऊ दिवस देवीचा जागर, मनोभावे केली जाणारी पूजा आणि रंगांचा उत्सव म्हणजे नवरात्र. नवरात्रीचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी रात्री गरबा खेळला जातो. बदलत्या काळानुसार गरबा खेळण्याचं रुपांतर स्पर्धेतही झालं आहे. मात्र नवरात्र हा विशेष म्हणजे स्त्रियांसाठी मनसोक्त आनंद लुटण्याचा एक सण असतो असंही म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे नवरात्रीचे नऊ रंग. ऑफिस, कॉलेज, ट्रेनपासून अगदी गल्लोगल्ली नवरात्रीचे नऊ दिवस सगळे रंग फॉलो करताना पाहायला मिळतं. मात्र हे रंग कसे आणि कोण ठरवतं? या रंगांमागचं वैशिष्ट्य काय आहे? याबाबत कधी प्रश्न पडला आहे का? आपण फक्त ज्या दिवशी जो रंग आहे तो रंग पाहून कपडे खरेदी करुन मोकळे होतो.

देवीची नऊ रुप आणि त्यानुसार ठरवले जाणारे रंग अशीही एक परंपरा पाहायला मिळते.

या वर्षी कोणत्या दिवशी कोणता रंग जाणून घेण्यासाठी स्क्रोल करा...

1. पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची आराधना केली जाते. शैलपुत्री देवी साहस आणि शक्तीचं रुप असल्यानं त्या दिवशी लाल रंगांची साडी परिधान केली जाते.

2. दुसरा दिवस ब्रह्मचारिणी देवीची आराधना केली जाते. कुंडलिनी आणि जागरण या हेतूने पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान केली जातात.

3. तिसऱ्या दिवशी चंद्रघघंटा रुपाची आराधना केली जाते. या आराधनेमध्ये हिरव्या रंगाला महत्त्व असल्यानं हिरवा रंग परिधान केला जातो. यामुळे देवीची कृपा आणि शांती घरात येते असाही एक समज आहे.

4. चौथ्या दिवशी कूष्मांडी देवीची आराधना केली जाते. रोगांपासून संरक्षण करणारी, धन, यश, किर्ती प्राप्त करुन देणारी म्हणून करड्या रंगाची वस्त्र परिधान केली जातात.

हे वाचा - या 10 कारणांनी पूर्ण झोप होऊनही जाणवतो थकवा...

5. पाचव्या दिवशी स्कंदमातेची आराधना केली जाते. स्कंदमाता ही सूर्यमंडलाची अधिष्ठात्री देवी आहे असं म्हटलं जातं. तेजाने परिपूर्ण भरलेला नारंग रंग सूर्याचा म्हणून या दिवशी नारंगी वस्त्र परिधान करतात.

6. सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते.ऋषी कात्यायन यांची कन्या यांना पांढरा रंग प्रिय असल्यानं या दिवशी पांढऱ्या रंगाची वस्त्र आणि देवीला पांढरी फुलं परिधान केली जातात.

7. सातव्या दिवशी कलरात्री देवीची आराधना केली जाते. या देवीला गुलाबी रंग आवडत असल्यानं गुलाबी रंग देवीला परिधान केली जातात.

8. आठव्या दिवशी महागौरीची आराधना केली जाते. या दिवशी देवीला आकाशी किंवा निळ्या रंगाची वस्त्र परिधान केली जातात. निळा शांतीचं प्रतिक म्हणूनही काही ठिकाणी वापरण्यात येतो.

9. नवव्या दिवशी दुर्गा देवीच्या सिद्धीदात्री स्वरुपाचं पूजन केलं जातं. त्यानंतर येतो तो दसरा.काही ठिकाणी देवीची ही रुप आणि देवीला वापरली जाणारी वस्त्र यावरून रंग ठरवले जातात.असाही एक समज आहे.

हेही वाचा -  आल्याचं पाणी प्या आणि हे आजार दूर करा!

पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांच्यामते या रंगांमागे काहीही धार्मिक कारण नाही. किंवा पापपुण्य यांचा, भविष्याचा संबंध नाही. ह्या रंगाची वस्त्र परिधान केली नाहीत तर पाप वगैरे लागत नाही किंवा देवीचा कोपही होत नाही. केवळ त्या दिवसाच्या वारावरून हे रंग ठरविले जातात. एकाच रंगाची वस्त्रे नेसल्याने सामाजिक सुरक्षितता वाटते. एकीची आणि समानतेची भावना निर्माण होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंद मिळतो.

एक असाही समज आहे की मुंबईच्या 2004 साली मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरात देवीला नवरात्रोत्सवात 9 दिवस 9 रंगांच्या साड्या नेसवण्यात आल्या होत्या. त्यावर्षीपासून नवरात्रीच्या नऊ रंग पाळण्याची एक परंपरा तयार झाली.

या 9 दिवसांमध्ये सरकारी ऑफिस, ट्रेन, शाळा, महाविद्यालं एकाच रंगाच्या साड्या किंवा ड्रेसनी फुलून गेलेला पाहायला मिळतो. आठवड्यातील वारानुसार हे रंग असल्याचं पाहायला मिळतं ते कसं पाहू या

रंगांचं वैशिष्ट्य

रविवार- केशरी रंग- उगवत्या सूर्याचा रंग केशरी म्हणून रविवारी केशरी रंगाची साडी किंवा ड्रेस परिधान केला जातो.

सोमवार- पांढरा रंग- चंद्राचा रंग पांढरा म्हणून सोमवारी पांढऱ्या रंगाची साडी नेसली जाते.

हे वाचा - पुरुषांच्या या 5 गोष्टींवर जीव ओततात मुली, तुम्हीही घ्या जाणून!

मंगळवार- लाल रंग- मंगळाचा रंग तांबूस लाल असल्यानं मंगळवारसाठी लाल रंगाचे कपडे परिधान केले जातात.अशा पद्धतीनं प्रत्येक ग्रहाला अनुसरुन त्यानुसार बुधवारी निळा, गुरुवारी पिवळा, शुक्रवारी हिरवा, शनिवारचा रंग करडा असे रंग ठरवले जातात.आठवडा संपल्यानंतर शेवटचे दोन दिवस उरतात त्यामध्ये मोरपिसी हिरवा, जांभळा, आकाशी, गुलाबी किंवा इतर रंग राखून ठेवले जातात आणि नवरात्रीच्या 9 दिवसांचे हे रंग दरवर्षी बदलत असतात.लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांमध्ये या नवरंग वस्त्र परिधान करण्याचा उत्साह पाहायला मिळतो.

यावर्षीच्या नवरात्रातील नवरंग

रविवार, 29 सप्टेंबर - केशरी

सोमवार, 30  सप्टेंबर- पांढरा

मंगळवार, 1 ऑक्टोबर- लाल

बुधवार, 2 ऑक्टोबर- निळा

गुरुवार, 3 ऑक्टोबर - पिवळा

शुक्रवार, 4  ऑक्टोबर - हिरवा

शनिवार, 5 ऑक्टोबर - राखाडी

रविवार, 6 ऑक्टोबर - गुलाबी

सोमवार 7 ऑक्टोबर - मोतीया / पर्ल व्हाईट

नवरात्रीच्या 9 रंग कसे ठरतात किंवा कुणाच्या सांगण्यानुसार ठरवले जातात याबाबत मतमतांतर आहेत. देवीच्या 9 रुपांची 9 माळा आणि 9 वेगवेगळ्या वस्त्रांनी पूजा केली जाते. या नवरात्रीत 9 रंगांची वस्त्र परिधान करणं हा आताच्या काळात एक ट्रेन्ड झाला आहे. त्यामुळे हे सणाचे 9 दिवस मात्र रंगांची उधळण आणि मोठा उत्साह पाहायला मिळतो.

---------------------------------------------------------------------------------------

VIDEO: साक्षात लतादीदींनी नेहा राजपालला दिला आशीर्वाद, कारण...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2019 03:39 PM IST

ताज्या बातम्या