Home /News /lifestyle /

Natural Painkillers: औषधांना करा बाय बाय; स्वयंपाकघरातील हे 6 घटक ठरलीत नैसर्गिक पेन किलर

Natural Painkillers: औषधांना करा बाय बाय; स्वयंपाकघरातील हे 6 घटक ठरलीत नैसर्गिक पेन किलर

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - shutterstock)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - shutterstock)

प्रमाणापेक्षा जास्त पेनकिलर औषधं घेतली तर किडनी, लिव्हरवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. पूर्वी अशा स्वरुपाच्या समस्या निर्माण झाल्यातर घरगुती उपचार केले जात.

    नवी दिल्ली, 2 जुलै : आपल्याला काही वेळा दुखापत होणं, डोकेदुखी, अंगदुखी, स्नायुदुखी किंवा संधिवातामुळे आदी शारीरिक समस्या जाणवतात. बऱ्याचदा या समस्या सर्वसामान्य असतात. अशावेळी आपण मनानं एखादी पेनकिलर अर्थात वेदनाशामक औषध (Painkiller Medicine) घेतो. पण काही वेदना या कायम किंवा दीर्घकाळ जाणवतात. अशावेळी सातत्यानं पेनकिलर घेणं धोकादायक ठरू शकतं. खरं तर कोणत्याही स्वरूपाची शारीरिक वेदना जाणवू लागल्यास वैद्यकीय सल्ला, निदान आणि उपाचार घेणं गरजेचं आहे. कारण प्रमाणापेक्षा जास्त पेनकिलर औषधं घेतली तर किडनी, लिव्हरवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. पूर्वी अशा स्वरुपाच्या समस्या निर्माण झाल्यातर घरगुती उपचार केले जात. स्वयंपाकघरात रोज वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचा वापर वेदनाशामक औषध म्हणून केला जायचा. पुदिना, हळद, आलं आदी मसाल्याचे पदार्थ उत्तम पेनकिलर समजले जातात. साध्या किंवा तीव्र स्वरुपाच्या वेदना जाणवत असतील हे पदार्थ प्राथमिक उपचार म्हणून वापरायला काहीच हरकत नाही. `नवभारत टाइम्स`ने या विषयी माहिती दिली आहे. कोणत्याही स्वरुपाच्या शारीरिक वेदना जाणवत असतील तर आपण पेनकिलर घेतो. दीर्घकाळ वेदना जाणवत असतील तर पेनकिलर औषधं घेणं जोखमीचं असतं. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. स्वयंपाकघरातले काही पदार्थ नैसर्गिक वेदनाशामक (Natural Painkiller) म्हणून ओळखले जातात. वेदना कमी करण्यासाठी असलेल्या अन्य औषधांपेक्षा या पदार्थांचा वापर निश्चित आरोग्यपूरक ठरतो. कोणत्याही स्वरुपाच्या वेदना होत असतील तर त्या दूर करण्यासाठी बर्फ (Ice) हा सर्वात प्रभावी मानला जातो. स्नायू, (Muscle) स्नायूबंध किंवा अस्थिबंधावर ताण आल्यास सूज येते. ही सूज आणि वेदना कमी करण्यासाठी आइसपॅक वापरणं फायदेशीर ठरू शकतं. तसंच मुरगळल्याने किंवा ताणामुळे आलेला कडकपणादेखील बर्फाने कमी होतो. पाठदुखी आणि सांधेदुखीमध्ये बर्फनं शेकून काढल्यास आराम पडतो. स्वयंपाकघरात हमखास असेलली हळद (Turmeric) ही बहुपयोगी मानली जाते. कॅन्सरसारख्या (Cancer) गंभीर आजारापासून ते कोणत्याही प्रकारच्या संसर्गावर उपचारांसाठी हळदीचा वापर केला जातो. हळदीत अँटीइन्फ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट, अँटीट्यूमर, अँटीसेप्टिक, अँटीव्हायरल, कार्डियो प्रोटेक्टिव्ह, हेपटोप्रोटेक्टिव्ह, नेफ्रोप्रोटेक्टिव्ह गुणधर्म असतात. यातलं करक्युमिन (Curcumin) हे संयुग उत्तम अँटीबायोटिक (Antibiotic) म्हणून काम करतं. स्नायूदुखी आणि स्नायूंना सूज आल्यास हळदीचा वापर फायदेशीर ठरतो. यामुळे स्नायूंच्या वेदना कमी होतात. लवंगामध्ये (Clove) अँटीमायक्रोबायल आणि अँटीऑक्सिडंट ही तत्त्व प्रामुख्यानं असतात, असं एका अभ्यासातून दिसून आलं आहे. याशिवाय लवंगामध्ये अँटीव्हायरल, एनाल्जेसिक गुणधर्म असतात. त्यामुळे लवंग शरीरासाठी उपयुक्त असते. तोंडाच्या आरोग्यासाठी लवंगाचा वापर फायदेशीर ठरतो. तसंच डायबेटिस नियंत्रण, पचन सुधारण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी लवंग खाणं फायदेशीर ठरतं. स्नायूंमध्ये होणाऱ्या वेदना, दातदुखी, डोकेदुखी, नसांमध्ये वेदना होत असतील तर या वेदना दूर करण्यासाठी पुदिना (Peppermint) खाणं फायदेशीर ठरतं. पुदिन्याची काही पानं खाल्ल्यास पचनाच्या समस्या दूर होतात तसंच मनःशांती मिळते. एका अभ्यासानुसार, पुदिन्यात अँटीमायक्रोबायल, अँटीव्हायरस, अँटीऑक्सिडंट, अँटीट्युमर आणि अँटीएलर्जेनिक हे गुणधर्म असतात. या गुणधर्मांमुळे शारीरिक समस्या दूर होतात. रोझमेरी तेल (Rosemary Oil) हे अतिशय प्रभावी मानलं जातं. हे तेल वापरल्यानं कोणत्याही स्वरूपाच्या वेदना दूर होतात. हे तेल वेदनेशी संबंधित असलेल्या मेंदूच्या ओपिओइड न्यूरॉन्सवर कार्य करतं. डोकेदुखी आणि सांधेदुखीसाठी या तेलाचा वापर फायदेशीर ठरतो. सूज, स्नायूंच्या वेदना कमी करण्यासोबतच मेंदुचं आरोग्य, स्मरणशक्ती सुधारण्यासाठी हे तेल उपयुक्त ठरतं. आलं अर्थात अद्रक (Ginger) आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट असतं. आलं हे बहुतांश आजारांवर गुणकारी मानलं जातं. आल्यामधील औषधी गुणधर्मांमुळे बद्धकोष्ठता, पोटदुखी, पोटात कळ येणं, गॅसेससारख्या समस्या दूर होतात. आल्यात एनाल्जेसिक नावाचा वेदनाशमन करणारा गुणधर्म असतो. यामुळे सांधेदुखी, कळ, स्नायुदुखी कमी होते. आल्याच्या सेवनामुळे पीरियड्सदरम्यान होणाऱ्या वेदना दूर होतात. स्नायूंना आराम मिळतो. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाच्या तत्कालीक वेदना होत असतील तर औषधांऐवजी घरातल्या या पदार्थांचा वापर करणं हितावह ठरतं.

    First published:

    Tags: Cancer, Medicine

    पुढील बातम्या