मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Hair Fall: केसगळती थांबवण्यासाठी वापरा 'ही' नैसर्गिक तेलं, केसांच्या अनेक समस्या होतील दूर

Hair Fall: केसगळती थांबवण्यासाठी वापरा 'ही' नैसर्गिक तेलं, केसांच्या अनेक समस्या होतील दूर

काही लोकांचे केस खूप (Hairfall) गळतात. त्याचं प्रमाण इतकं असतं की नंतर टक्कल पडतं. अशा परिस्थितीत चिंच तुमच्यासाठी औषधापेक्षा कमी नाही.

काही लोकांचे केस खूप (Hairfall) गळतात. त्याचं प्रमाण इतकं असतं की नंतर टक्कल पडतं. अशा परिस्थितीत चिंच तुमच्यासाठी औषधापेक्षा कमी नाही.

अनारोग्य म्हणजे योग्य व संतुलित आहाराची कमतरता, दैनंदिन जीवनातील चुकीच्या सवयी यांचा केसांवर विपरित परिणाम होतो.

मुंबई, 04 ऑगस्ट: कोणत्याही व्यक्तीचं सौंदर्य केसांमुळे वाढतं. त्यामुळे चेहऱ्याप्रमाणेच केसांची काळजी घेणं तितकंच गरजेचं असतं. हल्ली केसांच्या अनेक समस्या कमी वयातच उद्भवू लागल्या आहेत. कोंडा, केसगळती, केस पांढरे होणं, टक्कल पडणं या काही प्रमुख समस्या केसांसदर्भात अनेकांना जाणवतात. त्यापैकी केस पांढरे होणं, टक्कल पडणं हे कधीकधी अनुवंशिकही असू शकतं. मात्र बरेचदा या सर्व समस्या अनारोग्यामुळे उद्भवलेल्या असतात. अनारोग्य म्हणजे योग्य व संतुलित आहाराची कमतरता, दैनंदिन जीवनातील चुकीच्या सवयी यांचा केसांवर विपरित परिणाम होतो. काही सोप्या उपायांनी केसांच्या अनेक समस्या दूर करता येऊ शकतात. झी न्यूज हिंदीनं याबाबत वृत्त दिलं आहे. टक्कल पडलं म्हणजे म्हातारपण आलं असा पूर्वीचा समज होता. आजकाल तरुण वयातच मुलांना टक्कल पडू लागलं आहे. यामुळे लग्न तरी होईल का, अशी गंभीर चिंता मुलांना सतावते आहे. त्यावर काही खास तेलांचा मसाज उपयोगी पडू शकतो. केसांसाठी चार प्रकारची तेलं वापरल्यास केसगळती कमालीची कमी होते. खोबरेल तेल खोबरेल तेल जवळपास प्रत्येकच जण वापरतो. मात्र खोबरेल तेलाचे फायदे फार कमी लोकांना माहीत असतात. हे तेल लावल्यानं केस गळणं कमी होतं. केस दाट व मजबूतही होतात. अंघोळीपूर्वी एक तास या तेलानं केसांना मालिश केली, तर चांगला परिणाम होतो. मात्र खोबरेल तेल चांगल्या प्रतीचं असेल, याची खात्री करून घ्या. ऑलिव्ह ऑईल ऑलिव्ह ऑईल स्वयंपाकात वापरलं जातं. जसे त्याचे खाण्यासाठी फायदे आहे, तसेच केसांसाठीही अनेक फायदे आहे. हे तेल केसांवर लावल्यानं केसांना पोषकतत्त्वं मिळतात व ते मजबूत होतात. केसांच्या आतील त्वचेवर एखादं इन्फेक्शन किंवा अ‍ॅलर्जी असेल, तर या तेलानं तीही दूर होईल. डोकं खाजत असेल, तर ऑलिव्ह ऑईल औषधाप्रमाणे ते बरं करतं. बदाम तेल बदाम केसांसाठी व बुद्धिवर्धनासाठी उत्तम समजले जातात. बदामाचं तेलही (Almond Oil) गुणकारी असतं. यात प्रथिनं आणि ई जीवनसत्त्व भरपूर असतं. यामुळे धूळ, ऊन आणि मातीमुळे होणाऱ्या इन्फेक्शनचा धोका कमी होतो. बदाम तेल नियमित लावल्यामुळे केसांची वाढ चांगली होते. कांदा व खोबरेल तेल स्वयंपाकाप्रमाणेच केसांसाठीच्या उपचारांमध्येही कांदा महत्त्वाचा मानला गेला आहे. कांद्याची सालं काढून कांदा मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्याचा रस सुती कापडातून गाळून जमा करा. मग त्यात खोबरेल तेल मिसळा. हे तेल थोडं गरमही करू शकता. या मिश्रणानं केसांचा नियमित मसाज केल्यास केसगळती हळूहळू थांबू शकते. अनेक उत्पादनांमध्ये केमिकल्स मिसळलेली असतात. त्यामुळे केस जास्त खराब होण्याची भीती असते. त्याऐवजी नैसर्गिक तेलांचा वापर केल्यास केसांच्या समस्या कमी होतील.
First published:

Tags: Lifestyle

पुढील बातम्या