मूळव्याधावर उपयुक्त सुरण; अशा पद्धतीने वापरला तर होईल अधिक फायदा

मूळव्याधावर उपयुक्त सुरण; अशा पद्धतीने वापरला तर होईल अधिक फायदा

सुरण हे मूळव्याधवरील (piles) एक औषध आहे, असं म्हणण्यास हरकत नाही. मूळव्याध असलेल्यांना सुरण खाण्याचा सल्ला दिला जातो.

  • Last Updated: Oct 24, 2020 11:29 AM IST
  • Share this:

चुकीच्या खाण्यामुळे बर्‍याच लोकांना मूळव्याधासारख्या समस्येचा सामना करावा लागतो. त्यात आतड्यांसंबंधी हालचाली दरम्यान रक्तस्त्राव किंवा तीव्र वेदना यांचा समावेश आहे. इतकंच नाही तर गुद्द्वारभोवती नसांमध्ये सूज येते. यात एखाद्या व्यक्तीला बद्धकोष्ठतेच्या समस्येशी देखील संघर्ष करावा लागतो. जर लक्ष नाही दिलं तर त्या व्यक्तीला गुदद्वारात वेदना, जखम आणि जळजळ होण्यासारख्या समस्या देखील होऊ लागतात. म्हणून या समस्येतील एक विशिष्ट औषधी वनस्पती खूप फायदेशीर आहे आणि ती म्हणजे सुरणाची भाजी.

myupchar.com शी संबंधित डॉ लक्ष्मीदत्त शुक्ल यांनी सांगितलं, सुरण अनेक गुणांनी समृद्ध आहे, मूळव्याधीसाठी ते फायदेशीर मानलं जातं. जीवनसत्त्व 'ए' बरोबर कॅल्शियम, तांबे, सेलेनियम, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त आणि मॅग्नेशियम ही खनिजं सुरणामध्ये असतात. याशिवाय प्रथिनं, कर्बोदकं आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिडस हे सर्व घटक सुरणात आहेत.

मूळव्याध असलेल्या रुग्णांनी सुरण तळून किंवा शिजवून खावा. दररोज दह्याबरोबर याचं सेवन करा. यामुळे मूळव्याधामध्ये रक्तस्त्राव होण्याची समस्या त्वरित ठीक होते. केवळ पोटातील अळी नष्ट होत नाही तर बद्धकोष्ठतेपासूनही मुक्तता मिळते.

सुरणाने होणारे इतर फायदे

1) सुरणाचे नियमितपणे सेवन केल्यामुळे रक्तामध्ये कोलेस्टेरॉल देखील कमी होतं. याव्यतिरिक्त मधुमेह नियंत्रित करण्यासाठी देखील कार्य करतं.

2) सुरणामध्येही कर्करोगासारख्या आजारांपासून बचाव करण्याचे गुणधर्म असतात. हे अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्व सी आणि बीटा कॅरोटीनने समृद्ध आहे. संधिवात आणि दम्यात देखील त्यातील अँटि-इन्फ्लेमेटरी गुणधर्म फायदेशीर आहेत. सुरणात आढळणारे तांबं फक्त शरीरात रक्त परिसंचरण वाढवण्यासाठी कार्य करत नाही. तर त्याच वेळी लाल रक्तपेशी वाढवतं.

हे वाचा - कोरोना काळात साध्या तापावर रामबाण उपचार; घरगुती उपायांनी पळवा ताप

3) पोटाशी निगडित आजारांसाठी हे एक रामबाण औषध आहे. शिवाय बौद्धिक शक्तीही वाढवतं. ज्यांना अल्झायमरची समस्या आहे त्यांनीही सुरणाचं सेवन करावं.

4) वजन कमी करण्याशिवाय यकृत स्वच्छ ठेवण्याचं कार्यदेखील करतं.

5) सुरणामध्ये जीवनसत्त्व बी 6 मुबलक प्रमाणात आहे, ज्यामुळे हृदयरोग होत नाही. तसंच यात जीवनसत्त्व बी देखील मुबलक आहे. हे रक्तदाब नियंत्रित करतं आणि हृदय निरोगी ठेवते.

हे वाचा - तुमच्यापर्यंत कशी पोहोचणार कोरोना लस? अशी आहे मोदी सरकारची योजना

myupchar.com शी संबंधित डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ल यांनी सांगितलं, सुरण थंड आहे. ज्या लोकांना बहुधा कफ किंवा सर्दी असते त्यांनी ते खाऊ नये. विशेषतः लहान मुलांनी हे खाऊ नये, नाहीतर त्यांना सर्दी होऊ शकते. गर्भवती महिलांनी देखील याचं सेवन टाळले पाहिजे.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - मूळव्याध: लक्षणे, कारणे, उपचार...

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: October 24, 2020, 11:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading