• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • तुमच्या डाएटमुळेही बळावतंय डिप्रेशन; चुकीच्या आहारामुळे मानसिक आरोग्य धोक्यात

तुमच्या डाएटमुळेही बळावतंय डिप्रेशन; चुकीच्या आहारामुळे मानसिक आरोग्य धोक्यात

आहार आणि डिप्रेशन यांचा संबंध असल्याचं संशोधनात दिसून आलं आहे.

  • Share this:
मुंबई, 08 सप्टेंबर : डिप्रेशन (Depression), म्हणजेच मानसिक ताण (Mental health problem) येण्याची बरीच कारणं असतात. यात आपण एखादी वाईट घटना घडणं, अपुरी झोप होणं (Causes of depression) आणि इतर मानसिक कारणांवर (Mental health) जास्त लक्ष देतो. एखाद्या मानसिक धक्क्यामुळे, एखाद्यासोबत झालेल्या वादामुळे किंवा अनपेक्षित घटना घडल्यामुळे मानसिक ताण (Depression) येण्याबाबत बऱ्याच जणांना माहिती असते. पण या सगळ्यासोबतच तुमच्या आहाराचाही संबंध डिप्रेशनशी (Depression and Diet) असतो, असं एका नव्या अभ्यासात समोर आलं आहे. पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन जर्नलमध्ये (Public Health Nutrition Journal) प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासामध्ये याबाबत माहिती दिली आहे. या अभ्यासानुसार, जर तुमच्या डाएटमध्ये पोषक (Diet connection with depression) तत्वांचा समावेश असेल, तर तुम्हाला डिप्रेशनसारखी समस्या होण्याची शक्यता कमी असते. तेच जर तुमच्या शरीरामध्ये पुरेशा प्रमाणात पोषक घटक नसतील, आणि तुमचा डाएटही अनहेल्दी (Avoid unhealthy diet) असेल तर तुमचं डिप्रेशन वाढू शकतं. या सगळ्याचा एकत्रित परिणाम तुमच्या इम्युनिटीवर आणि शारिरीक वाढीवरही होतो. त्यामुळेच शरीराला आवश्यक ते पोषक घटक मिळण्यासाठी विटॅमिन, मिनरल्स, अमिनो असिड्स आणि हेल्दी फॅट्सचा समावेश तुमच्या आहारात करणे गरजेचे आहे. हे वाचा - जास्त Ketchup खाणं ठरू शकते धोकादायक; Side Effects ने 'या' आजारांची होऊ शकते लाग झी न्यूजच्या वृत्तानुसार या अभ्यासात असं म्हटलं आहे, की तुमचा मेंदू आणि गॅस्ट्रोइंटेस्टनल ट्रॅक्ट (Gastrointestinal tract) हे एकमेकांशी जोडलेले असतात. त्यामुळेच तुमचा डाएट आणि तुमचे इमोशन्स यांचा थेट संबंध असतो. गॅस्ट्रोइंटेस्टनल ट्रॅक्टला सेकंड ब्रेनही म्हटलं जातं. त्यामुळेच चांगल्या मानसिक आरोग्यासाठी तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये बदल (Diet changes for depression) करणे आवश्यक आहे. झी न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. यात चांगल्या मानसिक आरोग्यासाठी काय खावं आणि काय टाळावं याबाबत माहिती देण्यात आली आहे. चांगल्या मानसिक आरोग्यासाठी तुम्हाला कॅफेनयुक्त पेय (Avoid caffein in depression) टाळायला हवीत. कॉफी आणि तत्सम पेयांमुळे आपल्या स्लीप पॅटर्नवर परिणाम होतो. तसेच, यामुळे डीहायड्रेशनही होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळेच मूड डिसऑर्डर्स (Mood disorders) कमी करण्यासाठी कॅफेनचे सेवन कमी करण्याचा सल्ला दिला जातो. यासोबतच डिप्रेशन टाळण्यासाठी साखरेचे प्रमाण (Avoid sugar in depression) कमी करण्याचा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे. चॉकलेट आणि इतर गोड पदार्थ खाल्ल्याने थोड्या वेळासाठी तुमचा मूड चांगला होऊ शकतो. मात्र, काही वेळानंतर पुन्हा चिडचिड आणि थकवा जाणवू शकतो. त्यामुळे तज्ज्ञांनी हा सल्ला दिला आहे. हे वाचा - गरोदरपणात अशा भांड्यांमधलं अन्न खाणं टाळा; बाळावर होतात गंभीर परिणाम बऱ्याचदा आपण मूड चांगला नाही म्हणून जेवण टाळतो. मात्र, असं करणं तुमचं डिप्रेशन अधिक वाढवू शकतं. त्यामुळे वेळच्या वेळी जेवण करणे चांगल्या मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. आपल्या आहारात व्हिटॅमिन डी (Vitamin D) आणि ओमेगा 3 फॅटी असिड्स (Omega 3 fatty acids) याचा मोठ्या प्रमाणात समावेश करणे आवश्यक आहे. अशा प्रकारचा आहार घेतल्यामुळे तुम्हाला आवश्यक असणारी पोषक घटक पुरेशा प्रमाणात मिळतील. तसेच, यामुळे तुम्हाला डिप्रेशन येण्याची शक्यताही कमी होईल.
First published: